बॉलीवूडमध्ये फिटनेसबाबत मलायका अरोराला चॅलेंज (fitness freak Malaika Arora) करू शकणारी व्यक्ती कदाचितच सापडेल. मलायकाने स्वत:ला ज्या पद्धतीने फिट ठेवलं आहे, ते खरोखरंच कमाल आहे... म्हणूनच तर चाळीशी ओलांडलेली मलायका अतिशय सहजपणे योगासनातले अनेक अवघड आसन लिलया करू शकते. मलायकाने नुकतंच तिच्या चाहत्यांना या आठवड्यासाठी मंडे मोटीव्हेशन (Monday Motivation by Malaika Arora) दिलं असून सध्या तर या व्हिडियोतला तिचा फिटनेस पाहून चाहते थक्क झाले आहेत. पिंच मयुरासनला (pincha mayurasana) इंग्रजीमध्ये fore arm stand म्हणतात.
मलायकाने तिचा एक व्हिडियो नुकताच इन्स्टाग्रामवर (instagram) शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये ती पिंच मयुरासन हा आसनप्रकार करताना दिसते आहे. मयुरासन हा आसनप्रकार योगासनात खूप अवघड मानला जातो. त्यातही तीन प्रकार आहेत. एक साधं मयुरासन, दुसर पिंच मयुरासन आणि तिसरं म्हणजे अर्ध पिंच मयुरासन. यापैकी मलायकाने पिंच मयुरासन केलं असून मयुरासनचे हे तिन्ही प्रकार करण्यासाठी खरोखरंच कमालीचा स्टॅमिना आणि फिटनेस लागतो. हे आसन मलायका तिच्या फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली करते आहे. एक- दोन प्रयत्नांतच मलायकाला पिंच मयुरासनची योग्य अवस्था घेता आली. तिच्या या व्हिडियोला तिने I have a firm belief that perfection is a myth but consistency helps one focus on progress अशी कॅप्शन दिली आहे. कॅप्शनमध्ये सांगितल्याप्रमाणे तिने फिटनेसमध्ये टिकवलेल्या सातत्यामुळेच तिला हे आसन करणे शक्य झाले.
कसं करायचं पिंच मयुरासन?
How to do pincha mayurasana?
- हे एक अतिशय अवघड आसन आहे. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे आसन तुमच्या फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाखालीच करावं.
- हे आसन करण्यासाठी पालथे झोपा. त्यानंतर हात कोपऱ्यातून वाकवा आणि कोपऱ्यापासून ते तळव्यापर्यंत जमिनीवर ठेवा.
- आता मान, छाती, डोके आणि इतर शरीर उचलण्याचा प्रयत्न करा.
- हळूहळू तळपाय शरीराच्या जवळ आणण्यचा प्रयत्न करा आणि त्यानंतर एक पाय वर करून दुसरा पायही वर उचला.
- आता या अवस्थेत तुमच्या शरीराचा सगळा भार हाताच्या कोपऱ्यांवर असेल. दोन्ही पाय सरळ एका रेषेत वर असतील.
- ही अवस्था म्हणजेच पिंच मयुरासन. ही अवस्था टिकवून शरीराचा तोल सांभाळणं हे खरोखरंच कौशल्याचं काम आहे.
पिंच मयुरासन करण्याचे फायदे
Benefits of doing pincha mayurasana
- एकाग्रता वाढण्यासाठी हे आसन खूप उपयुक्त आहे.
- रक्ताभिसरण क्रियेचा वेग पिंच मयुरासन केल्याने वाढतो.
- पचनक्रिया सुधारण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे.
- हात, दंड येथील स्नायूंच्या मजबुतीसाठी पिंच मयुरासन करणे फायद्याचे ठरते.
- मन शांत होण्यास हे आसन फायदेशीर ठरते. त्यामुळे एन्झायटी, डिप्रेशन, मानसिक त्रास यांनी त्रस्त असणाऱ्या रूग्णांनी हे आसन नियमितपणे करावे.