Lokmat Sakhi >Fitness > मसाबा गुप्ताचे ५ पॉइण्ट फिटनेस सिक्रेट आणि गरम पाण्यात चमचाभर तुपाची जादू.

मसाबा गुप्ताचे ५ पॉइण्ट फिटनेस सिक्रेट आणि गरम पाण्यात चमचाभर तुपाची जादू.

Masaba Gupta Weight Loss Secret : Desi Ghee Warm Water : Masaba Gupta's 5 Point Fitness Secret : मसाबा गुप्ता अगदी साेपे उपाय करते मात्र तिचा फिटनेस आणि आरोग्य एकदम उत्तम आहे. त्यापैकीच ५ गोष्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2023 06:50 PM2023-02-15T18:50:03+5:302023-02-15T19:14:28+5:30

Masaba Gupta Weight Loss Secret : Desi Ghee Warm Water : Masaba Gupta's 5 Point Fitness Secret : मसाबा गुप्ता अगदी साेपे उपाय करते मात्र तिचा फिटनेस आणि आरोग्य एकदम उत्तम आहे. त्यापैकीच ५ गोष्ट...

Masaba Gupta's 5 main fitness secret and the magic of a spoonful of ghee in hot water. | मसाबा गुप्ताचे ५ पॉइण्ट फिटनेस सिक्रेट आणि गरम पाण्यात चमचाभर तुपाची जादू.

मसाबा गुप्ताचे ५ पॉइण्ट फिटनेस सिक्रेट आणि गरम पाण्यात चमचाभर तुपाची जादू.

प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी आणि सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर 'मसाबा गुप्ता' हिच्या दुसऱ्या लग्नाबाबत सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली. मसाबा ही सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. फॅशनच्या झगमगत्या दुनियेत असल्याकारणाने मसाबा नेहमीच आपल्या फिटनेस आणि स्किनकेअर तसेच स्वतःची संपूर्ण काळजी घेण्याकडे लक्ष देते. मसाबा ही अशी एकमेव फॅशन डिझायनर आहे जिने इन्स्टाग्रामवर आपला फॅशन शो केला होता. मसाबा कायम आपले फिटनेस रुटीन व स्किनकेअर रुटीन फॉलो करते. सगळ्या जणांसाठीच मसाबा गुप्ताने तिच्या वर्कआऊटविषयी आणि डेली रुटीनबद्दल शेअर केलेली पोस्ट उपयुक्त ठरणारी आहे(Masaba Gupta Weight Loss Secret : Desi Ghee Warm Water : Masaba Gupta's 5 Point Fitness Secret). 

१. हाय - इंटेंसिटी वर्कआऊट :- मध्यंतरी मसाबाने आपल्या इंस्टाग्राम पेजवरून तिचा एक्सरसाइज करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. हाय - इंटेंसिटी वर्कआऊट करण्यावर मसाबाचा जास्तीत जास्त भर असतो. मसाबा दररोज न चुकता वर्कआऊट आवर्जून करतेच. ती दैनंदिन कामाच्या कितीही गडबडीत असली तरी ती वर्कआऊट न चुकता करतेच. मसाबा आठवड्यातील किमान ५ दिवस रोज न चुकता आपल्या घरच्या पर्सनल जिममध्ये फिटनेस ट्रेनर सोबत वर्कआऊट करतेच. मसाबा आपल्या चाहत्यांसाठी खास तिच्या एक्सरसाइज व हाय - इंटेंसिटी वर्कआऊटचे व्हिडिओ शेअर करत असते. मसाबा फिट राहण्यासाठी कार्डियो, पिलाटेज, योगा आणि मॉर्निंग वॉक यासोबतच वेगवेगळ्या ब्रीदिंग एक्सरसाइज करणे पसंत करते. 

