Lokmat Sakhi >Fitness > वजन कमी करण्याचे सारे फंडे फेल? किचनमधल्या ४ मसाल्यांचे एक खास ड्रिंक, वजन घटणारच

वजन कमी करण्याचे सारे फंडे फेल? किचनमधल्या ४ मसाल्यांचे एक खास ड्रिंक, वजन घटणारच

Melt your belly fat with these 4 spiced teas : वाढेललं वजन-सुटलेल्या पोटावर करा स्वस्तात-मस्त मसाल्यांचा उपाय, वजन घटेल-पोट होईल सपाट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2023 02:21 PM2023-12-18T14:21:58+5:302023-12-18T15:30:11+5:30

Melt your belly fat with these 4 spiced teas : वाढेललं वजन-सुटलेल्या पोटावर करा स्वस्तात-मस्त मसाल्यांचा उपाय, वजन घटेल-पोट होईल सपाट..

Melt your belly fat with these 4 spiced teas | वजन कमी करण्याचे सारे फंडे फेल? किचनमधल्या ४ मसाल्यांचे एक खास ड्रिंक, वजन घटणारच

वजन कमी करण्याचे सारे फंडे फेल? किचनमधल्या ४ मसाल्यांचे एक खास ड्रिंक, वजन घटणारच

वेट लॉसकडे (Weight Loss) लोकं टास्क म्हणून पाहू लागले आहेत. पण खरंच वजन कमी करणं हे कोणत्याही टास्कपेक्षा कमी नाही. वजन कमी करण्याचे अनेक फंडे बाजारात उपलब्ध आहेत. काही फंडे फेल तर, काही फंडे उपयुक्त ठरतात. वजन वाढण्याचा फटका फक्त सौंदर्यावर बसत नसून, यामुळे गंभीर आजार देखील निर्माण होतात. मुख्य म्हणजे बिघडलेली जीवनशैली आणि अयोग्य आहारामुळे वजन वाढते. शिवाय हिवाळ्यात आपण दोन घास एक्स्ट्रा खातो. कारण या दिवसात प्रचंड भूक तर लागतेच, शिवाय तेलकट-मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होते (Fitness Drink).

जर आपल्याला व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नसेल, शिवाय जास्त मेहनत न घेता वजन कमी करायचं असेल तर, पोषणतज्ज्ञ रमिता कौर यांनी शेअर केलेला फॅट लॉस ड्रिंक पिऊन पाहा. यामुळे नक्कीच वेट लॉस करण्यास मदत मिळेल(Melt your belly fat with these 4 spiced teas).

आलं

आलं खाण्याचे असंख्य फायदे आहेत. आल्याचे दाहक-विरोधी गुणधर्म वजन कमी करण्यास किंवा नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. आहारात आल्याचा समावेश केल्याने चयापचय बुस्ट होते. ज्यामुळे पचनक्रिया देखील सुरळीत राहते. आपण आल्याचा चहा तयार करून पिऊ शकता.

बॉबी देओल सांगतो ४ महिने साखर सोडली आणि.. खरंच साखर सोडल्यानं वजन पटकन कमी होतं?

दालचिनी

दालचिनीचा चहा प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. यामुळे ब्लड स्शुगर नियंत्रित राहते. शिवाय चयापचय बुस्ट करते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते, व पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते. नियमित दालचिनीचा चहा प्यायल्याने कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित राहते.

हळद

भारतीय स्वयंपाकात हळदीचा वापर होतोच. हळद चयापचय बुस्ट करते. त्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. शिवाय वजन कमी करण्यास मदत करते.

तुळस

तुळशीची पानं चयापचय बुस्ट करण्यास मदत करते. आपले चयापचय जितक्या लवकर बुस्ट होईल, तितक्या लवकर कॅलरीज बर्न व्हायला वेळ लागणार नाही. ज्यामुळे नैसर्गिकरित्या वजन कमी करण्यास मदत होईल. शिवाय पचनक्रियाही सुरळीत होते.

सारा अली खान आणि अनन्या पांडे ज्याच्या फॅन, त्या ओरीचा फिटनेस फंडा वाचा..उगीच नाही सेलिब्रिटी त्याच्यावर फिदा..

अशा पद्धतीने तयार करा फॅट लॉस ड्रिंक

एका पॅनमध्ये एक कप पाणी घाला. नंतर त्यात २ ते ३ तुळशीची पानं, दालचिनीचा एक तुकडा, चिमुटभर हळद आणि किसलेलं आलं घालून मिक्स करा. ५ मिनिटांसाठी पाण्याला उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. चहाच्या गाळणीने पाणी गाळून घ्या. अशाप्रकारे फॅट लॉस ड्रिंक पिण्यासाठी रेडी.

वजन कमी करण्यासाठी वेट लॉस ड्रिंक कधी प्यावे?

पोषणतज्ज्ञांच्या मते, आपण हे वेट लॉस ड्रिंक सकाळी रिकाम्या पोटी पिऊ शकता. यामुळे इम्युनिटी बुस्ट होते, शिवाय वजन कमी करण्यास मदत होते.

Web Title: Melt your belly fat with these 4 spiced teas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.