Lokmat Sakhi >Fitness > दिवसभर स्ट्रेस फ्री राहाण्यासाठी मलायका अरोरा रोज करते हे १ मिनिटांचं एक योगासन

दिवसभर स्ट्रेस फ्री राहाण्यासाठी मलायका अरोरा रोज करते हे १ मिनिटांचं एक योगासन

मनातली अस्वस्थता, अशांतता घालवण्यासाठी अभिनेत्री मलायका अरोराकडे (Malaika Arora) एक योग सिक्रेट आहे. फिट आणि स्ट्रेस फ्री (for stress free day) राहाण्यासाठी मलायका सर्वांना रोज न चुकता 1 मिनिट मार्जरासन (cat pose) करण्याचा सल्ला देते. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2022 07:48 PM2022-09-13T19:48:08+5:302022-09-13T19:57:09+5:30

मनातली अस्वस्थता, अशांतता घालवण्यासाठी अभिनेत्री मलायका अरोराकडे (Malaika Arora) एक योग सिक्रेट आहे. फिट आणि स्ट्रेस फ्री (for stress free day) राहाण्यासाठी मलायका सर्वांना रोज न चुकता 1 मिनिट मार्जरासन (cat pose) करण्याचा सल्ला देते. 

Malaika Arora have a one yoga secret for stress free day.. | दिवसभर स्ट्रेस फ्री राहाण्यासाठी मलायका अरोरा रोज करते हे १ मिनिटांचं एक योगासन

दिवसभर स्ट्रेस फ्री राहाण्यासाठी मलायका अरोरा रोज करते हे १ मिनिटांचं एक योगासन

Highlightsशारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी मार्जरासन फायदेशीर असतं.मार्जरासन करताना पाठीचं हाड, मणका, पोट, छाती आणि मान यांचा व्यायाम होतो.

मलायका अरोरा  (Malaika Arora) म्हणते की आठवडा सुरु होताच संपूर्ण आठवडाभर काय करायचं हे मी आधीच ठरवते. खरंतर ही बाब कामाचं नियोजन करण्यासाठी जेवढी चांगली आहे तितकाच या सवयीचा तोटाही आहे असं मलायका म्हणते. यामुळे ताण येतो. ताण आला की मग टेन्शननं कुठली कामं तर होत नाहीच आणि त्याचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होवून चिडचिड, रागराग होतो. अस्वस्थता, अशांतता निर्माण होते. हे टाळण्यासाठी मलायकाकडे एक योग सिक्रेट ( yoga for stress free day)  आहे. दिवसभर स्ट्रेस फ्री राहाण्यासाठी मलायका रोज 1 मिनिटं मार्जरासन करते. मार्जरासन (cat pose)  केल्याचा जेवढा फायदा शरीराला होतो त्यापेक्षा अधिका फायदा मानसिक शांततेसाठी, मनावरचा तणाव (benefits of doing  cat pose)  घालवण्यासाठी होतो. फिट आणि स्ट्रेस फ्री राहाण्यासाठी मलायका सर्वांना रोज न चुकता 1 मिनिट मार्जरासन करण्याचा सल्ला देते. मलायका म्हणते की केवळ सकाळीच नाही तर दिवसभरात कधीही खूप टेन्शन आल्यासारखं वाटलं तर मार्जरासन केल्यानं त्याचा परिणाम लगेच दिसतो. मार्जरासन केल्यानं लगेच आपल्या मनाला शांतता मिळते.

Image: Google

मार्जरासन कसं कराव?

मार्जरासन करण्यासाठी गुडघ्यावर बसावं. दोन्ही हात जमिनीवर टेकवून गुडघ्यावर आडवं बसावं. दोन्ही हात ताठ असावेत. श्वास सोडत डोकं छातीकडे आत आणावं आणि पाठ बाहेरच्या बाजूस वर करावी. या अवस्थेत पाठीवर ताण हेतो. मग श्वास घेत डोकं बाहेर काढून वर छताकडे बघावं आणि पाठ आतल्या बाजूस ओढावी. या अवस्थेत छातीवर आणि पोटावर ताण येतो.  4 ते 5 वेळा हे आसन करावं. किमान एक मिनिट हे आसन केल्यास त्याचे फायदे चांगले मिळतात. 

Image: Google

मार्जरासन का करावं?

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी मार्जरासन फायदेशीर असतं. मार्जरासन करताना पाठीचं हाड, मणका, पोट, छाती आणि मान यांचा व्यायाम होतो. मार्जरासन करताना या अवयवांवर ताण येवून त्यांचा चांगला व्यायाम होतो. दम्याची समस्या असलेल्यांनी मार्जरासन जरुर करावं असा सल्ला योग तज्ज्ञ देतात. हे आसन पाठदुखीवर उपचार करण्यासाठी फायदेशीर आहे. रोज एक मिनिट मार्जरासन केल्यास शरीर आणि मनावरचा ताण निघून जातो. मन शांत करण्यासाठी मार्जरासन हे उत्तम योग आसन आहे. 


 

Web Title: Malaika Arora have a one yoga secret for stress free day..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.