फिटनेसच्या बाबतीत मंदिरा बेदीला फॉलो करणारे अनेक लोकं आहेत. कारण बॉलीवूडमधले जे काही कलाकार फिटनेसच्या बाबतीत अगदीच पर्टिक्युलर असतात, त्यांच्यापैकीच एक आहे मंदिरा बेदी. त्यामुळे ती फिटनेससाठी काय करते, तिचा रेग्युलर वर्कआऊट, डाएट प्लॅन कसा आहे, याविषयीही अनेक जणांना उत्सूकता असते. त्यामुळे मंदिरादेखील नेहमीच फिटनेस, वर्कआऊट अशा वेगवेगळ्या पोस्ट टाकून तिच्या चाहत्यांना माहिती देत असते.
मंदिराने नुकताच तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ती प्लॅंक वर्कआऊट करताना दिसते आहे. गुलाबी रंगाचे वर्कआऊट कपडे तिने घातले असून तिने ज्या पद्धतीने प्लँक केले आहे आणि ते टिकवून ठेवले आहे, त्यावरून तिचा जबरदस्त फिटनेस दिसून येतो. मंदिरा बेदीचे वय जवळपास पन्नाशीच्या आसपास आहे. पण तरीही तिने या वयात टिकून ठेवलेला फिटनेस खरोखरंच चार्मिंग आणि मोटीव्हेटिंग आहे.
मसल स्ट्रॉंग हवेत, आणि फॅट्स कमी? मलायका अरोरा सांगते ३ आसने
प्लँक वर्कआऊट करणे आणि ते काही सेकंदासाठी टिकवून ठेवणे दिसते किंवा वाटते तेवढे सोपे नाही. जर तुम्हाला नियमित व्यायामाची सवय असेल, तरच तुम्हाला प्लँक करता येऊ शकते. मंदिरासारखा फिटनेस हवा, तर बघा तिच्यासारखा प्लँक वर्कआऊट करण्याचा प्रयत्न करा.
कसं करायचं प्लँक वर्कआऊट
How to do plank workout?
- पुशअप्स करण्यासाठी आपण जी पोझिशन घेतो, तशी पोझिशन सुरुवातीला घ्या.
- यानंतर आता दोन्ही हात कोपऱ्यापासून तळव्यापर्यंत जमिनीवर टेकवा आणि शरीराचा सगळा भार हातांवर आणि पायाच्या बोटांवर पेलण्याचा प्रयत्न करा.
- डोक्यापासून पायापर्यंत सगळे शरीर एका सरळ रेषेत ठेवण्याचा प्रयत्न करा.
प्लँक वर्कआऊट करण्याचे फायदे
What are the benefits of plank exercise?
- कोअर मसल्स वर्कआऊट म्हणून प्लँक वर्कआऊट ओळखले जाते. म्हणजेच या वर्कआऊटमुळे संपूर्ण शरीराच्या स्नायुंचा व्यायाम होतो.
- शरीराचे संतूलन टिकवून ठेवण्यासाठी प्लँक केले जाते.
- प्लँक केल्यामुळे पोटावरची मांड्यांवरची आणि दंडाची चरबी खूप वेगात कमी हाेते. त्यामुळे इंचेस लॉससाठी हे वर्कआऊट योग्य मानले जाते.
मंदिरा बेदीचा फिटनेस स्टंट, वय ५० आणि एकावेळी मारले ३३ हॅण्डस्टॅण्ड, व्हिडीओ पाहाल तर म्हणाल..
- बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी प्लँक वर्कआऊट करण्याचा सल्ला दिला जातो. बऱ्याचदा वाकून चालणे, वाकूण उभे राहणे किंवा चालण्या, बसण्याची चुकीची पद्धत यामुळे शरीर बेढब दिसते. म्हणूनच बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी प्लँक करायचा सल्ला दिला जातो.
- शरीराची चयापयय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी प्लँक करावे. शरीराची चयापचय क्रिया सुधारली की आपोआपच कॅलरी बर्न होण्यास मदत होते.