Lokmat Sakhi >Fitness > मलायका अरोरा सांगते फक्त ३० सेकंदाचा सोपा उपाय, मनावरचा ताण आणि डोळ्यांचा थकवा होईल दूर

मलायका अरोरा सांगते फक्त ३० सेकंदाचा सोपा उपाय, मनावरचा ताण आणि डोळ्यांचा थकवा होईल दूर

Fitness Tips by Malaika Arora: दिवसभरातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा उपाय करून बघा.. मनावरचा ताण (mental stress) हलका होऊन रिलॅक्स वाटेल, सकारात्मकता जाणवू लागेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2022 12:44 PM2022-10-11T12:44:24+5:302022-10-11T12:46:42+5:30

Fitness Tips by Malaika Arora: दिवसभरातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा उपाय करून बघा.. मनावरचा ताण (mental stress) हलका होऊन रिलॅक्स वाटेल, सकारात्मकता जाणवू लागेल.

Malaika Arora says Just 30 second exercise, that will reduce your mental stress and will relax your eyes | मलायका अरोरा सांगते फक्त ३० सेकंदाचा सोपा उपाय, मनावरचा ताण आणि डोळ्यांचा थकवा होईल दूर

मलायका अरोरा सांगते फक्त ३० सेकंदाचा सोपा उपाय, मनावरचा ताण आणि डोळ्यांचा थकवा होईल दूर

Highlightsया व्यायामामुळे डोळ्यांभाेवती रक्ताभिसरण अधिक उत्तम प्रकारे होते. त्यामुळे डोळे रिलॅक्स तर होतातच शिवाय डार्क सर्कल्स कमी करण्यासाठीही उपयोग होतो. 

मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या चाहत्यांना नेहमीच असे काही सोपे उपाय सांगत असते, जेणेकरून तिच्या चाहत्यांना फिट राहण्यास  मदत  होईल. तिने सांगितलेले काही सोपे व्यायाम, डाएट टिप्स, योगा या सगळ्या गोष्टीच फिटनेसच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या  ठरतात. त्यामुळे दर आठवड्यातच तिच्याकडून फिटनेस टिप्स ( Just 30 second exercise for mental health) ऐकण्यासाठी तिचे चाहते उत्सूक असतात. या आठवड्यात तिने एक अत्यंत सोपा उपाय सांगितला असून त्यासाठी अवघा ३० सेकंदाचा वेळ लागतो. शिवाय तुम्ही तुम्हाला आरामदायी वाटलेल्या कोणत्याही  जागी हा उपाय करू शकता.(How to reduce mental stress?)

 

मलायका अरोराने सांगितलेला उपाय
- आरोग्यासाठी, मानसिक त्रास कमी करण्यासाठी केवळ ३० मिनिटांत आपण काय करू शकतो, असा विचार कोणाच्याही मनात येणं अगदी साहजिक आहे. पण हा उपाय अतिशय लाभदायी असल्याचं मलायका सांगते.

आलिया भट- करिना कपूरची फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानीचा खास सल्ला, ५ व्यायाम, योगा कधीही-कुठेही.. कारण

- मांडी घालून किंवा खुर्चीवर ताठ बसा. दोन्ही तळहात एकमेकांवर ५ ते ६ सेकंद घासा आणि त्यानंतर पुढचे २० ते २५ सेकंद तळहात डोळ्यांवर ठेवून शांत बसून रहा.

-  मलायका म्हणते ३० सेकंदात होणारी ही एक सोपी कृती तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. ही कृती तुम्ही ५ ते ६ वेळा करू शकता.

 

तळहात घासून डोळ्यांवर लावण्याचे फायदे
१. मनावरचा ताण कमी होण्यास मदत होऊन मन रिलॅक्स होण्यास मदत होते.

२. काही सेकंदासाठी तरी आपण आपल्या चिंता, काळजी विसरतो आणि तणावमुक्त होतो.

३. शरीराचा थकवा घालविण्यासाठीही या व्यायामाचा फायदा होतो.

World Mental Health Day: डिप्रेशनशी सामना करणारे ८ सेलिब्रिटी, आजार न लपवता हिमतीने केला मानसिक आजाराचा सामना

४. शिवाय हा उपाय केल्यानंतर हातांमध्ये जी उर्जा निर्माण होते, ती डोळ्यांभोवती असणाऱ्या ६ स्नायुंसाठी अतिशय उपयुक्त् ठरते. यामुळे डोळ्यांचा थकवा घालविण्यासाठीही उपयोग होतो.

५. या व्यायामामुळे डोळ्यांभाेवती रक्ताभिसरण अधिक उत्तम प्रकारे होते. त्यामुळे डोळे रिलॅक्स तर होतातच शिवाय डार्क सर्कल्स कमी करण्यासाठीही उपयोग होतो. 


 

Web Title: Malaika Arora says Just 30 second exercise, that will reduce your mental stress and will relax your eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.