Lokmat Sakhi >Fitness > फिट राहण्यासाठी मलायका अरोरा करते वॉटर थेरपी, ही थेरपी नक्की असते काय?

फिट राहण्यासाठी मलायका अरोरा करते वॉटर थेरपी, ही थेरपी नक्की असते काय?

Malaika Arora's Healthy Morning Drinks : Malaika Arora Drinks Much More Water : The Secret To Malaika Arora's Morning Detox Drink : Malaika Arora Water Therapy : काय आहे मलायकाच्या सिक्रेट 'वॉटर थेरपी' चे गुपित...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2024 15:36 IST2024-12-17T15:31:56+5:302024-12-17T15:36:12+5:30

Malaika Arora's Healthy Morning Drinks : Malaika Arora Drinks Much More Water : The Secret To Malaika Arora's Morning Detox Drink : Malaika Arora Water Therapy : काय आहे मलायकाच्या सिक्रेट 'वॉटर थेरपी' चे गुपित...

Malaika Arora's Healthy Morning Drinks Malaika Arora Drinks Much More Water The Secret To Malaika Arora's Morning Detox Drink | फिट राहण्यासाठी मलायका अरोरा करते वॉटर थेरपी, ही थेरपी नक्की असते काय?

फिट राहण्यासाठी मलायका अरोरा करते वॉटर थेरपी, ही थेरपी नक्की असते काय?

बॉलिवूड मधील सगळ्यात फिट अँड फाईन असणाऱ्या अभिनेत्रींपैकी मलायका अरोरा - खानचे नाव सगळ्यात आधी येते. मलायकाने स्वत:ला ज्या पद्धतीने फिट ठेवलं आहे, ते खरोखरंच कमाल आहे, म्हणूनच तर पन्नाशी (Malaika Arora Water Therapy) ओलांडलेली असताना देखील मलायका अजूनही तितकीच तरुण आणि फिट दिसते.  मलायका अरोराला बघून तिच्या वयाचा अंदाज लावणं तसं कठीणच आहे. खरंतर, तिच्या फिटनेसमागे खूप खडतर मेहनत आणि नियमबद्द ( The Secret To Malaika Arora's Morning Detox Drink) रूटीन आहे. मलायका वयाच्या ५० व्या वर्षीही (Malaika Arora's Healthy Morning Drinks) इतकी तरुण आणि फिट दिसते की फिटनेसमध्ये ती आजच्या अभिनेत्रींना मागे टाकते. ती तिच्या फिटनेसशी कोणतीही तडजोड करत नाही आणि फिटनेस राखण्यासाठी ती वेगवेगळ्या सिक्रेट थेरपीचा वापर करताना दिसते. 

वजन कमी करण्यासोबतच, आरोग्य उत्तम राहण्यासाठी तसेच शरीराची कार्ये सुरळीत व्हावी यासाठी पाणी अतिशय महत्वाचे असते. आपल्या डेली रुटीनमध्ये पाणी फार महत्वाची भूमिका बजावते. यासाठीच मलायका देखील तिचा फिटनेस आणि सौंदर्य यांची काळजी घेण्यासाठी एक खास सिक्रेट 'वॉटर थेरपी' फॉलो करते. मलायकाची ही वॉटर थेरपी म्हणजे नेमकं काय आहे ? या वॉटर थेरपीचा वापर आपल्या आरोग्याला कसा फायदा होतो ते पाहूयात.

मलायकाची सिक्रेट 'वॉटर थेरपी' म्हणजे काय ? 

नुकतेच मलायका अरोराने कर्ली टेल्सला दिलेल्या एका मुलाखतीनुसार, मलायकाच्या दिवसाची सुरुवात सकाळी ६:३० ते ७:०० वाजताच्या दरम्यान होते. त्यानंतर मलायकाच्या दिवसाची सुरुवात वॉटर थेरपीने होते, जी किमान ४५ मिनिटे ते १ तास चालते. या खास वॉटर थेरपीमध्ये मलायका एका विशिष्ठ थोड्या थोड्या गॅपने वेगवेगळ्या प्रकारचे पाणी पिते. अशा प्रकारे थोड्या वेळाच्या अंतराने ती आल्याचे पाणी, हळदीचे पाणी, जिरा वॉटर, लेमन वॉटर असे वेगवेगळ्या पदार्थांचा अर्क असलेले पाणी पिते. त्यानंतर मलायका वेगवेगळ्या प्रकारच्या फळं आणि भाज्या असलेला ग्रीन ज्यूस पिते. याचबरोबर मलायका कोणताही पदार्थ खाण्याआधी भरपूर प्रमाणांत पाणी पीत असल्याचे तिने सांगितले आहे. या वॉटर थेरपी नंतर मलायका एक तासभर योगा करते. 

थंडीच्या दिवसांत चहा करताना वापरा ८ सिक्रेट पदार्थ, चहाचा स्वाद वाढेल-आरोग्यासही फायदेशीर...

कॅलरी नाही तर करते पोर्शन कंट्रोल... 

मलायका आपल्या डाएटचे डेली रुटीन फॉलो करताना कॅलरीज नाही तर पोर्शन कंट्रोल करण्यावर अधिक भर देते. योगा करुन झाल्यावर मलायका हेव्ही ब्रेकफास्ट करते. ब्रेकफास्टमध्ये ती तिच्या आवडीचे पदार्थ खाते. मलायका पोहे, पराठा, डोसा असे तिच्या आवडीचे पदार्थ नाश्त्यात खाते. त्यानंतर मलायका दुपारचे जेवण घेते. जेवणात ती नेहमीचे जे काही भात, चपाती, भाजी, डाळ पदार्थ असतील ते खाते. मलायका कोणतेही पदार्थ खाण्यासाठी डिश किंवा कोणत्याही प्रकारची प्लेट घेत नाही. तिचा एक बाऊल ठरलेला आहे त्याच बाऊलमध्ये आणि बाऊलच्या योग्य मापानुसार ती अन्नपदार्थ घेऊन त्यातच खाते. त्यानंतर मलायका रात्रीचे जेवण संध्याकाळी ७ वाजायच्या आतच करते. मलायका दुपारच्या जेवणात जास्त कार्ब्स असलेले पदार्थ खाते त्या तुलनेने रात्रीच्या जेवणात शक्यतो कार्ब्स टाळते किंवा कमी प्रमाणांत कार्ब्स असलेले पदार्थ खाते. 

दरवर्षी ठरवता वजन कमी करु पण होतच नाही? यंदा वजन नक्की होईल कमी-वाचा ७ टिप्स...


'तारक मेहता' फेम दीप्ती साधवानीने केलं तब्बल १७ किलो वजन कमी, बघा डाएट प्लॅन- वेटलॉसचे सिक्रेट...

मलायका रात्रीच्या जेवणात पचायला हलके असणारे पदार्थच खाते. रात्रीच्या जेवणात तिला दालखिचडी खायला फारच आवडते. तुपाची फोडणी दिलेली पिवळी दालखिचडी हे तिचे रात्रीचे जेवण असते. यासोबतच तिला पनीरचा ठेचा देखील फार आवडतो. कधी कधी ती आपल्या जेवणात पनीरचा ठेचा देखील आवडीने खाते.

Web Title: Malaika Arora's Healthy Morning Drinks Malaika Arora Drinks Much More Water The Secret To Malaika Arora's Morning Detox Drink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.