मिलिंद सोमण आणि अंकिता कोरवार हे टीव्ही इंडस्ट्रीमधलं एक फिटनेसप्रेमी जोडपं. व्यायाम, आहार आणि स्वत:चा फिटनेस याबाबतीत दोघंही नवरा- बायको अगदी परफेक्ट. मिलिंद सोमण तर सोशल मिडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना नेहमीच फिटनेसविषयी जागरूक करत असतो. त्याच्या इन्स्टा पोस्टदेखील नेहमीच प्रेरणादायी असतात. असंच काहीसं अंकिताचंही आहेच..
आता अंकिताने नुकतीच एक पाेस्ट सोशल मिडियावर शेअर (instagram share) केली आहे. या पोस्टमध्ये ती पार्श्वकोनासन हे आसन करताना दिसते आहे. फोटो कॅप्शनमध्ये ती म्हणते आहे की पार्श्वकोनासन हे तिच्या काही आवडत्या योगासनांपैकी एक आहे. कंबरेचा खालचा भाग, स्पाईन, कंबर आणि खांदे यांच्या स्ट्रेचिंगसाठी हा व्यायाम प्रकार अतिशय उत्तम आहे, असं अंकिताचं म्हणणं आहे. आसनस्थिती पाहिल्यानंतरच या आसनातून पुर्ण शरीराचंच उत्तम पद्धतीने स्ट्रेचिंग होतं, हे लगेच दिसून येतं. त्यामुळे इंचेस लॉस, वेटलॉस करून अंकिताप्रमाणे परफेक्ट फिगर मिळवायची असेल, तर करून बघा पार्श्वकोनासन.(benefits of Parsvakonasana)
पार्श्वकोनासन करण्याची योग्य पद्धत
- सगळ्यात आधी सरळ ताठ उभे रहावे. दोन्ही पायातले अंतर वाढवत न्यावे. हात वर उचलून खांद्याला समांतर करावे.
- यानंतर उजवा तळपाय उजव्या दिशेने वळवा, गुडघ्यात वाकवा आणि संपूर्ण शरीराचा भार उजव्या पायावर आणत कंबरेतून खाली वाका. यानंतर उजवा तळहात उजव्या तळपायाच्या मागच्या बाजूने ठेवा.
- डावा हात सरळ रेषेत वर न्या. कानाजवळ आणून उजव्या दिशेने कानाच्या मागे न्या. नजर आकाशाकडे स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा.
- आसनस्थिती कठीण आहे. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात ते परफेक्ट जमेल असे नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने करा आणि २५ ते ३० सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा.
पार्श्वकोनासन करण्याचे फायदे
- वजन कमी करण्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त आहे.
- कंबर, मांड्या, दंड, गळा या भागावरची चरबी कमी करण्यासाठी हे आसन नियमित करावे.
- हिप्स फॅट कमी करण्यासाठीही या आसनाचा उपयोग होतो.
- हृदयाच्या स्नायुंना मजबूती देण्यासाठी उपयुक्त
- पचनक्रिया सुधारून कॉस्टीपेशन, ॲसिडीटी असे त्रास कमी होतात.
- सायटिकाचा त्रास असणाऱ्यांसाठी हे आसन फायदेशीर आहे.
- हे आसन नियमित केल्यास गुडघे मजबूत होतात.