सध्याच्या काळात वजन वाढीच्या समस्येने आपल्यापैकी बरेचजण त्रस्त असलेलं दिसत आहे. वजन वाढणे ही आता एक गंभीर समस्या झाली आहे. आताच्या बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच व्यायामाचा अभाव यांसारख्या अनेक कारणांमुळे वजन वाढीची समस्या उद्भवते आहे. अतिरिक्त वजनामुळे हृदयविकार (Heart Disease), डायबेटीस (Diabetes) यांसारख्या गंभीर आजारांचा धोकाही वाढत आहे. वजन नियंत्रणात राहण्यासाठी, तसंच गंभीर आजार होऊ नयेत याकरिता बहुतांश जण योग्य आहार, व्यायाम, ताण-तणाव व्यवस्थापनावर भर देताना दिसतात. परंतु, काही जणांकडून कळत-नकळतपणे काही चुका होतात. त्यामुळे त्यांचं वजन (Weight) तर वाढतंच; तसंच त्यांना अनेक आजारांचा सामनादेखील करावा लागतो.
वजन वाढताना ते काही एका रात्रीत वाढत नाही. त्यासाठी बराच वेळ लागतो. आपले वजन वाढत आहे, याचे संकेत आपले शरीर आधीच द्यायला सुरू करते. बदललेली लाइफस्टाइल, खाण्या - पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि कमी झालेली शारीरिक हालचाल यामुळे वजन वाढण्याची समस्या वाढली आहे. लठ्ठपणा येण्याआधी सुरुवातीला तुम्हाला अनेक संकेत देतो, परंतु आपल्याला ते समजत नाही आणि वजन वेगाने वाढत जाते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. काही लोक हेवी वर्कआउट करतात, तर काही वेगवेगळ्या प्रकारचे डाएट फॉलो करतात. इतकेच नाही तर काही लोक वजन कमी करण्यासाठी खाणेही बंद करतात. परंतु असे उपाय करून त्याचा आपल्या शरीरावर काहीच फायदा होत नाही. आहारतज्ज्ञ क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि वेलनेस कन्सल्टंट शीनम के मल्होत्रा यांनी वजन कमी करण्यासाठी सर्कलच्या मॉर्निंग रुटीनमध्ये काही खास गोष्टीचा समावेश करण्यास सांगितला आहे(Morning Habits For Weight Loss - 5 Practices You Should Do In The Morning).
लठ्ठपणा कमी करण्यासाठी मॉर्निंग रुटीनमध्ये कराव्यात या ३ गोष्टी :-
१. ऑईल पुलिंग (Oil Pulling) :- पूर्वीच्या काळातील लोक ऑईल पुलिंग करून शरीराच्या अनेक समस्या दूर करत असत. आयुर्वेदानुसार ऑईल पुलिंग (Oil Pulling) करणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे. नियमितपणे सकाळी उठल्यानंतर ऑईल पुलिंग केल्याने तोंडातील बॅक्टेरिया आणि दुर्गंधी दूर होते, हिरड्यांची सूज कमी होते, शरीर डिटॉक्स होऊन शरीराला ऊर्जा मिळते. ऑईल पुलिंग करण्यासाठी तोंडात चमचाभर तिळाचे किंवा खोबरेल तेल घेऊन १० ते १५ त्या तेलाने तोंडात हिरड्यांना, दातांना, तोंडातील त्वचेला मसाज करून घ्यावा. त्यानंतर हे तेल न गिळता बाहेर थुंकून टाकावे.
पोटावरील वाढत्या चरबीने हैराण ? ५ सोपे उपाय, पोटावरील चरबी होईल दिसेनाशी...
२. रिकाम्या पोटी २ ग्लास कोमट पाणी प्या :- सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी २ ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय शरीरातील आवश्यक अवयवांना हायड्रेटेड आणि निरोगी ठेवते, ज्यामुळे ते योग्यरित्या कार्य करू शकतात. पाणी रक्ताभिसरणात मदत करते, जे पेशींमध्ये पोषक द्रव्ये वाहून नेते आणि विषारी पदार्थ शरीरा बाहेर काढून टाकते. सकाळी उठल्यावर पाणी प्यायल्यास संपूर्ण शरीर हायड्रेट राहते. यामुळे तुमची चयापचय क्रिया मजबूत होण्यास मदत करते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. याशिवाय सकाळी पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि आपण आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकता. याशिवाय पाणी शरीराला डिटॉक्स करते, ज्यामुळे चेहेऱ्यावर चमक येते आणि केसांचे आरोग्य चांगले राहते.
कोण म्हणतं वजन कमीच होत नाही? ४ साधे-सोपे उपाय-वजन कमी होणारच...
३. भिजवलेले ड्रायफ्रुटस खावेत :- कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रुटस हे फॅटी ऍसिडस्, अँटी-ऑक्सिडंट्स, कार्बोहायड्रेट्स, अमीनो ऍसिड इत्यादी पोषक घटकांनी समृद्ध असतात. जेव्हा आपण ड्रायफ्रुटस आणि बिया रात्रभर पाण्यात भिजवून ठेवतो तेव्हा त्यातील हानिकारक एन्झाईम्स काढून टाकले जातात आणि त्यातील पोषक द्रव्ये वाढतात, यामुळे ड्रायफ्रुटस नेहमी पाण्यात भिजवून मगच खाण्याला प्राधान्य द्यावे. भिजवलेले ड्रायफ्रुटस खाल्ल्याने आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकताच शिवाय त्वचा आणि केसांचे आरोग्य आणि सौंदर्य यांच्यातही भर पडली जाते. सकाळी भिजवलेले ड्रायफ्रुटस खाल्ल्याने आपल्याला दिवसभर ऊर्जा मिळते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणि वजन नियंत्रित ठेवले जाते. त्याचबरोबर यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते, मानसिक आरोग्य चांगले राहते. हे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते आणि हार्मोन्स नियंत्रणात ठेवण्याचे काम करते.
वजन कमी करण्याचा ५० - ३५ - १५ फॉर्म्युला, ऋजुता दिवेकर सांगतात लठ्ठपणा कमी करण्याची खास ट्रिक...