Lokmat Sakhi >Fitness > खूप टेन्शन येतं, मन शांत नाही? चक्रासन करा, मलायका अरोरा सांगतेय चक्रासन करण्याचे ५ फायदे

खूप टेन्शन येतं, मन शांत नाही? चक्रासन करा, मलायका अरोरा सांगतेय चक्रासन करण्याचे ५ फायदे

Malaika Arora Says the Benefits of Chakrasana: सतत टेन्शन येत असेल मन शांत नसेल तर चक्रासन करा, असा सल्ला फिटनेस फ्रिक मलायका अरोरा हिने दिला आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2023 02:40 PM2023-08-30T14:40:15+5:302023-08-30T14:42:02+5:30

Malaika Arora Says the Benefits of Chakrasana: सतत टेन्शन येत असेल मन शांत नसेल तर चक्रासन करा, असा सल्ला फिटनेस फ्रिक मलायका अरोरा हिने दिला आहे

Malaika Arora says the benefits of Chakrasana, How to do chakrasana? | खूप टेन्शन येतं, मन शांत नाही? चक्रासन करा, मलायका अरोरा सांगतेय चक्रासन करण्याचे ५ फायदे

खूप टेन्शन येतं, मन शांत नाही? चक्रासन करा, मलायका अरोरा सांगतेय चक्रासन करण्याचे ५ फायदे

Highlightsशारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी चक्रासन किती महत्त्वाचं आहे, याविषयीची माहिती मलायकाने नुकतीच एका इस्टाग्राम पोस्टद्वारे शेअर केली आहे

कधी कधी लहान लहान गोष्टींचंही आपण खूप टेन्शन (stress and tension) घेतो. मनावर सतत कसला तरी ताण आहे असं वाटत राहतं. मन अशांत असतं. अशा वेळेस ताण कमी होऊन शांत वाटावं म्हणून चक्रासन करून बघा, असं मलायका अरोरा (Malaika Arora) हिने सांगितलं आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी चक्रासन किती महत्त्वाचं आहे, याविषयीची माहिती मलायकाने नुकतीच एका इस्टाग्राम पोस्टद्वारे शेअर केली आहे ( How to do chakrasana?)

 

कसे करायचे चक्रासन?
मलायका सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. आठवड्यातून एकदा ती तिच्या चाहत्यांना फिटनेस मोटिव्हेशन देत असते. या अंतर्गत तिने नुकतेच चक्रासन करण्याचे फायदे सांगितले आहेत. चक्रासन करतानाची मलायकाची पोज बघून चाहत्यांनी पुन्हा एकदा तिच्या फिटनेसची तारिफ केली आहे.

विळी न वापरता नारळ खोवण्याच्या २ सोप्या ट्रिक्स, भराभर नारळ खोवून करा नारळीपौर्णिमा साजरी

चक्रासन करण्यासाठी सर्वात आधी जमिनीवर सतरंजी, योगा मॅट टाका आणि पाठीवर झोपा. यानंतर डोक्याच्या बाजूला दोन्ही हातांचे तळवे टेकवा. पाय गुडघ्यात दुमडा आणि तळपाय नितंबाच्या जवळ घ्या. आता तळहात आणि तळपायावर भर देऊन पाठ, कंबर, मान, डोके उचला. सुरुवातीला एकदम हे आसन जमणार नाही. त्यामुळे जेवढे जमेल तेवढेच करा. आसनस्थिती ३० ते ४० सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा.

 

चक्रासन करण्याचे फायदे
१. चक्रासन केल्यामुळे मेंदूला, डोक्याला चांगला रक्तपुरवठा होतो. त्यामुळे मनावरचा ताण कमी होऊन डोकं आणि मन शांत राहण्यास मदत होते.

२.ज्यांना अनिद्रेचा त्रास आहे किंवा रात्री शांत झोप लागत नाही, त्यांनाही चक्रासन करणे फायदेशीर ठरते.

खाणार का बार्बी डोसा? आता हा कोणता नवा प्रकार, गुलाबी डोशाचा पाहा व्हायरल व्हिडिओ

३. पाठीच्या कण्याचा चांगाला व्यायाम होण्यासाठी हे आसन उत्तम आहे.

४. बेली फॅट म्हणजेच पोटावरची चरबी कमी करण्यासाठीही चक्रासन करणे फायदेशीर ठरते.

५. मासिक पाळीदरम्यान ज्यांना पोटदुखी, रक्तस्त्राव याचा खूप त्रास होतो, त्यांच्यासाठीही हे आसन फायदेशीर आहे. 

 

Web Title: Malaika Arora says the benefits of Chakrasana, How to do chakrasana?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.