वयाच्या ५६ व्या वर्षीही माणूस किती फिट असू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे मिलिंद सोमण.... नव्या वर्षाची सुरुवातही त्याने त्याच्या चाहत्यांना फिटनेस मोटिव्हेशन देऊनच केली होती. कधी त्याला आपण रनिंग करताना पाहतो, तर कधी डबल बारवर एक्सरसाईज करताना, कधी तो दोरीवरच्या उड्या मारताना दिसतो तर कधी जबरदस्त वर्कआऊट करताना.. आता अशीच एक पोस्ट त्याने शेअर केली असून त्याच्या चाहत्यांना एक नवे फिटनेस मोटीव्हेशन दिले आहे.
इन्स्टाग्रामवर (instagram share) मिलिंदने जी पोस्ट शेअर केली आहे त्यात तो एका निसर्गरम्य ठिकाणी आहे.. सुर्य अस्ताला जात असून आजूबाजूचे वातावरण खूपच रमणीय आहे.. या वातावरणात तो आणि त्याचा पार्टनर विनय दाहिया हे दोघे पुशअप्स (push ups by Milind Soman) करत आहेत.. ''50 in 50 at 56'' अशी टॅगलाईन त्याने या फोटोला दिली असून Best thing to do at sunset ! Thanks partner @dahiya_vinay त्याच्या व्हिडिओला अशी कॅप्शन दिली आहे..
वयाच्या ५६ व्या वर्षी तो ज्या पद्धतीने पुशअप्स करत आहे, ते खरोखरंच लाजवाब असून तरूणांनाही लाजवेल असा त्याचा फिटनेस आहे.. या वयातही तो ५० सेकंदात ५० पुशअप्स मारू शकतो, यातूनच त्याचा जबरदस्त फिटनेस दिसून येतो. पुशअप्स हा व्यायामाचा एक उत्तम प्रकार आहे.
पुशअप्स करण्याचे ५ जबरदस्त फायदेBenefits of push ups- शरीराच लवचिकता वाढविण्यासाठी पुशअप्स करणे हा अतिशय चांगला व्यायाम समजला जातो.- पाठदुखीचा किंवा कंबरदुखीचा त्रास होत असल्यास पुशअप्स करणे फायद्याचे ठरते.- पुशअप्स केल्यामुळे दंड, पाठ यांचे स्नायू मजबूत होऊन तो भाग टोन्ड होण्यास मदत होते. - पुशअप्स केल्यामुळे शरीरावरील चरबी कमी होते, त्यामुळे वेटलॉस (weight loss) किंवा इंचेस लॉस (inches loss) करण्यासाठी पुशअप्स हा सर्वोत्तम व्यायाम मानला जातो. - बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी पुशअप्स नियमितपणे करावेत.