Join us  

मासिक पाळीत खूप पोट दुखतं? मत्स्यासन करा, वाचा मत्स्यासन करण्याचे ५ जबरदस्त फायदे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2022 3:20 PM

Yoga For Reducing Menstrual Pain: मत्स्यासन (Matsyasana or fish) केल्याने मासिक पाळीतली पोटदुखी तर कमी होतेच, शिवाय वेटलॉस (weight loss) होण्यासही मदत होते. 

ठळक मुद्देमत्स्यासन केल्यामुळे मासिक पाळीतला त्रास तर कमी होतोच, पण त्या व्यक्तिरिक्त आरोग्याला इतर अनेक लाभही मिळतात.

मासिक पाळीत अनेक जणींचं पोट खूप जास्त दुखतं. पोटदुखी एवढी जास्त असते की पाळीचे १- २ दिवस त्यांना घराबाहेर पडणंही शक्य नसतं. किंवा काही जणींना या काळात खूप जास्त रक्तस्त्राव होतो. विद्यार्थिनी असो किंवा नोकरदार महिला.. आजच्या स्पर्धेच्या जगात मासिक पाळीमुळे दर महिन्यात येणारा असा १- २ दिवसांचा गॅपही आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अडसर ठरू शकतो. म्हणूनच हा त्रास कमी करण्यासाठी (Matsyasana or fish pose to reduce menstrual pain) नियमितपणे मत्स्यायन करण्याचा सल्ला योगतज्ज्ञ देतात. मत्स्यासन केल्यामुळे मासिक पाळीतला त्रास तर कमी होतोच, पण त्या व्यक्तिरिक्त आरोग्याला इतर अनेक लाभही मिळतात. (benefits of matsyasana for weight loss)

 

कसं करायचं मत्स्यासन?१. मत्स्यासन करण्यासाठी सगळ्यात आधी पायाचे पद्मासन घाला. पद्मासन घालणे शक्य नसेल तर अर्ध पद्मासनही घालू शकता. किंवा ते ही जमत नसेल तर मग मांडी घाला.

२. आता हळूहळू पायाची मांडी न मोडता अंग मागे घ्या आणि पाठीवर झोपा.

केस गळणं- कमी वयातच पांढरे केस? फक्त ३ योगासनं करा, लांबसडक- काळ्याभोर केसांसाठी खास उपाय

३. त्यानंतर हाताचे काेपरे जमिनीला टेकवा आणि दोन्ही हाताने दोन्ही पायाचे अंगठे पकडा.

४. कंबर जमिनीपासून वर उचलून घ्या. कंबरेला जमिनीचा स्पर्श व्हायला नको.

५. तसेच मान देखील वर उचला आणि मस्तक जमिनीला टेकवा.

६. मत्स्यासनाची ही अवस्था २५ ते ३० सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा.

 

मत्स्यासन करण्याचे फायदे१. मत्स्यासन नियमित केल्यामुळे मासिक पाळीतल्या वेदना कमी होण्यास मदत होते.

२. या आसनामध्ये डोक्याला चांगल्याप्रकारे रक्तपुरवठा होतो. त्यामुळे केसांचं गळणं कमी होतं.

बघा ही स्टंटबाजी!! पत्नी मागे बसलेली आणि गाडी चालवता चालवता हा माणूस चक्क..... व्हिडिओ व्हायरल 

३. खूप जास्त बैठे काम करून होणारा पाठदुखीचा त्रास कमी करण्यासाठी नियमितपणे मत्स्यासन करणे उपयोगी ठरते.

४. पचनासंबंधी तक्रारी दूर करण्यासाठी उपयुक्त आसन.

५. पोटावरची चरबी कमी करण्यासाठीही मत्स्यायन करणे फायदेशीर ठरते. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामयोगासने प्रकार व फायदेमासिक पाळी आणि आरोग्य