Join us  

कोण म्हणतं बारीक होण्यसााठी चपाती सोडा? ५ गोष्टी करा, वजन आपोआप होईल कमी-मेंटेन राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 3:56 PM

Most Effective Way For Weight Loss : वजन कमी करण्यसााठी तुम्ही आपल्या आहारात चपातीचा समावेश करू शकता.

डायटिंगने लठ्ठपणा कमी करण्याचा ट्रेंड अनेक वर्षांपासून वाढला आहे. डायटिंग करून तुम्ही वजन तर कमी करू शकता पण याचे शरीरावर अनेक साईड इफेक्ट्स दिसून येतात. म्हणूच गरजेपेक्षा जास्त डायटिंग करण्यापेक्षा तुम्ही लॉग्न टाईम फिटनेसकडे लक्ष द्या. वजन कमी करण्यासाठी फक्त चपाती खाणं सोडून चालणार नाही. वर्कआऊट, कॅलरीज, दिवसभरातील कार्ब्स इन्टेक आणि लाईफस्टाईल या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. (Most Effective Way For Weight Loss)

डायटिशियनने वजन कमी करण्यासाठी दिवसाला किती चपात्या खाव्यात याबाबत सांगितले आहे.न्युट्रिशनिस्ट वेट लॉस कोच आणि किटो डायटिशियन स्वाती सिंह यांच्यामते फक्त चपाती खाणं सोडल्यानं वजन कमी होत नाही. (Most Effective Way For Weight Loss Fast Count Your Calories And Carbs How Many Roti Per Day)

यासाठी तुम्ही दिवसभरातील कॅलरीज इन्टेकवरही लक्ष द्यायला हवं.  तुम्ही दिवसभरात किती कॅलरीज घेत आहात किती कॅलरीज दिवसभरात बर्न करत आहात ते समजून घ्या. तुम्हाला कोणतीही मेडिकल स्थिती पीसीओडी, थायरॉईड आणि मेटाबॉलिझ्म स्लो होते आणि वजन घटवण्यासाठी मदत होते.

चपातीव्यतिरिक्त इतर पदार्थांमध्येही कार्बोहायड्रेट्स असतात. जेव्हा तुम्ही चपाती खाण्याचा प्लॅन करता तेव्हा संपूर्ण दिवसाचा कार्बोहायड्रेट इन्टेक लक्षात घेऊन डाएट तयार केलं जातं. जर तुम्ही दिवसभराच्या वर्कआऊटनं चांगल्या कॅलरीज बर्न करत असाल तर त्याच्या आधारावर तुम्ही दिवसभरातील कार्बोहायड्रेटस मॉनिटर करू शकता.

कंबर दुखते-हाडं कमजोर झाली? 'या' वेळेत १ ग्लास दुधात मखाने घालून खा; पोलादी होईल शरीर

कार्बोहायड्रेट्स फक्त चपातीत नसतात. ब्रेड, दलिया, बिस्किट्, तांदूळ, मिलेट्स यांमध्येही कार्बोहायड्रेट्स असतात. तुम्ही चपाती खाणं सोडलं आणि इतर पदार्थ खात असाल तर तुम्ही कार्बाहायट्रे्सचा इन्टेक मॅनेज करू शकत नाही आहात.

वजन कमी करण्यासाठी १ दिवसाला किती चपात्या खाव्यात?

वजन कमी  करण्यसााठी तुम्ही आपल्या आहारात चपातीचा समावेश करू शकता. जर तुम्ही दुपारच्या जेवणाला २ चपात्या खात असाल तर एकच खा, डाळी, भाज्या, दही, सॅलेड्सचे आहारातील प्रमाण वाढवा तुम्ही व्यायाम कराल तेव्हा निश्चितच वजन कमी होईल.

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य