सोशल मीडियावर माधुरी नेहमीच एक्टिव्ह पाहायला मिळते. तिच्या फिटनेस आणि डान्सच्या कौशल्यामुळे ती नेहमीच लोकांच्या चर्चेचा विषय ठरते. सध्या सोशल मीडियावर माधुरीच्या योगा पोझचे व्हिडीओज तुफान व्हायरल होत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत असताना अभिनेत्रीनं म्हटलंय की, योगा सुरूवातीपासूनच मला प्रिय आहे. आता #InternationalYogaDay येणार आहे. या निमित्तानं मी तुम्हाला काही सोपी योगासनं दाखवणार आहे.
माधुरी दीक्षित नेने चाहत्यांना आरोग्यदायी जीवनशैलीसाठी दररोज योगा पोझेस करण्यास प्रोत्साहित करते. शुक्रवारी तिनं तिच्या वर्कआऊटची झलक देत लोकांना माहितीसुद्धा दिली आहे. या व्हिडीओत माधुरी मुद्रासन करताना तुम्हाला दिसून येईल. पचनक्रियेसाठी आवश्यक ठरत असलेल्या अवयवांना बळकट बनवण्यासाठी ही योगासनं फार महत्वाची आहेत.
तिच्या सोशल मीडिया हँडलरवकरून माधुरीने तिचे फिटनेस व्हिडिओ शेअर केले असून त्यात तिने हाफ हातांचे टी शर्ट घातले आहे. एका योगा मॅटवर तिनं पोझेस दिल्या आहेत. आपल्या पायांना दुमडून तिनं जमिनीला डोकं टेकवत मुद्रासन पूर्ण केलं आहे. पेंक्रियाजला सक्रिय करून मधुमेहाला कमी करण्यास हा आसन फायदेशीर ठरतो. आणि या आसनामुळे पोटाचा उत्तम व्यायाम होतो.
महत्त्वाचे म्हणजे माधुरी दीक्षित बर्याचदा तिचा डान्स, वर्कआउट व्हिडिओ चाहत्यांसह शेअर करते. माधुरी पती आणि मुलासह व्हिडिओ शेअर करते. जे चाहत्यांना खूप आवडतात. इंस्टाग्रामवर माधुरीचे 20 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. सौंदर्य क्षेत्रात माधुरी दीक्षित ही केवळ चाळीशी पन्नाशीच्या टप्प्यातील महिलांचीच आदर्श नाहीये. तरुण मुलीही माधुरीला आपला आदर्श मानतात आणि तिला फॉलो करतात. तिचा स्क्रीनवरचा अॅपिरिअन्स हा कधीही हेवी मेकअपचा नसतो.
तिच्या चेहऱ्यावर मेकअपचे केकी थर नसतात , आजही माधुरी तिच्या नैसर्गिक सौंदर्यासाठीच ओळखली जाते. शरीर आणि त्वचेवरचं हे सौंदर्य जपण्यासाठी माधुरी काय करत असेल असं कुतुहल सगळ्यांनाच असतं. सोशल मीडियावर वेळोवेळस वेगवेगळ्या व्हिडीओजच्या माध्यमातून माधुरी दीक्षित तिच्या फिटनेसबद्दल, त्वचेच्या काळजीबद्दल सांगत असते.
पंधरा मिनिटांची झटपट जादू
काही दिवसांपूर्वी माधुरीनं एक व्हिडीओ शेअर केला होता. माधुरीनं आपल्या व्हिडीओमध्ये सांगितले की, चेहेरा हा उदास, निस्तेज दिसत असला तर पंधरा मिनिटं स्वत:साठी काढावेत. घरात काकडी असतेच. काकडी गोल काप करुन चिरुन घ्यावी आणि मग हे काकडीचे काप गुलाबपाणी किंवा दुधात भिजत घालावेत. ते फ्रीजमध्ये पंधरा वीस मिनिटं ठेवावेत. तेवढ्या वेळात काकडी दुधात किंवा गुलाबपाण्यात छान भिजते.
पंधरा मिनिटानंतर हे भिजवलेले काकडीचे काप काढून चेहेऱ्यावर ठेवावेत. पुढचे पंधरा मिनिटं छान डोळे मिटून बसून राहावं. नंतर चेहेरा थंड पाण्यानं धुवावा. या उपायानं त्वचेवर तात्काळ चमक येते. चेहेरा एकदम ताजा तवाना दिसतो. केवळ कूठे बाहेर जायचं असेल तेव्हाच हा उपाय करावा असं नाही. जेव्हा केव्हा आपल्याला आपली त्वचा ही निस्तेज दिसेल तेव्हा हा उपाय केल्यास आपल्या त्वचेला आणि ती आरशात पाहून आपल्या मनाला छान वाटतं.