Join us  

पन्नाशीतही मलायका अरोराचे सौंदर्य लाजबाब, सकाळी उठल्या-उठल्या पिते खास ड्रींक, पाहा रेसिपी-फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2023 12:23 PM

Morning Detox Drink Recipe of Malaika Arora : मॉर्निंग रुटीनमध्ये मलायका रोज पिते खास ड्रिंक.

ठळक मुद्देसगळे घटक आपल्या घरात सहज उपलब्ध असल्याने आपण हे ड्रींक अगदी सहज करु शकतो. बॉडी डिटॉक्स करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या रिलेशनशिपवरुन कायमच चर्चेत असते. त्याचबरोबर फिटनेसबाबतही ती चर्चेत असते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वयाच्या ५० व्या वर्षीही मलायकाची फिगर तरुणींना लाजवेल अशी आहे. इतकेच नाही तर वय वाढलं तरी तितिच्या सौंदर्यातही फारसा फरक पडलेला नाही. याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे ती करत असलेला व्यायाम आणि तिचा आहार हेच आहे. मलायकाचं फिटनेसबाबतचे प्रेम जगजाहीर आहे. आपल्यासोबतच आपले चाहतेही फिटनेसबाबत जागरुक असावेत, असा तिचा प्रयत्न असतो (Morning Detox Drink Recipe of Malaika Arora). 

त्यामुळेच तर सोशल मिडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबत नेहमीच खास फिटनेस टिप्स शेअर करत असते. आता मलायका असं काय करते जेणेकरुन तिचं सौंदर्य आणि फिगर या वयातही तितकीच हॉट आहे. तर मलायका रोज सकाळी उठल्यावर एक खास ड्रींक घेते. ज्यामुळे तिची बॉडी डीटॉक्स व्हायला मदत होते. मलायकाने आपल्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीमध्ये या ड्रींकचा फोटो शेअर केला होता. शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडले तर नकळत आपलं शरीर जास्त हेल्दी राहण्यास मदत होते. आता हे ड्रींक कसं तयार करायचं आणि त्याचे फायदे काय ते पाहूया.  

(Image : Google)

मॉर्निंग ड्रींकची रेसिपी...

१. रात्री एका ग्लासभर पाण्यात १ चमचा मेथ्या, १ चमचा ओवा आणि १  चमचा जीरं घालायचं. 

२. रात्रभर हे पाणी तसंच ठेवायचं म्हणजे या तिन्ही घटकांचे पोषण या पाण्यात उतरते. 

३. सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून घ्यावे आणि उठल्या उठल्या प्यावे.

फायदे 

१. मेथ्या वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. तसेच यामुळे पोट भरल्याचा फिल येतो, त्यामुळे आहार नकळत कमी घेतला जातो. 

(Image : Google)

२. ओवा हा पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. मेटाबॉलिझम वाढण्यासाठी आणि अन्नातील पोषक घटक शोषून घेण्यासाठी ओवा उपयुक्त ठरतो. शरीरात फॅटस साचून राहू नयेत म्हणून ओवा खाणे फायद्याचे असते. 

३. जीरंही बॉडी डीटॉक्स करण्यासाठी अतिशय उपयुक्त असतं. हे सगळे घटक आपल्या घरात सहज उपलब्ध असल्याने आपण हे ड्रींक अगदी सहज करु शकतो. 

टॅग्स :फिटनेस टिप्सलाइफस्टाइलमलायका अरोरा