Join us  

कॅल्शियमच्या कमतरतेनं हाडंच नाही मेंदूवरही होतो परिणाम, लक्षणं ओळखा-वेळीच करा उपाय कारण..

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 1:30 PM

Hypocalcemia Know Symptoms And Cure : शरीरात कॅल्शियम कमी झाल्यास जास्त थकवा येतो. ज्यामुळे उर्जा कमी होते आणि नेहमी सुस्ती येते.

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत जास्तीत जास्त लोकांना कॅल्शियमच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. यामागे डाएट आणि व्हिटामीन डी च्या कमतरतेचा समावेश आहे. डाएट आणि व्हिटामीन डी चा आहारात समावेश करून तुम्ही कॅल्शियमची कमतरता पूर्ण करू शकता. (Hypocalcemia Know Symptoms And Cure)

जेव्हा तुम्ही आहारात व्हिटामीन-D नं परीपूर्ण पदार्थांचे सेवन करत नाही  तेव्हा शरीरात कॅल्शियमची कमतरता भासते. यामुळे फक्त हाडंच कमकुवत होत नाहीत तर लोकांना हायपोकॅल्सिमीया नावाची मेंदूशी संबंधित आजारही होतात. हायपोकॅल्सिमिया मेंदूवर कसा परिणाम करते ते पाहूया. (Low Calcium In Body Cause Hypocalcemia Know Symptoms And Cure)

हायपोकॅल्सिमिया म्हणजे काय?

माय. क्लिव्हलॅण्ड  क्लिनिकच्या रिपोर्टनुसार ओरल कॅल्शियम पिल्सनं तुमची कॅल्शियम लेव्हल मेंटेन करता येऊ शकते. व्हिटामीन डी सप्लिमेंट्सचा आहारात समावेश करा. रक्तात कॅल्शियमचा स्तर कमी होतो तेव्हा हायपोकॅल्सिमियाची स्थिती उद्भवते. हा आजार होण्यामागे अनेक वेगवेगळ्या कंडीशन्स असतात.  शरीरात पॅराथायरॉईड हॉर्मोन्स  पीटीएच व्हिटामीन डी च्या असामान्य स्तराचे कारण ठरतात. ज्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर परिणाम  होतो.

सकाळी उठल्यानंतर गरम प्यायल्यानं खरंच वजन कमी होतं का? पाहा यात कितपत तथ्य

शरीरात कॅल्शियम कमी झाल्यास जास्त थकवा येतो. ज्यामुळे उर्जा कमी होते आणि नेहमी सुस्ती येते. यामुळे झोप न येण्याची स्थिती उद्भवते. ज्यामुळे लोकांना फोकस  करण्यात कमतरता, विसरण्याचे आजार आणि भ्रम स्थिती उद्भववते. हा त्रास सुरूवातीलाच कंबर आणि पायांमध्ये उद्भवतो. हायपोकॅल्सिमियाचा परिणाम मेंदूवर होतो आणि यामुळे भ्रम, मेमरी लॉस, लक्षात न राहणं, डेलिरियम, डिप्रेशन यांसारख्या गंभीर स्थिती उद्भवतात. 

पोटाचे टायर्स सुटलेत-कंबर लठ्ठ दिसते? २१ दिवस हे पदार्थ खा, मेणासारखी वितळेल चरबी-फिट दिसाल

हायपोकॅल्सिमियापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी चांगला आहार घ्या. व्हिटामीन डी युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. डेअरी उत्पादनांत  कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. ६ महिन्यातून एकदा तुम्ही कॅल्शियम टेस्ट नक्की करू शकता. 

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य