Join us  

४९ व्या वर्षी सुपरफिट दिसणाऱ्या मलायकाचं ब्युटी सिक्रेट; ३ योगासन करा-पन्नाशीत विशीतले दिसा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 12:13 PM

मलायकाच्या चेहऱ्यावर तिच्या वयाचा प्रभाव दिसून येत नाही. या वयातही मलायका इतकी फिट दिसते. 

आपण म्हातारपणातही फिट राहावं, त्वचा चमकदार दिसावी, त्वचेवर जास्त  सुरकुत्या दिसून नयेत असं प्रत्येकाला वाटतं. पण रोजच्या घाई-गडबडीत स्वत:कडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळत नाही त्यामुळे वयाआधीच लोक वयस्कर दिसू लागतात. (How to get fit fast) बॉलिवूड अभिनेत्री वाढत्या वयातही जास्त तरूण आणि फिट दिसतात. या यादीत मलायका अरोरा या अभिनेत्रीचे नाव टॉपला आहे. (What is the fastest way to get fit at home)  कारण मलायका एका २० वर्षीय मुलाची आई असून तिचे वय  ४९ वर्ष आहे तरी देखील मलायकाच्या चेहऱ्यावर तिच्या वयाचा प्रभाव दिसून येत नाही. या वयातही मलायका इतकी फिट दिसते. (The Best Way to Get Fit Fast)

तुम्हालाही अशी फिगर आणि चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर  मलायकाचं फिटनेस रुटीन फॉलो करू शकता.  मलायका (Malaika Arora) स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगासन करते. ती कधीच तिचे योगासनांचे सेशन्स कधीच चुकवत नाही.  ती इंस्टाग्रामचच्या माध्यमातून फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत असते. याशिवाय फायदे पण सांगते. अलिकडेच तिने योगासनांच व्हिडिओ शेअर केला आहे. (Malaika Arora Fitness Routine)

मरिच्यासन

मलायका स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगासनं करते. ही योगासनं केल्याने वजन आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. ताण-तणाव कमी होतो याशिवाय हाडं मजबूत राहतात. डायजेशन सुधारते याशिवाय पोटाशी संबंधित समस्या टाळता येतात. याशिवाय चेहऱ्यावरही ग्लो येतो.

नवरात्राच्या ९ दिवसात भराभर घटेल पोटाची चरबी; फराळाचे हे पदार्थ खा-फिगर दिसेल मेंटेन

गोमुखासन

(Image Credit- Styleoga)

मलायकाच्यामते हे योगासन केल्याने हिप्सवर चांगले प्रेशर येते. यामुळे पाठीचा कणाही चांगला राहतो. याव्यतिरिक्त फुफ्फुसं चांगल्या पद्धतीनं काम करतात. खांद्यांची चवचिकताही वाढते.  हे आसन करण्यासाठी सगळ्यात आधी जमिनीवर बसा आणि फोटो दाखवल्याप्रमाणे पायांची घडी घाला. त्यानंतर हातांची स्थिती फोटोत दाखवल्याप्रमाणे ठेवा.

पोट सुटत चाललंय, व्यायामासाठी वेळच नसतो? रोज इतका वेळ चाला-आपोआप कमी होईल फॅट

चक्रासन

मलायका स्वत:ला फिट ठेवण्यासाठी चक्रासन करते. हे योगासन शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, यामुळे यामुळे पाठीचा कणा मजबूत होतो. मानसिक आरोग्य चांगले राहते. याशिवाय ताण-तणाव दूर होतो आणि डोकंसुद्धा शांत राहते. याशिवाय पोट, कंबरेची चरबी कमी होऊन चेहऱ्यावर ग्लो येतो.

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स