Lokmat Sakhi >Fitness > पोटावरची चरबी कमी करण्यासाठी मलायका अरोरा सांगतेय दंड योगा, बघा कसा करायचा हा व्यायाम 

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी मलायका अरोरा सांगतेय दंड योगा, बघा कसा करायचा हा व्यायाम 

Exercise For Reducing Belly Fat: सुटलेलं पोट आणि कंबरेवरची चरबी कमी करायची असेल, तर मलायकाने एक उत्तम व्यायाम सुचवला आहे. करून बघा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2022 05:10 PM2022-11-14T17:10:31+5:302022-11-14T17:11:41+5:30

Exercise For Reducing Belly Fat: सुटलेलं पोट आणि कंबरेवरची चरबी कमी करायची असेल, तर मलायकाने एक उत्तम व्यायाम सुचवला आहे. करून बघा.

Malaika Arora suggests Danda yoga for reducing belly fat, Benefits of Danda yoga | पोटावरची चरबी कमी करण्यासाठी मलायका अरोरा सांगतेय दंड योगा, बघा कसा करायचा हा व्यायाम 

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी मलायका अरोरा सांगतेय दंड योगा, बघा कसा करायचा हा व्यायाम 

Highlightsहात आणि पायांच्या स्नायूंचे उत्तम स्ट्रेचिंग होण्यासाठी हा व्यायाम उपयुक्त आहे.  बॉडी रिलॅक्सेशनसाठी हा व्यायाम चांगला मानला जातो.

बॉलीवूडची फिटनेस क्वीन मलायका अरोरा (Malaika Arora) हिच्या आठवड्याची सुरुवात नेहमीच अतिशय उत्स्फूर्तपणे होत असते. तिचा उत्साह, तिच्यातली उर्जा तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचविण्याचा तिचा कायम प्रयत्न असतो. म्हणूनच दर आठवड्याला एक फिटनेससंबंधी व्हिडिओ शेअर करून ती तिच्या चाहत्यांना फिटनेस, आरोग्य याविषयी जागरुक करण्याचा प्रयत्न करत असते. आता या आठवड्यासाठी सुद्धा तिने तिच्या चाहत्यांना फिटनेस मोटिव्हेशन दिले असून सुटलेलं पोट कमी करण्यासाठी (Danda yoga for reducing belly fat) काही खास व्यायाम सांगितले आहेत. 

 

कोणता व्यायाम करतेय मलायका?
पोटावरचे टायर्स आणि कंबरेवरची चरबी कमी कशी करायची, हा अनेकांसमोरचा प्रश्न आहे. कारण आजकाल बहुतेक जणांचं काम बैठ्या स्वरुपाचं असून चालण्याचं प्रमाण कमी झालं आहे. याच प्रश्नाचं एक सोपं उत्तर मलायकाने तिच्या या व्हिडिओतून दिलं आहे.

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडतेय? वापरा ५ पदार्थ, त्वचा राहील मुलायम आणि चमकदार

या व्हिडिओमध्ये मलायका दंड योगा करताना दिसत असून हा तिच्या आवडत्या व्यायामांपैकी एक व्यायाम आहे. यामध्ये तिने लाकडी दांडा हातात घेतला असून त्याच्या मदतीने ती वेगवेगळे व्यायाम करते आहे. सगळ्यात आधी तर तिने तो दांडा दोन्ही हातांनी डोक्यावर घेतला. त्यानंतर पाय एका जागी स्थिर ठेवून शरीर उजवीकडे आणि डावीकडे झुकवले. त्यानंतर पायांची विशिष्ठ हालचाल करत काही व्यायामही केले.

 

दंड योगा करण्याचे फायदे
१. असे व्यायाम केल्यामुळे पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते.

२. शिवाय कंबरेच्या अवतीभाेवती असणारी चरबीही कमी होऊन शरीर सुडौल दिसू लागते. 

आई करत होती भन्नाट डान्स आणि व्हिडिओ काढताना तिचा चिमुकला पाहा करतोय काय.... धमाल व्हायरल व्हिडिओ

३. हात आणि पायांच्या स्नायूंचे उत्तम स्ट्रेचिंग होण्यासाठी हा व्यायाम उपयुक्त आहे. 

४. हाताच्या दंडावर चरबी वाढत असल्यास अशा पद्धतीचा व्यायाम करा.

५. बॉडी रिलॅक्सेशनसाठी हा व्यायाम चांगला मानला जातो.

 

Web Title: Malaika Arora suggests Danda yoga for reducing belly fat, Benefits of Danda yoga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.