वर्कआऊट करणं म्हणजे स्वत:ला भरपूर घाम येऊ देणं असं खूप जणांना वाटतं. भरपूर घाम आला (sweating during workout) म्हणजे मग आजचं आपलं वर्कआऊट सेशन एकदम बेस्ट झालं असं समजलं जातं. त्यामुळेच तर वर्कआऊट नंतर आपल्याला किती घाम आला आहे, हे दाखविण्यासाठी खास सेल्फीही काढले जातात आणि ते साेशल मिडियावर मोठ्या स्टाईलमध्ये अपलोड केले जातात.. पण त्यात कितपत तथ्य आहे हे जाणून घेतलं पाहिजे.
अभ्यासकांच्या मते खूप घाम येणं म्हणजे खूप फॅट लॉस (fat loss) होणं असं मुळीच नसतं. वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहायला गेल्यास घाम आपल्या शरीराला थंड ठेवण्याचे काम करतो. जेव्हा तुम्ही खूप व्यायाम करता, तेव्हा तुमच्या शरीराचे तापमान वाढत जाते. शारिरीक तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्याला घाम येत राहतो.
खूप घाम यावा, जेणेकरून जास्तीत जास्त फॅट लॉस होईल, म्हणून खूप व्यायाम करत असाल, तर असं करू नका. शरीराला आवश्यक असेल तेवढाच व्यायाम करा. कारण जास्त व्यायाम केल्याने तुमच्या गरजेपेक्षा जास्त कॅलरी बर्न होतील. कॅलरी इनटेकपेक्षा बर्न जास्त असेल, तर व्यायामाने थकवा, अशक्तपणा जाणवू शकतो. त्यामुळे कॅलरीनुसार आणि तुमच्या वजनानुसार तुम्हाला डेली किती आणि कसं वर्कआऊट गरजेचं आहे, हे एकदा फिटनेस एक्सपर्टकडून जाणून घ्या. यासोबतच आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे व्यायाम करून घाम आल्याने तुमच्या कॅलरी बर्न होऊन वेटलॉस होतो, फॅटलॉस नाही.
वेटलॉस आणि फॅटलॉसमध्ये नेमका काय फरक? (difference between weight loss and fat loss)
तुमच्या शरीराचं एकूण वजन किती, त्यात किती घट झाली आहे, याचं मोजमाप म्हणजे वेटलॉस. त्याउलट फॅटलॉस म्हणजे तुमच्या शरीराच्या विविध भागांवर जमा झालेली चरबी कमी होणं. फॅटलॉस करण्यासाठी तुम्हाला त्या- त्या विशिष्ठ भागावर फोकस करावं लागतं आणि त्यानुसार चरबी घटवावी लागते. त्यामुळेच फॅटलॉसला इंचेस लॉस म्हणूनही ओळखलं जातं. आपलं वजन कंट्रोलमध्ये असेल, फक्त शरीराच्या काही भागात चरबी वाढायला सुरुवात झाल्याचं जाणवायला लागलं असेल तर त्यासाठी वेटलॉस वर्कआऊट ऐवजी फॅटलॉस वर्कआऊट निवडलं तर अधिक फायदा हाेतो.