बॉलिवूडमधील बहुतांश अभिनेत्री या वयाची पन्नाशी ओलांडली तरीही तितक्याच सुंदर दिसतात. या अभिनेत्री ऐन पंन्नाशीत देखील विशीच्या तरुणींसारख्या दिसतात. अशाच अभिनेत्रींपैकी कायम आपल्या आपल्या फिटनेसबद्दल चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा - खान. बॉलिवूडमधील फिटनेस फ्रिक अभिनेत्रींच्या यादीत मलायकाचे नाव सामील आहे. मलायका अरोराला बघून तिच्या वयाचा अंदाज लावणं तसं कठीणच आहे. कारण मॉडेल, अभिनेत्री असलेली मलायका कायमच खूप फिट असते. तरूण मुलींपासून ते अगदी महिलांकरता मलायका अरोरा आजही फिटनेस गोल सेट करते. मलायका वयाच्या पन्नाशी पर्यंत पोहोचली असली तरी देखील मलायका तेवढीच फिट आहे. तिच्या फिटनेसमागे खूप खडतर मेहनत आणि नियमबद्द रूटीन आहे.
मलायका वयाच्या ५० व्या वर्षीही इतकी तरुण आणि फिट दिसते की फिटनेसमध्ये ती आजच्या अभिनेत्रींना मागे टाकते. ती तिच्या फिटनेसशी कोणतीही तडजोड करत नाही आणि फिटनेस राखण्यासाठी रोज योगा करते. अभिनेत्री मलायका अरोरा फिटनेस फ्रिक आहे. ज्याची माहिती तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून कळते. मलायकाच्या इंस्टाग्रामवर योगा आणि एक्सरसाइजचे व्हिडीओ, फोटो मोठ्या प्रमाणात आहेत. अनेकदा आपल्या डाएटचे खास सिक्रेट देखील शेअर करताना दिसते. मलायकाच्या फिटनेस रूटीनबद्दल जाणून घेऊया(Malaika Arora Reveals the Yoga Poses that Keep Her Body Toned and Fit).
मलायका नेमकी कोणती योगासन करते ?
१. चक्की चालनासन :- चक्की चालनासन करण्यासाठी सर्वप्रथम जमिनीवर पाय लांब करून बसावे. त्यानंतर दोन्ही पाय दोन्ही विरुद्ध दिशेला रुंद करून घ्यावेत. आता आपले दोन्ही हात डोक्यावर नेऊन वर सरळ रेषेत ताट ठेवा. त्यानंतर हातांचे पंजे एकमेकांमध्ये पकडून ठेवा. आता दीर्घ श्वास घेऊन दोन्ही हात एकाच वेळी उजवीकडून सुरु करून डावीकडे गोलाकार वाळवून परत वर डोक्यावर आणा. हे करत असताना कमरेतून किंचित थोडे पुढे - मागे झुकावे. असे दोन्ही हात १० ते १५ वेळा गोलाकार स्थितीत फिरवून घ्यावे. आपण जसे जात्यावर पीठ दळतो तेव्हा जशी आपली स्थिती असते त्याप्रमाणेच स्थिती या आसनात केली जाते म्हणून याला चक्की चालनासन असे म्हटले जाते.
वजन कमी करण्याचा ५० - ३५ - १५ फॉर्म्युला, ऋजुता दिवेकर सांगतात लठ्ठपणा कमी करण्याची खास ट्रिक...
चक्की चालनासन करण्याचे फायदे :-
१. हे योगासन पोटाच्या स्नायूंना मजबूत आणि टोन करते.
२. पचन सुधारते.
३. मानसिक आरोग्य सुधारते.
४. तणाव दूर होतो.
५. रक्ताभिसरण वाढवते.
६. प्रजनन प्रणालीसाठी चांगले.
२. अर्ध कपोतासन :- सर्वप्रथम वज्रासनात खाली जमिनीवर बसावे. त्यानंतर एक पाय पुढे घेऊन तो गुडघ्यात वाकवून दुसऱ्या मांडीपाशी ठेवायचा. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत जमिनीला टेकवून डोके पुढे जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा. पुन्हा पाठ वर करुन मागे पाहण्याचा प्रयत्न करावा. असे दोन्ही पायांनी करायचे.
कोण म्हणतं वजन कमीच होत नाही? ४ साधे-सोपे उपाय-वजन कमी होणारच....
अर्ध कपोतासन करण्याचे फायदे :-
१. पाठीचा जडपणा दूर होतो.
२. कमरेच्या खालच्या शरीराच्या स्नायूंना मजबूत करते.
३. मज्जातंतूंना आराम देते.
३. अधो मुख श्वानासन :- योगा मॅटवर पोटावर झोपा. यानंतर श्वास घेताना शरीर आपल्या पायांवर आणि हातांवर उचलून टेबलसारखा आकार तयार करा. श्वास सोडताना, हळू हळू नितंब वरच्या दिशेने न्या.आपले कोपर आणि गुडघे ताठ ठेवा. शरीर उलट्या 'V' आकारात असेल याची खात्री करा. या आसनाचा सराव करताना खांदे आणि हात सरळ रेषेत राहिले पाहिजेत. तर पाय नितंबांच्या रेषेत राहतील. लक्षात ठेवा की तुमचे घोटे बाहेरील बाजूस असतील. आता हात जमिनीच्या दिशेने खाली दाबा आणि मान ताणण्याचा प्रयत्न करा. आपले कान हाताच्या आतील भागाला स्पर्श करत ठेवा आणि नजर नाभीवर केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. काही सेकंद या स्थितीत राहा आणि त्यानंतर गुडघे जमिनीवर ठेवा आणि पुन्हा टेबलासारख्या स्थितीत यावे.
सकाळी उठल्या उठल्या करा ३ गोष्टी, वजन होईल झरझर कमी-तब्येत एकदम फिट...
अधो मुख श्वानासन करण्याचे फायदे :-
१. मन शांत करते.
२. मणक्यासाठी उपयुक्त आसन.
३. खालच्या ओटीपोटाच्या स्नायूंना बळकट करते.
४. रक्ताभिसरण सुधारते.
५. पचन सुधारते.