Lokmat Sakhi >Fitness > ऑफिसमध्ये एकाच जागी बसून पाठ व कंबर आखडली ? मलायका सांगते झटपट सोपा उपाय...

ऑफिसमध्ये एकाच जागी बसून पाठ व कंबर आखडली ? मलायका सांगते झटपट सोपा उपाय...

Malaika Arora nailed this tricky yoga pose; here’s how to do it : पाठ व कंबरदुखीसाठी मलायका रोज एक आसन करण्याचा सल्ला देते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2023 01:13 PM2023-04-07T13:13:45+5:302023-04-07T13:27:02+5:30

Malaika Arora nailed this tricky yoga pose; here’s how to do it : पाठ व कंबरदुखीसाठी मलायका रोज एक आसन करण्याचा सल्ला देते.

Malaika Arora practises Revolved Chair Pose in new pic. Here's why you should add the yoga asana to your routine | ऑफिसमध्ये एकाच जागी बसून पाठ व कंबर आखडली ? मलायका सांगते झटपट सोपा उपाय...

ऑफिसमध्ये एकाच जागी बसून पाठ व कंबर आखडली ? मलायका सांगते झटपट सोपा उपाय...

बॉलिवूडची ‘अनारकली गर्ल’ आणि फिटनेस क्वीन म्हणून अभिनेत्री मलायका अरोराला ओळखले जाते. अभिनयात तिने जास्त जम बसवला नसला तरी तिने फॅशन, फिटनेस, मॉ़डेलिंग, डान्स आणि रिआलिटी शोजमध्ये तिचा दबदबा आज ही कायम ठेवला आहे. मलायका अरोरा तिच्या फिटनेसमुळे कायम सोशल मीडियात चर्चेत असते. मलायका दर आठवड्यात तिच्या चाहत्यांना जो फिटनेस मंत्र देते, त्याचीही अनेकजण अगदी आतूरतेने वाट बघत असतात. मलायकाने आजवर अनेक व्हिडिओद्वारे योगासने (yoga), वर्कआऊट सोशल मिडियावर शेअर केले आहेत. याचा अनेक जणांना खूप फायदाही झाला आहे. मलायका बॉलिवूडमधील सर्वात फिट सेलिब्रिटीपैकी एक आहे. वयाच्या ४९ व्या वर्षीही तिचा फिटनेस आणि सौंदर्य कमालीचे दिसून येते.

मलायका सोशल मीडियाच्या माध्यमातून योगा व वर्कआऊट संदर्भातील अनेक पोस्ट शेअर करत असते. तिच्या या पोस्ट नुसत्या भन्नाट नसतात तर प्रेरणादायीही असतात. मलायकाचा स्वत:चा फिटनेस स्टुडिओ आहे. या ठिकाणी ती नियमित एक्‍सरसाइज आणि योगा सराव करताना दिसते. वेगवेगळ्या योगासनाचा सराव करण्याला प्राधान्य देणाऱ्या मलायका अरोराचा रिव्हॉल्व्ह चेअर पोज करतानाचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहे. ज्यात मलायका अरोरा एक नवीन योग आसन करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे(Malaika Arora practises Revolved Chair Pose in new pic. Here's why you should add the yoga asana to your routine).

मलायका करत असलेलं योगासन नेमकं कोणतं आहे ? 

दिवा योगाच्या इंस्टाग्राम हँडलने मलायका अरोराचा रिव्हॉल्व्ह चेअर पोज किंवा परिवृत्त उत्कटासनाचा (Revolved Chair Pose) सराव करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. मलायका या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये परिवृत्त उत्कटासन (Revolved Chair Pose) करताना दिसत आहे. रिव्हॉल्व्ह चेअर पोझ आपल्या शरीरातील अनेक स्नायूंवर कार्य करते ज्यामुळे आपले बॉडी पॉश्चर (Body Posture) सुधारण्यात मदत होते आणि आपली शारीरिक उंची वाढवण्यास मदत करते. हे आसन तुमची वरची पाठ, छाती आणि खांदे मोकळे करते तसेच पाठीचा खालचा भाग, घोटे, गोटे आणि मांड्या मजबूत करते. हे पोटाच्या स्नायूंना सक्रिय करण्यास मदत करते. या आसनाचा सराव करताना तुम्हाला जाणवणारा ताण या भागात चरबी कमी करण्यासाठी उष्णता निर्माण करतो. शरीराचे संतुलन आणि मुद्रा सुधारण्यासाठी रिव्हॉल्व्ह चेअर पोज (Revolved Chair Pose) हे एक चांगले योगासन आहे. याव्यतिरिक्त, ते आपल्या शरीराच्या वरच्या भागाला ताणून आणि मजबूत करून आपल्या मान, मणक्याचे आणि खांद्यामधील कडकपणा दूर करू शकते.

एकदा खाली बसल्यावर उठणे अवघड होते, करा ४ योगासने, बघा बदललेला फिटनेस...

परिवृत्त उत्कटासन कसे करावे ?

हे योगाआसन दिसताना जरी सोपे दिसत असले तरी ते करणे थोडे अवघड आहे. त्यामुळे हे योगाआसन करताना सुरुवातीला आपण खुर्चीची मदत घेऊन हे आसन करु शकतो. हे आसन रोज करण्याचा सराव झाल्यानंतर आपण खुर्चीचा वापर न करता देखील हे आसन करु शकता. 

१. परिवृत्त उत्कटासन करण्यासाठी सर्वप्रथम आपण एक खुर्ची घ्यावी.
२. आता खुर्चीवर बसा आणि आपले हात मांडीवर ठेवा. हे लक्षात ठेवा की या दरम्यान तुमच्या पायांचे तळवे जमिनीला स्पर्श करतील. 
३. श्वास घ्या आणि आपले हात जोडा आणि त्यांना नमस्काराच्या मुद्रेमध्ये ठेवा. 
४. आता श्वास सोडताना शरीराच्या डाव्या बाजूला वाकून उजवा कोपर आपल्या डाव्या गुडघ्यावर ठेवा. 
५. यादरम्यान तुमचे हात नमस्काराच्या मुद्रेत छातीजवळ असतील. 
६. आता किमान १० ते १५ सेकंद या आसनात रहा आणि श्वास घेत रहा. 
७. यानंतर पुन्हा पुर्वस्थितीत या आणि दुसऱ्या बाजूने हे आसन करा.   


गजर ठणाणा वाजतो तरी सकाळी लवकर उठवत नाही? अलार्म लावताना होणाऱ्या ३ चुका, बघा असा घोळ होतोय का?

परिवृत्त उत्कटासनाचे (Revolved Chair Pose) फायदे :- 

१. या आसनाच्या मदतीने खांदे, पाठीचा कणा आणि मानेचा आखडलेपणा दूर केला जाऊ शकतो. 
२. हे आसन पाठीच्या व कमरेच्या स्नायूंना बळकट करते आणि ते लवचिक बनवते. 
३. या आसनामुळे आपली आखडलेली कंबर, छाती आणि खांदे मोकळे होण्यास मदत होते. 
४. हे आसन आपल्या घोट्यांसाठी व गुडघ्यांसाठी देखील फायदेशीर ठरते
५. या आसनाच्या मदतीने तुमचं शरीर डिटॉक्स होत आणि तुमच्या संपूर्ण आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतो. 
६. या आसनामुळे तुमची श्वसनप्रक्रिया देखील सुधारते.

Web Title: Malaika Arora practises Revolved Chair Pose in new pic. Here's why you should add the yoga asana to your routine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.