Lokmat Sakhi >Fitness > सारखी अस्वस्थता? डोक्यात विचारांचा गोंधळ? मग फक्त ५ मिनिटे बसा आणि 'ही' एकच गोष्ट करा..

सारखी अस्वस्थता? डोक्यात विचारांचा गोंधळ? मग फक्त ५ मिनिटे बसा आणि 'ही' एकच गोष्ट करा..

डोक्यात सतत काहीतरी सुरु असतं. खूप काम नसलं तरी खूप अस्वस्थ वाटतं, सतत मनावर कसला तरी ताण असतो, असं सगळं होत असेल तर फक्त ५ मिनिटे शांत बसा आणि .....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 06:00 PM2021-10-28T18:00:42+5:302021-10-28T18:02:23+5:30

डोक्यात सतत काहीतरी सुरु असतं. खूप काम नसलं तरी खूप अस्वस्थ वाटतं, सतत मनावर कसला तरी ताण असतो, असं सगळं होत असेल तर फक्त ५ मिनिटे शांत बसा आणि .....

Mental stress? Confusion of thoughts in the head? Then just sit for 5 minutes and do this thing. | सारखी अस्वस्थता? डोक्यात विचारांचा गोंधळ? मग फक्त ५ मिनिटे बसा आणि 'ही' एकच गोष्ट करा..

सारखी अस्वस्थता? डोक्यात विचारांचा गोंधळ? मग फक्त ५ मिनिटे बसा आणि 'ही' एकच गोष्ट करा..

Highlightsदिर्घ श्वसन हा बॉडी डिटॉक्स करण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे.याचा परिणाम तुमच्या त्वचेवरही दिसून येतो आणि त्वचा तजेलदार होते. 

काही जण असे असतात ज्यांना कसलाच ताण नसतो. त्याउलट काही जण असेही असतात, ज्यांना सतत कोणती ना कोणती गोष्ट सतावत असते. तसं पाहिलं तर चिंता करण्यासारखं काहीच नसतं. पण सतत मनावर कसलं तरी दडपण असतं. अमूक एक गोष्ट अशी झाली तर......, तमुक एक गोष्ट तशीच झाली तर.... असा जर- तरचा विचार करून अशी मंडळी सध्या असलेल्या चांगल्या गोष्टींचा आनंद घ्यायलाही विसरून जातात. तुमचंही तसंच होत असेल तर दररोज सकाळी स्वत:साठी फक्त ५ मिनिटे काढा आणि दिर्घ श्वसन करा. 

 

हल्ली आपल्याला प्रत्येक गाेष्टीचीच घाई झालेली असते. त्यामुळे श्वासही आपण गडबडीत आणि अपूरा घेतो, असं कुणी म्हणत असेल, तर ही गोष्ट अजिबातच खोटी समजून हसण्यावारी नेऊ नका. कारण हे सगळं खरं आहे. श्वास ही खरं पाहिलं तर एक अखंड चालणारी गोष्ट. पण या गोष्टीकडेच आपले दुर्लक्ष होते. आता श्वास ही काय लक्ष देण्यासारखी बाब आहे का, असा विचारही तुमच्या मनात डोकावला असेल. पण हो. खरोखर दिवसभरातला काही काळ तुम्ही तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. कारण नेहमी आपण जो श्वास घेतो तो खूपच अपूरा असतो. असा अपूरा श्वास अनेक आजारांना आमंत्रण तर देतोच पण मानसिक दृष्टीनेही आपल्याला चंचल, कमकुवत बनवतो. त्यामुळे मन शांत होण्यासाठी दररोज सकाळी ५ ते १० मिनिटे नियमितपणे दिर्घश्वसन केले पाहिजे. मन शांत होण्यासाठी दिर्घ श्वसन केल्यामुळे खूप फायदा होतो. 

 

कसं करायचं दिर्घ श्वसन?
दिर्घ श्वसन म्हणजे लांब आणि मोठा श्वास. पण मोठा श्वास घेतानाही तो योग्य पद्धतीने घेतला गेला पाहिजे. दिर्घ श्वसन करण्यासाठी सगळ्यात आधी पायाची मांडी किंवा पद्मासन घाला. वज्रासनात बसून देखील दिर्घ श्वसन करता येते. यापैकी कोणत्याही अवस्थेत बसल्यानंतर पाठीचा कणा ताठ ठेवा. डोळे बंद करा आणि हाताची योगमुद्रा करून दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवा. आता तुमचे लक्ष हळूहळू पुर्णपणे तुमच्या श्वासावर केंद्रित करा. श्वास कसा घेत आहोत, कसा सोडत आहोत, याकडे लक्ष द्या. तुम्हाला तुमच्या फुफ्फुसांमध्ये जेवढी हवा भरून घेता येणं शक्य असेल, तेवढा मोठा श्वास घेण्याचा प्रयत्न करा. श्वास पुर्णपणे भरून घेतल्यानंतर एक- दोन सेकंद श्वास सोडूही नका आणि घेऊही नका. त्यानंतर हळूहळू श्वास सोडा. ही क्रिया सलग ५ ते १० मिनिटे नियमितपणे करावी. 

 

दिर्घ श्वसन करण्याचे फायदे
१. मानसिक ताण कमी होतो

रोजचं काम, चिंता, काळजी या बाबी प्रत्येकालाच असतात. पण त्यांचा सतत विचार करून अस्वस्थ होणं प्रकृतीसाठी हानिकारक आहे. त्यामुळे मन शांत करण्यासाठी, चंचल मनाला आवर घालण्यासाठी आणि मनावरचा ताण कमी करण्यासाठी नियमितपणे दिर्घ श्वसन करणे उपयुक्त ठरते. कारण यामुळे स्ट्रेस हार्मोन लेव्हल वाढत नाही, असे तज्ज्ञ सांगतात. 

 

२. त्वचा होते चमकदार 
दिर्घ श्वसन हा बॉडी डिटॉक्स करण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे. त्यामुळे दिर्घ श्वसन केल्यास त्वचेचा पोत सुधारण्यास नक्कीच मदत होते. दिर्घ श्वसनामुळे शरीरातील रक्ताभिसरण योग्य पद्धतीने आणि जलद होते. याचा परिणाम तुमच्या त्वचेवरही दिसून येतो आणि त्वचा तजेलदार होते. 

 

३. निद्रानाश दूर होतो
सतत मनावर कसला ताण असेल, तर अशावेळी आपली झोप उडते. दिर्घ श्वसन केल्यामुळे मनावरचा ताण हलका होतो, मन शांत होते. याचाच परिणाम म्हणजे निद्रानाशाचा त्रास असेल, तर तो देखील दूर होतो.  

 

४. प्रतिकारशक्ती वाढते
दिर्घश्वसनाचे आरोग्याला खूप फायदे होतात. यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. श्वसन संस्था मजबूत होते आणि प्रतिकारशक्ती वाढते. 
 

Web Title: Mental stress? Confusion of thoughts in the head? Then just sit for 5 minutes and do this thing.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.