टिव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजेच श्वेता तिवारी. "कसौटी जिंदगी की", या मालिकेतून तिने प्रत्येकाच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. श्वेता आता ४२ वर्षांची झाली आहे. तरी देखील तितकीच बोल्ड अँड ब्युटीफूल दिसते. तिने स्वतःला खूप मेन्टेन ठेवलं आहे. तिचे चाहते आजही तिच्या एका झलकवर घायाळ होत असतात. मात्र, तिने स्वतःला मेन्टेन नियमित व्यायाम आणि पोषक आहारापासून ठेवलं आहे. त्यामुळे ती आजही तितकीच सुंदर आणि मोहक दिसते. चला तर मग ती कोणतं डायट फॉलो करते, व्यायाम करताना ती काय करते, या सगळ्या गोष्टींची माहिती जाणून घेऊयात.
श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. ती आपल्या फॅशन सेन्स, फिटनेस आणि ग्लॅमरसाठी ओळखली जाते. श्वेता तिवारी जरी ४२ वर्षांची झाली असली तरी देखील तिने स्वतःला मेन्टेन ठेवले आहे. आणि ती अजूनही तरुणीच दिसते.
काही महिन्यांपूर्वी श्वेता तिवारीचे वजन खूप वाढले होते. यानंतर तिने फिट होण्याचा विचार केला. तिने वजनच कमी केले नाही तर यासह एब्स देखील बनवले. अलीकडेच, श्वेता तिवारीचे वैयक्तिक फिटनेस ट्रेनर आणि सेलिब्रिटी प्रशिक्षक प्रसाद नंदकुमार शिर्के यांनी श्वेताचा आहार आणि व्यायामाचा दिनक्रम शेअर केला आहे.
हृतिक रोशन, उर्वशी रौतेला यांसारख्या अनेक स्टार्सचे वैयक्तिक फिटनेस ट्रेनर असलेले सेलिब्रिटी कोच प्रसाद नंदकुमार शिर्के म्हणाले, "श्वेता तिवारी खूप फिटनेस फ्रीक आहे. तिने 'मैं हूं अपराजिता' या मालिकेद्वारे टीव्ही जगतात पुनरागमन केले आहे. शेड्यूल खूप टाईट असल्यामुळे तिला स्वतःला वेळ देता येत नाही. परंतु, जितका वेळ मिळेल त्यात ती उत्तम वर्कआऊट करते."
ट्रेनर नंदकुमार यांनी श्वेताच्या डायट बद्दल सांगितले की, "फिटनेस टिकवण्यासाठी श्वेता दिवसातून एकदाच जेवण करते. ती जेवणात 200 ते 300 ग्रॅम भाज्या, ज्वारीची एक भाकरी. 100 ग्रॅम पालक किंवा मेथीची भाजी. याशिवाय ती सकाळच्या नाश्त्यात 90 ग्रॅम ग्रीक दही आणि 8-10 बदाम खाते. संध्याकाळी, ती एक संत्रा आणि एक कप डिटॉक्स चहा घेते. कारण त्यात नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स असतात."
पुढे शिर्के सांगतात, "श्वेता तिवारी सध्या खूप व्यस्त आहे, त्यामुळे ती आठवड्यातून 3 दिवस वेट ट्रेनिंगसाठी जिममध्ये येते. वेट ट्रेनिंगमध्ये ती शरीराच्या 2 अवयवांसाठी वेट ट्रेनिंग घेते. याशिवाय ती 3 दिवस फंक्शनल ट्रेनिंग करते. योगासनांचाही तिच्या वर्कआउट रूटीनमध्ये समावेश आहे.
श्वेता ट्रायसेप्स, बॅक बायसेप्स, पाय आणि खांद्याचे स्नायू याचे एकत्र ट्रेनिंग घेते, श्वेताच्या डाएटमध्ये घरातील पदार्थांचा समावेश आहे, त्यामुळे घरच्या जेवणाने वजन कमी करणं अवघड आहे असं म्हणणाऱ्यांसाठी श्वेता हे एक उत्तम उदाहरण आहे. तिच्या आहारात हिरव्या भाज्यांचाही समावेश आहे. ज्यात तिला काकडी, टोमॅटो, पालक, लेट्युस खायला आवडते. एकच पदार्थ खाऊन कंटाळा येऊ नये म्हणून ती वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या खात असते."