Lokmat Sakhi >Fitness > योगासनं करायची पण तुमच्याही मनात योगाभ्यासाविषयी ४ गैरसमज आहेत ? स्वत:ला तंदुरुस्त ठेवायचं असेल तर...

योगासनं करायची पण तुमच्याही मनात योगाभ्यासाविषयी ४ गैरसमज आहेत ? स्वत:ला तंदुरुस्त ठेवायचं असेल तर...

4 Yoga Myths You Should Stop Believing : Most Common Myths about Yoga : योगासने शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात, परंतु काहीजण योगाबद्दल अनेक गैरसमजांना खरे मानतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2024 07:58 AM2024-06-21T07:58:34+5:302024-06-21T08:11:50+5:30

4 Yoga Myths You Should Stop Believing : Most Common Myths about Yoga : योगासने शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात, परंतु काहीजण योगाबद्दल अनेक गैरसमजांना खरे मानतात...

Most Common Myths about Yoga Yoga Myths & Facts 4 Yoga Myths You Should Stop Believing Most Common Myths about Yoga | योगासनं करायची पण तुमच्याही मनात योगाभ्यासाविषयी ४ गैरसमज आहेत ? स्वत:ला तंदुरुस्त ठेवायचं असेल तर...

योगासनं करायची पण तुमच्याही मनात योगाभ्यासाविषयी ४ गैरसमज आहेत ? स्वत:ला तंदुरुस्त ठेवायचं असेल तर...

आजकाल सगळ्यांनाच फिट राहायला आवडते. त्यासाठी आपण काही ना काही ऍक्टिव्हिटी करत असतो. सध्या सगळीकडेच जिमिंग सोबतच योगा करण्याची क्रेझ दिसून येते. योग आपल्या जीवनातील मानसिक ताण-तणाव कमी करून आपल्या शरीरातील सर्व अवयवांचे शुद्धीकरण करतो. योगासनं करताना ती व्यवस्थितच, नियमांचे पालन करुनच केली पाहिजेत, तरच त्याचा आपल्या शरीराला फायदा मिळू शकतो(These Yoga Myths Need To Be Busted, Check Out The Facts Here).

योग (Yoga Myths & Facts) हा खूप प्राचीन असला तरी गेल्या काही वर्षांत तो अधिकाधिक लोकप्रिय झाला आहे. त्यामुळे लोकांच्या मनात याबाबत अनेक प्रकारच्या कल्पना निर्माण झाल्या आहेत. योगाबद्दल लोक अनेक गैरसमजांना खरे मानतात. योगाशी संबंधित अशाच काही गैरसमजांमागील सत्य जाणून घेऊयात(4 Most common yoga misconceptions that one must never believe).

योगा संदर्भात नेमके कोणते गैरसमज आहेत ? 

गैरसमज १ :- योगा करण्यासाठी आपले शरीर लवचिक असणे गरजेचे आहे. 

सत्यता :- योगासनादरम्यान आपण अनेक प्रकारच्या आसनांचा सराव करत असतो. बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की योगाभ्यास करण्यासाठी शरीर लवचिक असणे आवश्यक असते. परंतु प्रत्यक्षात हा एक भ्रम आहे. जेव्हा आपण नियमितपणे योगासन करतो तेव्हा आपले शरीर आपोआपच वेळोवेळी अधिक लवचिक बनत जाते. अशी अनेक योगासने आहेत जी आपल्याला सुरुवातीला कोणत्याही अडचणीशिवाय करू शकता येतील. त्यामुळे आपली शारीरिक क्षमता लक्षात घेऊन आपण योगाभ्यास करू शकता. 

गैरसमज २ :- योग फक्त महिलांसाठी आहे. 

सत्यता :- योगाबद्दल ही एक सामान्य समज असा आहे की, योगा फक्त महिलांसाठी आहे. तर प्रत्यक्षात तसे नाही. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत, महिलांपासून पुरुषांपर्यंत कोणीही सहज योग करु शकतो. आजही जगभरात अनेक पुरुष योगाभ्यास करतात आणि त्याचे शारीरिक आणि मानसिक लाभ घेतात.

वेळ मिळेल तसा केव्हाही व्यायाम करताय ? थांबा, एक्स्पर्ट सांगतात योग्य वेळ कोणती... 

गैरसमज ३ :- योग करणे सोपे आहे खरंतर योग हे वर्कआऊट नाही. 

सत्यता :- अनेक लोकांना असे वाटते की, योग करणे फारच सोपे असून, योग खरोखर शरीराला आराम किंवा रिलॅक्स करण्यासाठी केला जातो. काहीजणांना असे वाटते की, योगासनं करण्यासाठी खूप सोपी असल्याने शरीराचा व्यायाम होऊ शकत नाही. योगासन करण्यासाठी  खूप सोपी असल्याने आपल्याला असे   वाटत असेल तर ते चुकीचे आहे. आपण शरीराला ताण देण्यासाठी अनेक प्रकारचे योग करु शकता. हे खूप आव्हानात्मक असू शकते. योग करताना आपण  असे अनेक व्यायाम करू शकता, ज्यामुळे आपल्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होऊ शकतो. यासाठी आपण अष्टांग किंवा पॉवर योगाची मदत घेता येईल. 

गैरसमज ४ :- गर्भधारणेदरम्यान आणि मासिक पाळीच्या काळात महिलांनी योगा करू नये. 

सत्यता :- साधारणपणे असे म्हटले जाते की, महिलांनी गर्भधारणेदरम्यान किंवा मासिक पाळीच्या काळात योगा करू नये. त्यामुळे त्यांची गुंतागुंत अधिक  वाढेल. तर प्रत्यक्षात तसे होत नाही. अशी अनेक योगासने आहेत, जी गर्भधारणेदरम्यान आणि मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या समस्या कमी किंवा दूर करण्यात मदत करतात. मात्र, या काळात कोणत्याही महिलेने स्वतःहून योगाभ्यास करू नये. योग तज्ज्ञांच्या देखरेखीखाली योगा केल्यास अधिक फायदेशीर  होईल. असे केल्यास मासिक पाळी नियमित होते आणि वेदनाही तुलनेने कमी होतात. त्याचप्रमाणे योगामुळे प्रसूतीची प्रक्रियाही सुलभ होऊ शकते.

ऐन तिशीतच दिसतेय ढेरी ? करा आल्याचा एक सोपा उपाय, राहाल कायम स्लिम - ट्रिम... 

Web Title: Most Common Myths about Yoga Yoga Myths & Facts 4 Yoga Myths You Should Stop Believing Most Common Myths about Yoga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.