बॉलीवूडच्या काही सेलिब्रिटी आठवड्यातून एकदा फिटनेस, डाएट, सौंदर्य याविषयीच्या पोस्ट सोशल मिडियावर शेअर करत असतात आणि त्यांच्या चाहत्यांना त्या- त्या गोष्टीबाबत जागरुक करण्याचा प्रयत्न करतात. फिटनेस फ्रिक मलायका अरोरा ही त्यापैकीच एक. दर सोमवारी मलायका तिचा एक फिटनेस व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते आणि त्या व्यायामाचे महत्त्व काय, हे समजावून सांगत असते. त्याचप्रमाणे या आठवड्यासाठीही मलायकाने एक वर्कआऊट व्हिडिओ काही तासांपुर्वीच पोस्ट केला आहे.(Malaika Arora's last fitness mantra for this year 2022)
या पोस्टमध्ये ती म्हणतेय की मी पॉवरफूल आहे आणि मी जशी आहे, तसं असण्यावर माझं प्रेम आहे.. तुम्ही यावर्षी जे काही मिळवलंय ते तुमचं यश एन्जॉय करा आणि पुढच्यावर्षीही जे काही मिळवाल ते सगळं साजरं करत रहा...
ड्रेस मोठा झाला, सैल होतोय? अल्टर न करताच करा परफेक्ट मापाचा एका मिनिटात, बघा झटपट भन्नाट आयडिया
असं म्हणतं तिने चाहत्यांना एक प्रश्नही विचारला आहे की या वर्षात तुम्ही असं एखादं वर्कआऊट केलं का, की त्यामुळे खरंच तुम्हाला तुमच्यातली ताकद समजून आली? हे सांगतानाच तिने एक वर्कआऊट व्हिडिओही शेअर केला आहे.
यामध्ये ती स्ट्रेचिंग प्रकारातला एक व्यायाम करते आहे. बेल्टच्या मदतीने ती जे काही स्ट्रेचिंग करते आहे त्याचा फायदा पायाचे स्नायू बळकट करण्यासाठी होतो.
बेल्टमध्ये एक पाय अडकवायचा आणि पाठीचा कणा ताठ ठेवत कंबरेतून खाली वाकायचं, अशा पद्धतीचा तिचा व्यायाम आहे. कुठल्याही प्रकारच्या स्ट्रेचिंगमुळे स्नायूंची ताकद तर वाढतेच पण जाॅईंट्सची हालचाल होऊन ते अधिक लवचिक होतात. तसेच रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होण्यासही फायदा होतो. अंग मोकळं होण्यासाठीही स्ट्रेचिंगची मदत होते.