२. साखर खाणे टाळा :- मसाबाने मध्यंतरी वजन कमी करण्यासाठी '२१ दिवस नो शुगर डाएट' केले होते. या दरम्यान तिने २१ दिवस आपल्या डाएटमधून साखर आणि साखरेपासून बनविलेले पदार्थ वर्ज्य केले होते.पोस्ट शेअर करताना तिने आवर्जून उल्लेख केला आहे की या डाएटदरम्यान तिने ॲडेड शुगर, शुगर फ्री असंही पुर्णपणे बंद केलं होतं. कोणताही गोड पदार्थ खाणं तिने टाळलं. ती म्हणते की सुरुवातीला खूप त्रास झाला. डाएटच्या मधल्या काळातले दिवस तर खूपच कठीण गेले. केक तर तिला खूप खावासा वाटत होता. पण तरीही तिने संयम सुटू दिला नाही. याचे खूपच चांगले फायदे आता २१ दिवसांनंतर अनुभवायला मिळत आहेत, असं ती म्हणते.

३. गरम पाण्यांत तूप मिसळून त्याचे सेवन :- आपल्या डेली रुटीनबद्दल सांगताना मसाबा सांगते, रोज सकाळी उठल्यावर हलकेच गरम पाणी आणि त्यात एक चमचा तूप घालून ती हे पिते. अशाप्रकारे गरम पाण्यात तूप मिसळून ते पाणी पिऊन ती आपल्या दिवसाची सुरुवात करते. 

४. रात्रभर पाण्यात भिजविलेले अक्रोड व बदाम :- जिमला जाण्यापूर्वी मसाबा रात्रभर पाण्यांत भिजवून ठेवलेले प्रत्येकी ५ बदाम आणि अक्रोड यांचे सेवन करते. यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते सोबतच स्किनला एक प्रकारचा ग्लो येण्यास मदत होते.

 

५. बटाट्याचा रस :- फिटनेस आणि शारीरिक आरोग्यासोबतच मसाबा आपले स्किनकेअर रुटीनदेखील तितक्याच काळजीपूर्वक पाळते. डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी ती डोळ्यांखाली बटाट्याचा रस लावते. ज्यामुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होऊन तेथील नाजूक स्किन चमकदार होण्यास मदत होते. बटाट्याचा रस वापरल्याने डोळ्यांखालील काळी वर्तुळे, स्किनचा काळपटपणा तसेच डोळ्यांखाली आलेली सूज नाहीशी करण्यास मदत होते. 

 सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर 'मसाबा गुप्ता' फिट राहण्यासाठी गरम पाण्यांत तूप मिसळून त्या पाण्याचे सेवन दररोज करते. गरम पाण्यात तूप मिसळून पाणी पिण्याचे शरीराला नेमके काय फायदे होतात ते समजून घेऊयात. 

१. पचनसंस्था सुधारण्यास मदत :- गरम पाण्यात तूप घालून प्यायल्याने आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. गरम पाण्यात तूप घालून प्यायल्याने पचनसंस्थ्येचे   कार्य सुधारते.

२. रक्ताभिसरण सुधारते :- रक्ताभिसरण सुधारण्यासाठी गरम पाण्यात तूप मिसळून पिणे खूप फायदेशीर आहे. शरीरातील रक्ताभिसरण खराब झाल्यामुळे  अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो.  

३. हाडे होतात मजबूत :- गरम पाण्यात तूप घालून प्यायल्याने हाडे मजबूत होतात. खरं तर शरीरात जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होण्याचा धोका वाढतो. तुपात जीवनसत्त्वे पुरेशा प्रमाणात असतात. याचे दररोज गरम पाण्यासोबत सेवन करणे हाडांसाठी खूप फायदेशीर आहे.

४. त्वचेचे आजार :- गरम पाणी घालून तूप प्यायल्याने त्वचेला चांगला फायदा होतो. यामध्ये असलेली जीवनसत्त्वे आणि प्रथिने त्वचा सुधारण्यासाठी आणि समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहेत.

५. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास होते मदत :- रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रोज सकाळी गरम पाण्यात तूप टाकून पिणे फायदेशीर ठरते. तुपाचे सेवन शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. यातील जीवनसत्त्वे आणि प्रथिने शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात.

Web Title: Masaba Gupta's 5 main fitness secret and the magic of a spoonful of ghee in hot water.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.