Join us  

अंकिता कोंवर करतेय अप्रतिम मेरुदंडासन! वेटलॉस तर होईलच, वाचा ५ जबरदस्त फायदे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2022 5:20 PM

Yoga Tips by Ankita Konwar: मॉडेल अभिनेता मिलिंद सोमण याची पत्नी अंकिता कोंवर हिने नुकतंच मेरु दंडासन (Merudandasana) हे एक अवघड योगासन केलं असून त्याचे फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. 

ठळक मुद्देया आसनामुळे वेटलॉस होणं तर शक्य आहेच, पण त्यासोबतच काही जबरदस्त फायदेही होतात. बघा मेरु दंडासन नेमकं करायचं कसं आणि काय त्याचे लाभ.

मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर (Milind Soman and Ankita Konwar) हे बाॅलीवूडचं एक फिटनेस फ्रिक जोडपं. व्यायाम, आरोग्य याबाबत दोघेही अगदी एकमेकांच्या तोडीस तोड आहेत. मिलिंदचं फिटनेस (fitness Tips by Ankita Konwar) प्रेम तर त्याच्या चाहत्यांना माहितीच आहे. पण अंकिताही त्या बाबतीत काही कमी नाही. ती नेहमीच वेगवेगळे फिटनेस फंडे सोशल मिडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना शेअर करत असते. आता नुकताच तिने एक वर्कआऊट फोटो शेअर केला असून यामध्ये ती मेरु दंडासन (5 Benefits of merudandasana) करताना दिसते आहे. या आसनामुळे वेटलॉस होणं तर शक्य आहेच, पण त्यासोबतच काही जबरदस्त फायदेही होतात. म्हणूनच बघा अंकिता करत असलेलं मेरु दंडासन नेमकं करायचं कसं आणि काय त्याचे लाभ.

 

कसं करायचं मेरू दंडासन?१. योगा मॅटवर सरळ ताठ बसा. गुडघे वाकवून दोन्ही तळपाय शरीराच्या जवळ घेऊन एकमेकांना जोडा.

२. आता दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे अंगठे पकडा.

ॲल्यूमिनियम किंवा लोखंडाच्या कढईला कसं बनवायचं नॉनस्टिक, बघा कुणाल कपूर यांनी सांगितलेली खास ट्रिक

३. शरीराचा तोल सावरत दोन्ही पाय वर उचला आणि शरीराच्या दोन्ही बाजूंनी पसरवा.

४. जोपर्यंत तुमचा श्वास संथ लयीत चालू असेल तोपर्यंत आसनस्थिती कायम ठेवा. त्यानंतर सावकाश सोडा. मध्ये- मध्ये सुटले तरी चालेल, पण जवळपास ३ मिनिटे या आसनाचा सराव करावा.

 

मेरू दंडासन करण्याचे फायदे१. पाय मजबूत होण्यासाठी हे आसन फायदेशीर ठरते. 

२. ज्यांचे पाय नेहमीच दुखतात, त्यांनी हे आसन नियमित करावे.

जेनेलिया देशमुखने मुलांसाठी केलं शाकाहारी ऑम्लेट, बघा हा पदार्थ नेमका असतो काय?

३. पोटावरची, मांड्यावरची आणि हिप्स भागातली चरबी कमी होण्यासाठी उपयुक्त

४. पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

५. शरीराचे संतुलन राखण्यासाठी उपयुक्त आसन.

६. दंडावरची चरबी कमी होऊन हातांना परफेक्ट आकार येण्यासाठी फायदेशीर. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सअंकिता कुंवरआरोग्यहेल्थ टिप्स