कोणत्या ना कोणत्या कारणाने मलायका नेहमीच चर्चेत असते... दर आठवड्यात ती तिच्या चाहत्यांना जो फिटनेस मंत्र देते, त्याचीही अनेक जण आतूरतेने वाट बघत असतात. या सिरिजद्वारे मलायकाने आजवर अनेक योगासने (yoga), वर्कआऊट सोशल मिडियावर शेअर केले आहेत. याच अनेक जणांना खूप फायदाही झाला आहे. या आठवड्यात मात्र मलायकाने एक व्हिडियो शेअर केला आहेच, पण त्यासोबतच तिच्या चाहत्यांना एक जबरदस्त चॅलेंज दिले आहे.
मलायकाने इन्स्टाग्रामवर (instagram)जो व्हिडियो शेअर केला आहे, तो खरोखरंच अतिशय कमाल आहे. यामध्ये मलायका किती फिट आहे, हे दिसून येते... तिने या व्हिडियोमध्ये उत्कटासन (utkatasan)करून दाखविले असून त्यामध्ये तिने रॉक ॲण्ड रोल प्रकार करून दाखविला आहे. रॉक ॲण्ड रोल करताना मलायका उत्कटासनच्या वेगवेगळ्या अवस्था करून दाखवत आहे. हे करताना तिने एकदाही हात खाली टेकवलेले नाहीत, यावरूनच तिचा कमालीचा फिटनेस दिसून येतो.
हा व्हिडियो करताना मलायका सगळ्यात आधी हात पुढे करून सरळ उभी राहिली होती. यानंतर ती गुडघ्यात वाकली, खाली बसली आणि चक्क झोपली, पुन्हा उठून बसली आणि पुन्हा सरळ उभी राहिली. रॉक ॲण्ड रोल प्रकारात तिने हे सगळे करून दाखवले. ही सगळी क्रिया करताना तिने कुठेही हात खाली टेकवलेले नव्हते. आपल्याला बऱ्याचदा हात न टेकवता बसता, उठताही येत नाही. तिथे ही मलायका चक्क उत्कटासनाचे रॉक ॲण्ड रोल करते आहे, हे खरोखरंच भन्नाट आहे. तिच्यासारखे उत्कटासनाचे रॉक ॲण्ड रोल जमेल तेव्हा जमेल. पण सध्या तरी आपण उत्कटासन करण्याचा प्रयत्न करुया.. उत्कटासन करण्यास सोपे असून त्यामुळे शरीराला भरपूर फायदा होतो.
उत्कटासन कसे करावे
How to do chair pose or Utkatasan?
उत्कटासन करण्यासाठी सगळ्यात आधी ताठ उभे रहावे. यानंतर दोन्ही पायांमध्ये एक फुटाएवढे अंतर ठेवावे. पाठीचा कणा ताठ असावा. दोन्ही समोर सरळ रेषेत आणावे आणि खुर्चीवर जसे बसतो तसे गुडघ्यात वाकून खाली बसण्याची पोझ घ्यावी. असे करताना दोन्ही हात सोबतच वर न्यावेत. ही अवस्था ३० सेकंद तरी टिकविण्याचा प्रयत्न करावा. उत्कटासनला इंग्रजीमध्ये चेअर पोझ असे म्हटले जाते. मलायकाने याच अवस्थेत रॉक ॲण्ड रोल केले आहे.
उत्कटासन करण्याचे फायदे
Benefits of doing Utkatasan
- उत्कटासन नियमितपणे केल्यामुळे मांड्या, पोटऱ्या व तळपायांचे स्नायू बळकट होतात.
- लेग टोन्ड होण्यासाठी हा व्यायाम अतिशय उपयुक्त ठरतो.
- पाठ आणि कंबरेचा व्यायाम होण्यासाठीही उत्कटासन योग्य आहे.
- मन शांत आणि एकाग्र होण्यासाठी उत्कटासन करण्याचा सल्ला दिला जातो.
- पोट सुटू नये, म्हणून हे आसन नियमितपणे करावे.