Join us  

समंथा प्रभुचं जबरदस्त वर्कआऊट, घेणार का तिचे लेव्हलअप चॅलेंज? पाहा तुफान व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 1:10 PM

Viral video: अभिनेत्री समंथा प्रभुने दिलेलं फिटनेस चॅलेंज घ्यायचं की नाही, ते नंतर ठरवा. सगळ्यात आधी तर तिने नेमकं काय चॅलेंज दिलं आहे, ते बघा... सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत असलेला हाच तिचा व्हिडियो..

ठळक मुद्देहे वर्कआऊट करण्यासाठी खरोखरंच जबरदस्त स्टॅमिना लागतो आणि तो समंथाने दाखवून दिला आहे. 

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा प्रभूचं फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. ती काय करते किंवा काय नाही, या प्रत्येक गोष्टीचीच सोशल मिडियावर चांगलीच चर्चा होते. नवरा नागा चैतन्य याच्याशी झालेला घटस्फोट, त्यानंतर आयटम साँगदरम्यान तिचा बोल्ड लूक अशा काही करणांमुळे मध्यंतरी ती चांगलीच चर्चेत होती. आता सध्या पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे ती तिच्या फिटनेसमुळे. तिने इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडिओ (instagram video) शेअर केला असून तो पाहून तर फिटनेस क्षेत्रातील भल्याभल्यांना घाम फुटला आहे. 

 

आपल्याला माहितीच आहे की समंथा अतिशय फिटनेस फ्रिक (fitness freak) आहे. त्यामुळेच तर ती इन्स्टाग्रामच्या माध्यमातून नेहमीच वर्कआऊट, एक्सरसाईजचे वेगवेगळे प्रकार तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते आणि त्यांना फिटनेसबाबत मोटीव्हेट करते. आता सध्या समंथाने जो व्हिडिओ शेअर केला तो तिच्या फिटनेसची कमाल लेव्हल दाखविणारा आहे. यामध्ये समंथा घरच्याघरी जीमच्या कोणत्याही साहित्याशिवाय वर्कआऊट (level up challange without equipment) करताना दिसत आहे. हे वर्कआऊट करण्यासाठी खरोखरंच जबरदस्त स्टॅमिना लागतो आणि तो समंथाने दाखवून दिला आहे. 

 

हा व्हिडिओ शेअर करत समंथाने असं सांगितलं आहे, की अशा पद्धतीने लेव्हलअप करण्याचं चॅलेंज तिच्या फिटनेस ट्रेनरकडून म्हणजेच जुनैद शेख यांच्याकडून तिला मिळालं होतं आणि आता तिने तेच चॅलेंज तिच्या चाहत्यांनाही दिलं आहे. चॅलेंज देतानाच ती तिच्या चाहत्यांना सांगते आहे की २०२२ या वर्षाची सुरुवात अशा पद्धतीचे जबरदस्त चॅलेंज घेऊन करून बघा.. समंथाचा हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झाला असून त्याला २ दिवसांतच १५ लाख लाईक्स मिळाले आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही समंथाच्या या व्हिडिओचे कौतूक केले असून तिच्या फिटनेसला मनापासून दाद दिली आहे. 

 

हा व्यायाम करण्याचे कोणते फायदे..१. समंथा करते आहे, तशा पद्धतीचे वर्कआऊट केल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण क्रिया अधिक जलद होऊ लागते. २. या वर्कआऊटमुळे ऑक्सिजन धरून ठेवण्याची क्षमता वाढते.३. पाय, गुडघे, मांड्या आणि कंबर या अवयवांच्या स्नायुंचा व्यायाम होण्यासाठी हे वर्कआऊट परफेक्ट मानले जतो.४. हृदयाचे कार्य सुधारण्यासाठी, फुफ्फुसांची क्षमता वाढविण्यासाठीही या वर्कआऊटचा फायदा होतो. ५. लेग टोन्ड करण्यासाठी हे एक उत्तम प्रकारचे वर्कआऊट मानण्यात येते. ६. हे वर्कआऊट करण्याचे अनेक फायदे असले तरी सुरुवातीला हे वर्कआऊट फिटनेस ट्रेनरच्याच मार्गदर्शनाखाली करावे.  

टॅग्स :फिटनेस टिप्ससमांथा अक्कीनेनीसेलिब्रिटीइन्स्टाग्राम