बिघडलेल्या जीवनशैलीमुळे वजन वाढत जाते, आणि लवकर कमी करण्याच्या नादात आपण विविध गोष्टी करून पाहतो. वजन कमी करण्यासाठी व्यायाम यासह डाएटकडे विशेष लक्ष द्यायला हवे (Weight Loss). हिवाळ्यात पालेभाज्या मोठ्या प्रमाणात मिळतात. आपण मेथीच्या पानांची भाजी खाऊनही वजन कमी करू शकता. मेथीची भाजी खाणारा वर्ग फार कमी आहे.
मेथीची भाजी कडू लागते, म्हणून बरेच जण मेथीची भाजी खाणं टाळतात (Methi for Fitness). पण मेथीच्या भाजीमुळे फक्त आरोग्याला फायदा होत नाहीतर, वजन कमी करण्यासही मदत मिळते(Methi For Weight Loss: How To Use Fenugreek Leaves To Burn Belly Fat).
मेथीतील गुणधर्म
यासंदर्भात, फिट क्लिनिकच्या डायटीशियन सुमन सांगतात, मेथी दाणे असो किंवा मेथीची भाजी, आपल्या आरोग्याला अनेक फायदे यातून मिळतात. मुख्य म्हणजे मेथी वजन घटवण्यास मदत करते. यामध्ये फायबर, कॅल्शियम, लोह, प्रथिने आणि व्हिटॅमिन सी आढळते. ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी होतात. मेथीच्या पानांची भाजी खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. शिवाय त्यातील फायबरमुळे पचनक्रियाही सुधारते.
सकाळी ५ चुका करता म्हणून भरभर वाढते वजन, व्यायाम आणि डाएटचाही होणार नाही असर
मेथीच्या पानांचे करा ३ प्रकार
मेथीचे पराठे
फक्त गव्हाच्या पोळ्या खाण्यापेक्षा आपण मेथीचे पराठे तयार करून खाऊ शकता. जे लोकं मेथी खाताना नाकं मुरडतात, त्यांच्यासाठी हा खास पर्याय आहे. यामुळे गव्हाच्या पीठातील गुणधर्म आणि मेथीमधील पौष्टीक घटक शरीराला पुरेपूर प्रमाणात मिळतील.
मेथीची भाजी
हिवाळ्यात बाजारात स्वस्तात मस्त मेथी मिळते. मेथीच्या पानांची भाजी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. आपण मेथीच्या पानांची भाजी विविध पद्धतीने तयार करू शकता. नियमित मेथीची भाजी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. मेथीमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते, ज्यामुळे चरबी वेगाने बर्न होते.
काय सांगता! फळांचा रस प्यायल्याने वाढते वजन? काय खरं काय खोटं? संशोधक सांगतात..
मेथी डाळ
हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी यासह शरीर हेल्दी ठेवण्यासाठी मेथी खाणं गरजेचं आहे. जर आपल्याला मेथीची भाजी आवडत नसेल तर, आपण मेथी डाळ खाऊ शकता. मेथी डाळ खाल्ल्याने शरीराला लोह मिळते. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारते. शिवाय चवीलाही भन्नाट लागते.