Join us  

एका रात्रीत चमत्कार होत नाही! मिलिंद सोमणची बायको अंकिता कोनवार सांगतेय फिट व्हायचं तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2022 2:06 PM

अंकिता कोनवारनं (ankita Konwar) आरोग्य कमावण्यासाठी फिटनेस राखण्यासाठी व्यायामरुपी (exercise for healthy life) प्रयत्नांचा वास्तववादी मार्ग सांगितला आहे. या मार्गावर संयमीपणानं प्रयत्न होत राहिले तरच आरोग्य आणि फिटनेस या दोन गोष्टी साध्य होतात.

ठळक मुद्देप्रयत्नांचा आणि कष्टांचा मार्ग टाळून  इतर कोणत्याच शाॅर्टकटने फिटनेस मिळवता येत नाही.  फिटनेस आणि आरोग्यासाठी नियमित योगसाधना करायला हवी.  योगसाधना आपल्याला शिस्त आणि संयम शिकवते. 

निरोगी आरोग्य , फिटनेस ही संपत्ती आहे जी एकाएकी मिळत नाही. ती कमवावी लागते.  त्यासाठी निरंतर प्रयत्नांची गरज असते. हे प्रयत्न कसे करायचे याबाबत विविध तज्ज्ञ आहार आणि व्यायामाबाबत सल्ले देत असतात. पण नुसतं सांगणं आणि प्रत्यक्ष स्वत: करुन इतरांना सांगणं यात फरक आहे. या दुसऱ्या पध्दतीचा लोकांवर नेमकापरिणाम होतो हे अंकिता कोनवारला (ankita konwar) माहिती आहे. त्यामुळे फिटनेससाठी (yoga for fitness)  स्वत: करत असलेल्या प्रयत्नांना, कष्टांना तिने इतरांना प्रेरणा देण्याचं साधन बनवलं आहे.

Image: Google

अंकिता  आरोग्यासाठी , फिटनेससाठी व्यायाम करण्याची इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून  सोशल मीडियाच्याद्वारे विविध पोस्ट शेअर करत असते. अंकिता कोनवारची अशीच एक पोस्ट मंडे मोटिव्हेशन नावाने व्हायरल झाली आहे.

या पोस्टमध्ये अंकिता डोंगरावर योगसाधना करताना दिसते. या पोस्टद्वारे अंकितानं फिटनेस आणि आरोग्य कमावण्याचा वास्तववादी मार्ग दाखवला आहे. संयम धरला आणि निरंतर प्रयत्न केले तर फिटनेस नक्की राखता येतो असं अंकिताचं म्हणणं आहे. 

Image: Google

फिटनेस आणि आरोग्यासाठी नियमित योगसाधना करण्याचा सल्ला देते. योगसाधना आपल्याला शिस्त आणि संयम शिकवते असं अंकिता म्हणते. योगसाधना केल्यास, नियमित व्यायाम केला तरच निरोगी आरोग्य मिळतं. आरोग्यासाठी स्वत: व्यायाम करण्याशिवाय पर्याय नाही. आरोग्य हे दुकानात आयतं विकत मिळत नाही. जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे एका रात्रीत सुदृढता आणि फिटनेस मिळवता येते नाही. 

Image: Google

प्रयत्न करण्याचा मार्ग सोडून , तो मार्ग टाळून शरीर आणि मनाला निरोगी करता येत नाही.  आपण सुदृढ नाही, फिट नाही म्हणून इतरांना दोष देता येत नाही. किंवा कोणालातरी  आपल्यासाठी फिटनेस आणून द्या किंवा मी फिट व्हावं म्हणून तुम्ही प्रयत्न करा  असं सांगून फिट होता येत नाही.  फिटनेस हा तेव्हाच मिळतो जेव्हा रोज तुम्ही स्वत: वेळ काढून, मन लावून व्यायाम करता. आपण संयम राखून रोज प्रयत्न करु तेव्हाच आपणं फिट होवू शकू हेच खरं, असं सांगत अंकिता फिटनेससाठी स्वत:च्या संयमी आणि निरंतर प्रयत्नांवर भर देत असल्याचं तिच्या पोस्टमधून दिसतं. अंकिताचा संयम धरुन प्रयत्न करा हा फिटनेस मंत्र प्रत्येकानं स्वत:च्या आयुष्यात अवश्य वापरुन पाहावा असाच आहे. 

टॅग्स :फिटनेस टिप्सअंकिता कुंवरव्यायामयोगासने प्रकार व फायदे