Lokmat Sakhi >Fitness > प्राजक्ता माळीचं बकासन पाहिलं का? अवघड आसन सहज करत, तळहातावर पेलतेय संपूर्ण शरीराचा भार..

प्राजक्ता माळीचं बकासन पाहिलं का? अवघड आसन सहज करत, तळहातावर पेलतेय संपूर्ण शरीराचा भार..

Fitness Tips by Prajakta Mali: प्राजक्ता माळी करत असलेलं हे आसन खरोखरंच अतिशय अवघड असून जबरदस्त फिटनेस असल्याशिवाय हे आसन करता येणं शक्यच नाही. (Bakasana by Prajakta Mali)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2022 01:05 PM2022-10-17T13:05:55+5:302022-10-17T13:06:46+5:30

Fitness Tips by Prajakta Mali: प्राजक्ता माळी करत असलेलं हे आसन खरोखरंच अतिशय अवघड असून जबरदस्त फिटनेस असल्याशिवाय हे आसन करता येणं शक्यच नाही. (Bakasana by Prajakta Mali)

Marathi Actress Prajakta Mali is doing amazing workout, Benefits of Bakasana, How to do Bakasana? | प्राजक्ता माळीचं बकासन पाहिलं का? अवघड आसन सहज करत, तळहातावर पेलतेय संपूर्ण शरीराचा भार..

प्राजक्ता माळीचं बकासन पाहिलं का? अवघड आसन सहज करत, तळहातावर पेलतेय संपूर्ण शरीराचा भार..

Highlights हे आसन करणं अजिबातच चेष्टेचं काम नसून यासाठी तुमची फिटनेस लेव्हल अतिशय उत्तम असणं गरजेचं आहे

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे (Prajakta Mali) फिटनेस फंडे सोशल मिडियावर नेहमीच ट्रेडिंग असतात. आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठीही आपला फिटनेस जपणं किती गरजेचं आहे, याविषयी ती नेहमीच तिच्या चाहत्यांना माहिती देत असते. शिवाय तिचे हे सल्ले स्वानुभवातून आलेले असल्याने अनेक जण ते गांभिर्याने फॉलो करतात. आता नुकताच प्राजक्ताचा एक फेसबूक व्हिडिओ सोशल मिडियावर ट्रेडिंग असून ती अतिशय अवघड योगासनांपैकी एक असणारं बकासन (Benefits of Bakasana) करताना दिसते आहे. हे आसन करणं अजिबातच चेष्टेचं काम नसून यासाठी तुमची फिटनेस लेव्हल अतिशय उत्तम असणं गरजेचं आहे (How to do Bakasana?). 

 

कसं करायचं बकासन?
१. बकासन करण्यासाठी जमिनीवर सगळ्यात आधी योगा मॅट किंवा सतरंजी पसरवा. सतरंजी किंवा मॅट अजिबातच सरकणार नाही, याची काळज घ्या.

२. आता दोन्ही तळहात आणि गुडघे वाकवून तळपाय जमिनीवर टेकवा.

३. आता हळूहळू हात कोपऱ्यातून वाकवा. त्याचवेळी तळपाय वर उचलण्याचा प्रयत्न करा.

४. हळूहळू गुडघ्यांनी हातांच्या कोपऱ्यांवर जोर द्या, हाताच्या कोपऱ्यावर गुडघे व्यवस्थित फिक्स बसतील, अशा पद्धतीने कोपऱ्यांवर गुडघे ठेवा. तळपाय जमिनीपासून पुर्णपणे वर उचला.

५. आता गुडघ्यापासून तळपायापर्यंत जो पायाचा भाग आहे तो एका सरळ रेषेत आणा आणि जमिनीला पुर्णपणे समांतर राहील, याची काळजी घ्या. काही सेकंदासाठी ही अवस्था टिकविण्याचा प्रयत्न करा. प्राजक्ता माळीने तब्बल १२ सेकंद ही अवस्था टिकवली होती.

 

बकासन करण्याचे फायदे 
१. एकाग्रता वाढण्यासाठी उत्तम आसन

२. हात आणि पायाचे स्नायू मजबूत होण्यासाठी हे आसन फायदेशीर ठरते.

३. चेहऱ्याच्या पेशींमधील रक्ताभिसरण अधिक वेगवान होते. त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यास फायदा होतो.

४. बकासन नियमित केल्याने पचनासंबंधी तक्रारी निर्माण होत नाहीत.

५. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढण्यासाठी हे आसन करणे उपयुक्त ठरते. 

 

Web Title: Marathi Actress Prajakta Mali is doing amazing workout, Benefits of Bakasana, How to do Bakasana?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.