Lokmat Sakhi >Fitness > जिम सोडली की वजन वाढतं? तज्ज्ञ सांगतात, वेळीच दूर करा गैरसमज..

जिम सोडली की वजन वाढतं? तज्ज्ञ सांगतात, वेळीच दूर करा गैरसमज..

Misconceptions about Weight Training or Strength Training Fitness Tips : शरीराला जर व्यवस्थित योग्य आकार हवा असेल तर मांस पेशींचा व्यायाम अत्यंत गरजेचा आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2023 04:20 PM2023-05-14T16:20:06+5:302023-05-14T16:49:22+5:30

Misconceptions about Weight Training or Strength Training Fitness Tips : शरीराला जर व्यवस्थित योग्य आकार हवा असेल तर मांस पेशींचा व्यायाम अत्यंत गरजेचा आहे.

Misconceptions about Weight Training or Strength Training Fitness Tips : Weight training to lose excess weight? Experts say, remove 2 misconceptions on time... | जिम सोडली की वजन वाढतं? तज्ज्ञ सांगतात, वेळीच दूर करा गैरसमज..

जिम सोडली की वजन वाढतं? तज्ज्ञ सांगतात, वेळीच दूर करा गैरसमज..

मनाली मगर-कदम

शरीरातील वाढलेली चरबी कमी करायची असेल, स्नायू बळकट करायचे असतील किंवा कॅलरीज बर्न करायच्या असोत स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा वेट ट्रेनिंग हा त्यावरील उत्तम उपाय समजला जातो. वयानुसार स्नायू नैसर्गिकरित्या कमी होतात. ज्या गोष्टी आपण योग्य वेळी वापरत नाही त्या गोष्टींचा ऱ्हास होत जातो. जसे, पूर्वीच्या काळी मनुष्याने हळूहळू शेपटीचा उपयोग करणे कमी केले, तशी शेपूट नाहीशी झाली. त्याचप्रमाणे जर आपण मांस पेशीचा योग्य रीतीने वापर केला नाही तर हळूहळू मांस  पेशी कमी होऊ लागतात (Misconceptions about Weight Training or Strength Training Fitness Tips).

तसेच पुढच्या पिढीलाही मांस पेशी कमवायला थोडासा वेळ लागू शकतो. ज्याला आपण अनुवंशिकता असे म्हणतो. शरीराचा आकार हा मांसपेशीवर अवलंबून असतो. त्यामुळे शरीराला जर व्यवस्थित योग्य आकार हवा असेल तर मांस पेशींचा व्यायाम अत्यंत गरजेचा आहे. त्यामध्येही वेट ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. आपल्या मनात याविषयी बरेच गैरसमज असतात. हे गैरसमज वेळीच दूर करुन या व्यायामाबाबत योग्य ती माहिती घेतलेली केव्हाही चांगली. 

(Image : Google)
(Image : Google)

गैरसमज: जर वेट ट्रेनिंग केले आणि सोडले तर वजन दुपटीने वाढते.

सत्य: वेट ट्रेनिंग करताना मांस पेशी वाढवल्या जातात, त्या  वाढल्याने कॅलरीज जास्त जळतात आणि चरबीचे प्रमाण कमी होत जाते. त्याच वेळेस योग्य आहार घेत असताना मांस पेशी टिकवण्यासाठी ,वाढ होण्यासाठी चरबीचा वापर होतो. पण ट्रेनिंग सोडले आणि तोच आहार ठेवला तर वजन नक्कीच वाढेल. यासाठी जसा व्यायाम बदलाल तसा आहार बदलावा.

(Image : Google)
(Image : Google)

गैरसमज: हा व्यायाम प्रकार स्त्रियांसाठी नाही

सत्य: टेस्टोस्टेरॉन हार्मोन म्हणजेच संप्रेरक, जो पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. तर स्त्रियांमध्ये काही प्रमाणात आढळतो. ज्यामुळे स्नायूंचे प्रमाण वाढते. स्त्रियांसाठी हा सर्वोत्तम व्यायाम आहे. वेट ट्रेनिंगमुळे त्यांच्या स्नायूंची ताकद वाढते. पाळी जाण्यामुळे हाडांची जी झिज होते किंवा ठिसूळ होतात त्यांना आधार देण्याचे काम मांस पेशी करतात. टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमी असल्यामुळे शरीर बळकट दिसत नाही, त्यामुळे स्त्रियांनी हा व्यायाम नक्की करावा.

(लेखिका योग शिक्षिका आहेत)

manali227@gmail.com

Web Title: Misconceptions about Weight Training or Strength Training Fitness Tips : Weight training to lose excess weight? Experts say, remove 2 misconceptions on time...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.