Lokmat Sakhi >Fitness > Malaika Arora's diet and workout secrets : समोर आलं ४८ व्या वर्षी तरूण दिसणाऱ्या मलायकाचं फिटनेस सिक्रेट; दिवसभरात काय काय खाते? वाचा

Malaika Arora's diet and workout secrets : समोर आलं ४८ व्या वर्षी तरूण दिसणाऱ्या मलायकाचं फिटनेस सिक्रेट; दिवसभरात काय काय खाते? वाचा

Malaika Arora's diet and workout secrets : मलायका अरोराला नाश्त्यात ताजी फळे किंवा दक्षिण भारतीय पदार्थ खायला आवडतात. स्नॅक्समध्ये तिला 1 ग्लास ताज्या भाज्यांच्या ज्यूससह 2 ब्राऊन ब्रेड टोस्ट खायला आवडते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 11:48 AM2022-05-25T11:48:00+5:302022-05-25T14:10:10+5:30

Malaika Arora's diet and workout secrets : मलायका अरोराला नाश्त्यात ताजी फळे किंवा दक्षिण भारतीय पदार्थ खायला आवडतात. स्नॅक्समध्ये तिला 1 ग्लास ताज्या भाज्यांच्या ज्यूससह 2 ब्राऊन ब्रेड टोस्ट खायला आवडते.

Malaika Arora's diet and workout secrets : Malaika arora health tips at the age of 48 she keeps herself slim and fit | Malaika Arora's diet and workout secrets : समोर आलं ४८ व्या वर्षी तरूण दिसणाऱ्या मलायकाचं फिटनेस सिक्रेट; दिवसभरात काय काय खाते? वाचा

Malaika Arora's diet and workout secrets : समोर आलं ४८ व्या वर्षी तरूण दिसणाऱ्या मलायकाचं फिटनेस सिक्रेट; दिवसभरात काय काय खाते? वाचा

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) 48 वर्षांची असली तरी तिनं स्वत:ला मेंटेन ठेवलं आहे. फिटनेसच्या बाबतीत मलायका अरोरासोबत स्पर्धा करणे सोपे काम नाही, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. मात्र, तिच्या फिटनेसमागे मलायकाची मेहनत आणि परफेक्ट डाएट प्लॅन हे कारण आहे. मलायका आजकाल अर्जुन कपूरला डेट करत आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. (Malaika Arora Fitness Mantra) या दोघांच्या लग्नाची बरीच चर्चा आहे.

मलायका अरोरा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर वर्कआउट करतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.  मलायका तिच्या फिगर आणि स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या एका मुलाखतीत मलायका म्हणाली होती की, 'आपले शरीर हे एक मंदिर आहे ज्याचा आदर केला पाहिजे. तुम्ही कितीही व्यस्त असलात तरीही दररोज थोडा वेळ तुमच्या फिटनेसला द्यायला हवा. (Malaika Arora's diet and workout secrets)

फिटनेससाठी मलायका काय करते?

मलायकाला घरचे जेवण आवडते. ती जास्त कॅलरी आणि तळलेल्या खाण्यापासून दूर राहते. ती तिच्या आहारात नट्स आणि हंगामी फळांचा समावेश करते. यासोबतच नारळपाणी ताज्या भाज्या तिच्या आहाराचा भाग बनवते. त्याच वेळी, मलायका दिवसभर स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मलायका तिच्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्यासह लिंबू आणि मध पिऊन करते. मलायका रोज वर्कआउट करते. तिच्या दिनक्रमात कार्डिओ, वेट ट्रेनिंग, पोहणे आणि योगा यांचा समावेश असतो.

मलायकाचा डाएट प्लॅन

मलायका अरोराला नाश्त्यात ताजी फळे किंवा दक्षिण भारतीय पदार्थ खायला आवडतात. स्नॅक्समध्ये तिला 1 ग्लास ताज्या भाज्यांच्या ज्यूससह 2 ब्राऊन ब्रेड टोस्ट खायला आवडते. दुपारी मलायका हिरव्या भाज्या, अंकुरलेले कोशिंबीर, चिकन/मासे किंवा 1 रोटी सोबत ब्राऊन राइस खाते. रात्रीच्या जेवणात अभिनेत्री उकडलेल्या भाज्या आणि सॅलड किंवा सूप घेते.

Web Title: Malaika Arora's diet and workout secrets : Malaika arora health tips at the age of 48 she keeps herself slim and fit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.