Join us  

मसल स्ट्रॉंग हवेत, आणि फॅट्स कमी? मलायका अरोरा सांगते ३ आसने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 2:03 PM

Fitness tips by Malaika Arora: पंचेचाळिशीच्या आसपास पोहोचलेली मलायका एवढी फिट आणि हेल्दी कशी असा प्रश्न नेहमीच पडतो ना? बघा स्ट्राँग मसल्स आणि परफेक्ट फिगरसाठी ती काय करते ते...

ठळक मुद्देही योगासने स्नायुंना मजबूत करून शरीराला परफेक्ट शेप देण्यासाठी, फॅट्स कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत, असं ती सांगते आहे.

सेलिब्रिटीमलायका अरोरा हिने स्वत:ला कसं फिट (fitness of  Malaika Arora) ठेवलं आहे, हा नेहमीच एक चर्चेचा आणि तिच्या चाहत्यांसाठी औत्सूक्याचा विषय असतो. तिचे ग्लॅमरस फोटो आणि त्यातून दिसून येणारा तिचा फिटनेस कमालीचे असतात. तिचा हा फिटनेस आणि परफेक्ट टोन्ड बॉडी टिकून आहे ती केवळ ती करत असलेल्या नियमित वर्कआऊटमुळे. आपल्याला माहितीच आहे, की वर्कआऊटमध्ये (workout by Malaika) ती काय काय करत असते, हे ती नेहमी सोशल मिडियावर (social media) शेअर करत असते.

 

त्यानुसार तिने तिचा एक लेटेस्ट व्हिडिओ नुकताच इन्स्टाग्रामवर (instagram) शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मलायका योगासन करताना दिसत असून ही योगासने स्नायुंना मजबूत करून शरीराला परफेक्ट शेप देण्यासाठी, फॅट्स कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत, असं ती सांगते आहे. जर तुम्हाला नियमित व्यायाम करण्याची सवय असेल तर मलायकाने सांगितलेली योगासनं करायला सोपी आहेत. त्यामुळे करून बघायला काहीच हरकत नाही.

 

१. वसिष्ठासन (Side Plank Pose)वसिष्ठासन करण्यासाठी सगळ्यात आधी पर्वतासान करा. म्हणजे तुमच्या दोन्ही हातांचे तळवे आणि पायांचे तळवे जमिनीवर टेकवलेले आणि डोके जमिनीच्या दिशेने हवे. यानंतर हळूहळू एक हात वरच्या दिशेने न्यायला सुरुवात करा आणि त्याच दिशेने तुमचा चेहरा आणि बाकी शरीर वळवा. आता तुमच्या शरीराचा संपूर्ण भार एका हाताचा तळवा आणि पायांची बोटे यावर पेललेला असेल. या अवस्थेला वसिष्ठासन किंवा वसिष्ठ आसन म्हणतात. 

वसिष्ठासन करण्याचे फायदेवसिष्ठासन केल्यामुळे पाठ, मांड्या, हात आणि पायांच्या स्नायुंना मजबुती मिळते. मांडीवरची, पोटावरची चरबी कमी (helps to reduce belly fat) होण्यासाठी वसिष्ठासन करण्याचा उपयोग होतो. सगळ्याच स्नायुंना बळकट करण्यासाठी आणि शरीराला संतुलित ठेवण्यासाठी वसिष्ठासन करावे.

 

२. भुजंगासन (Cobra Pose)भुजंगासन करण्यासाठी जमिनीवर पालथे झोपा. यानंतर दोन्ही हात कोपऱ्यात वाकवून हाताचे तळवे तुमच्या छातीजवळ दोन्ही बाजूंनी ठेवा. आता मान, छाती, पाठ उचला आणि नजर छताकडे स्थिर ठेवा. या अवस्थेला भुजंगासन म्हणतात. भुजंगासन करण्याचे फायदेपोटावरची चरबी कमी करण्यासाठी तसेच हाताच्या आणि पाठीच्या स्नायुंना बळकटी देण्यासाठी हे आसन केले जाते. भुजंगासन केल्यामुळे मासिक पाळीतला त्रासही कमी होतो. पाठीच्या कण्याला बाक आला असेल तर भुजंगासन केल्यामुळे तो सरळ होतो आणि बॉडी पोश्चर (improves body posture) सुधारण्यास मदत हाेते. 

 

३. नौकासन (Boat Pose)यासाठी पाठीवर सरळ झोपा. यानंतर दोन्ही पाय सोबतच वर उचला. तसेच दोन्ही हातदेखील पोटाला समांतर ठेवून हातासोबतच डोके, मान, पाठ कंबर उचला. अशा अवस्थेत शरीराचा समतोल सांभाळण्याचा प्रयत्न करा.नौकासन करण्याचे फायदेशरीराच्या विविध अवयवांच्या स्नायुंना बळकटी देण्यासोबतच पोटावरची चरबी कमी करण्यासाठी नौकासन उपयुक्त ठरते. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्समलायका अरोरायोगासने प्रकार व फायदेव्यायामवेट लॉस टिप्सहेल्थ टिप्ससेलिब्रिटी