Lokmat Sakhi >Fitness > चपातीऐवजी 'हा' पदार्थ खाऊन जया किशोरींनी घटवलं वजन; १५ दिवसांत वेट लॉस करण्याचे सिक्रेट

चपातीऐवजी 'हा' पदार्थ खाऊन जया किशोरींनी घटवलं वजन; १५ दिवसांत वेट लॉस करण्याचे सिक्रेट

Jaya Kishori Fitness Weight Loss : मी जंक फूड खाणं पूर्णपणे बंद केलं होतं. ९८ ते ९९ टक्के सात्विक आहार घेत होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 08:38 AM2023-11-05T08:38:00+5:302023-11-05T08:40:02+5:30

Jaya Kishori Fitness Weight Loss : मी जंक फूड खाणं पूर्णपणे बंद केलं होतं. ९८ ते ९९ टक्के सात्विक आहार घेत होती.

Motivational Speaker Jaya Kishori's Incredible Weight Loss Transformation Jaya Kishori Fitness weight Loss | चपातीऐवजी 'हा' पदार्थ खाऊन जया किशोरींनी घटवलं वजन; १५ दिवसांत वेट लॉस करण्याचे सिक्रेट

चपातीऐवजी 'हा' पदार्थ खाऊन जया किशोरींनी घटवलं वजन; १५ दिवसांत वेट लॉस करण्याचे सिक्रेट

प्रसिद्ध कथावाचक आणि मोटिव्हेशनल स्पिकर जया किशोरी यांना सगळेचजण ओळखतात.  त्या कृष्ण भक्त म्हणून ओळखल्या जातात. (Motivational Speaker Jaya Kishori's Incredible Weight Loss Transformation) फक्त भारतातच नाहीतर विदेशातही त्यांच्या भजनांच्या आणि प्रवचनाच्या शैलीची स्तृती होती. जगभरात जया किशोरीचे लाखो चाहते आहेत. आपल्या फिटनेसमुळे जया किशोरी प्रचंड चर्चेत असते. (Jaya Kishori Fitness Eat Bajra-Roti For weight Loss)

जया किशोरी यांचे वेट लॉस सिक्रेट काय?

जया आता जितक्या फिट दिसतात तशा त्या पूर्वी नव्हत्या.  एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की १५ दिवसांत वजन कमी केले आहे. यासोबतच त्यांनी डाएट प्लॅनसुद्धा शेअर केला आहे. त्यांनी इतक्या कमी वेळेत वजन कसे कमी केले त्यांचा फिटनेस प्लॅनसुद्धा शेअर केला आहे.

जया किशोरी यांनी १५ दिवसांत वजन कसे कमी केले?

एका मुलाखती दरम्यान उत्तर देताना मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरी यांनी सांगितले की,  ''सुरूवातीला मी वजन कमी करण्याासठी क्रॅश डाएटचा आधार घेतला. पण खूप कमी वेळात मला माझ्या निर्णयाचा पश्चाताप झाला. मी जवळपास प्रत्येक पदार्थ  खाणं बंद केलं होतं.

पोटावर कपडे घट्ट होतात-शर्टाची बटन्स लागत नाही? ५ गोष्टी करा-पोट कमी होईल; मेंटेन राहाल

ज्यामुळे माझं वजन तर कमी होत होत पण आरोग्याचंही नुकसान  झाले. मी कोणत्याच गोष्टीत फोकस करू शकत नव्हते, पुस्तक वाचण्यासही माझं मन लागायचं नाही. तेव्हा मला समजलं की ही पद्धत आपल्या शरीरासाठी योग्य नाही. शरीरासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत मग डोकं कसं चालणार?''

पुढे त्या म्हणाल्या, ''मी जंक फूड खाणं पूर्णपणे बंद केलं होतं.  ९८ ते ९९ टक्के सात्विक आहार घेत होती. कधीतरी त्या तांदूळ आणि बेसनाचा आहारात समावेश करत होते. वजन कमी करताना शुगर लेव्हलही कंट्रोलमध्ये राहील असे पाहिले. गव्हाच्या चपातीऐवजी बाजरीच्या भाकरीचा आहारात समावेश केला. रेग्युलर व्यायामाला वेट लॉस जर्नीचा भाग बनवले.  जास्तीत जास्त पाणी प्यायले. याशिवाय त्या जमेल तसं व्यायामही करत होत्या.

Web Title: Motivational Speaker Jaya Kishori's Incredible Weight Loss Transformation Jaya Kishori Fitness weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.