मिलिंद सोमण (Milind Soman Fitness) यांचे वय ५८ वर्ष असून अजूनही ते अगदी फिट, मेंटेन दिसतात. फिटनेस आणि एनर्जीच्या बाबतीत ते तरूणांनाही टक्कर देतात. (Milind Soman’s diet plan) मिलिंद अशा लोकांसाठी प्रेरणादायक आहेत जे वाढत्या वयातही फिट राहू इच्छितात. मिलिंद सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव्ह असतात. आपल्या फिटनेस टिप्स ते नेहमीच चाहत्यांसह शेअर करत असतात. अशा कोणत्या सवयी आहेत ज्या त्यांना फिट ठेवण्यास मदत करतात पाहूया. (Milind Sonam Fitness Secret and Diet Plan)
मिलिंद सोमण यांना तुम्ही अनेकदा धावताना पाहिले असेल. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण मिलिंद ना जिमला जातात ना योगा सेशन्सना. वयाच्या ३८ व्या वर्षीच मिलिंद यांनी जिमला जाणं सोडून दिले होते. त्यांचं असे मत आहे की जिम फक्त बॉडी बिल्डींगसाठी आहे फिटनेससाठी नाही. मिलिंद आजही विशीतल्या एखाद्या तरूणाप्रमाणे फिट आहेत.
पोटावर कपडे घट्ट होतात-शर्टाची बटन्स लागत नाही? ५ गोष्टी करा-पोट कमी होईल; मेंटेन राहाल
मिलिंद सोमण दर आठवड्यात ३ ते ४ वेळा रनिंग करतात आणि स्वत:ला पूर्णपणे एक्टिव्ह ठेवतात. रोज २० मिनिटांचा व्यायामही करतात. त्यांच्यामते दुखापतीचा धोका टाळण्यासाठी तुम्ही रनिंग करत नसाल तरी व्यायाम मात्र नक्की करा. जेणेकरून शरीरात नॅच्युरल मुव्हवमेंट तयार होईल. याशिवाय मिलिंद सोमण सुर्य नमस्कारही करतात.
मिलिंद सोमणं कसं डाएट फॉलो करतात?
नाश्ता
मिलिंद आपल्या दिवसाची सुरूवात ५०० मिलीलीटर पाणी पिऊन करतात. त्यानंतर १० वाजता नाश्त्यामध्ये नट्स, पपई, तरबूज, खरबूज यांसह सिजनल फ्रुट्सचा समावेश करतात.
पोट सुटलंय, दंड जाड दिसतात? घरातच भिंतीला धरून ५ व्यायाम करा, स्लिम-फिट दिसाल
लंच
२ वाजता दुपारचं जेवण करतात. जेवणात डाळीची खिचडी, स्थानिक आणि सिजनल भाज्या असतात. ज्यात २ चमचे तूपाचा समावेश करतात. कधी कधी भाज्या आणि डाळी, चपातीबरोबर खातात. महिन्यातून एकदा चिकन, अंडी खाणं पसंत करतात.
संध्याकाळीचे जेवण
संध्याकाळी ५ वाजता त्यांना ब्लॅक टी प्यायला आवडते, यात गुळ असतो. रात्री झोपण्याआधी ते अगदी साधं जेवण जेवतात. यात एक प्लेट भाजीचा समावेश असतो. भूक लागल्यास ते रात्री खिचडी खातता. त्यांना जास्त गोड खायला आवडत नाही. ते जे काही गोड खातात ते गुळापासून तयार झालेले असते.