Join us  

मिलिंद सोमणसारखे डबल बार डिप्स! मुलांसोबत पालकांनाही खेळ म्हणून करता येईल असा व्यायाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 2:07 PM

Fitness tips: फिटनेस फ्रिक लोकांना नेहमीच मिलिंद सोमण (Milind Soman) कडून मोटीव्हेशन (fitness motivation) मिळत असते. आता हा त्याचा लेटेस्ट व्हिडियो बघा आणि फिटनेससाठी लहानपणीचा हा खेळ पुन्हा खेळा.. 

ठळक मुद्देमिलिंद सोमण करतो आहे, त्याप्रमाणे डबल बारवर डिप्स मारल्या तर हाताचे स्नायू बळकट हाेतात.शरीराच्या वरच्या भागाचा फिटनेस मेंटेन करण्यासाठी हा व्यायाम अतिशय चांगला आहे.

कॉलनीतल्या सार्वजनिक बागांमध्ये किंवा मोकळ्या पटांगणामध्ये लहान मुलांसाठी आवर्जून काही खेळ बसविलेले असतात. घसरगुंडी, सी- सॉ याप्रमाणेच आणखी एक गेम तिथे दिसून येतो आणि तो म्हणजे डबल बार. एकतर लहानपणी त्या डबलबारचे महत्त्व समजत नाही आणि दुसरे म्हणजे त्याच्यापेक्षाही अधिक ॲट्रॅक्टीव्ह असणारे घसरगुंडी आणि सी- सॉ यांच्यावर खेळण्याची क्रेझ खूप जास्त असते, त्यामुळे डबलबारकडे जरा दुर्लक्षच होते. म्हणून त्याच्यावर खेळणारी किंवा त्याला लटकणारी लहान मुले खूपच कमी असतात.... यापैकीच एक होता मॉडेल, अभिनेता मिलिंद सोमण. त्याला लहाणपणी डबलबारचा (benefits of double bar) हा खेळ भारीच आवडायचा असं त्याने नुकतंच सांगितलं आहे. 

 

आपल्याला माहितीच आहे की मिलिंद सोमण हा त्याच्या फिटनेसबाबत अतिशय जागरूक असून, त्याच्या चाहत्यांनाही तो याबाबतीत नेहमीच मोटीव्हेट करत असतो. केवळ मिलिंदच नाही तर त्याची पत्नी अंकिता आणि उषा सोमण या दोघीही फिटनेसच्या बाबतीत खूपच आग्रही आहेत. म्हणूनच तर नववर्षाची सुरुवात मिलिंदने पार्टीमध्ये दंग होऊन नाही, तर दिल्ली ते मुंबई अशी सायकल राईड करून केली होती. त्याची ही राईडही अनेकांना प्रेरणादायी ठरली.

photo credit-  google

आता मिलिंद सायकल राईड संपवून परत आला आहे आणि त्याने त्याचा आणखी एक लेटेस्ट व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (instagram video) शेअर केला आहे. यामध्ये मिलिंद डबलबार वर डिप्स (double bar dips by Milind Soman) मारताना दिसतो आहे. हा व्हिडिओ शेअर करत मिलिंदने म्हटलं आहे की लहानपणी जेव्हा डबल बार बघायचो तेव्हा त्यावर डिप्सचा एक सेट मारल्याशिवाय थांबायचोच नाही. ४० वर्षांपुर्वी डबल बार डिप्स, स्विमिंग आणि इतर काही बॉडीवेट एक्सरसाईज भरपूर करायचो, असेही मिलिंदने हा व्हिडिओ शेअर करताना सांगितले आहे. 

 

डबलबार डिप्स करण्याचे फायदे(Benefits of double bar dips in Marathi)- मिलिंद सोमण करतो आहे, त्याप्रमाणे डबल बारवर डिप्स मारल्या तर हाताचे स्नायू बळकट हाेतात.- यामुळे फुफ्फुसांचाही (useful for lungs)व्यायाम होतो आणि त्यांची ऑक्सिजन धरून ठेवण्याची क्षमता वाढते.- या प्रकारात हात, पाठ, कंबर, दंड यांचा व्यायाम होत असल्याने शरीराच्या वरच्या भागाचा फिटनेस मेंटेन करण्यासाठी हा व्यायाम अतिशय चांगला आहे.- हात आणि दंड टोन्ड होऊन त्याच्यावरची अतिरिक्त चरबी करण्यासाठी डबलबार डिप्स उपयुक्त ठरतात.- एकाग्रता वाढविण्यासाठी हा व्यायाम उपयुक्त ठरतो. - लहान मुलांनी डबल बारला नियमितपणे लटकावे. यामुळे मुलांची उंची वाढण्यास मदत होते. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सव्यायाममिलिंद सोमण