Lokmat Sakhi >Fitness > वजन कमी करायचं तर आधी पचन सुधारा! करा ४ गोष्टी, झटपट कमी होतील नकोसे फॅट्स

वजन कमी करायचं तर आधी पचन सुधारा! करा ४ गोष्टी, झटपट कमी होतील नकोसे फॅट्स

Natural Home Remedies for Indigestion and Fat loss पचनक्रिया बिघडली तर अनेक आजार निर्माण होतात, यासाठी आयुर्वेदिक उपायांना फॉलो करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2023 02:01 PM2023-06-09T14:01:45+5:302023-06-09T14:03:14+5:30

Natural Home Remedies for Indigestion and Fat loss पचनक्रिया बिघडली तर अनेक आजार निर्माण होतात, यासाठी आयुर्वेदिक उपायांना फॉलो करा..

Natural Home Remedies for Indigestion and Fat loss | वजन कमी करायचं तर आधी पचन सुधारा! करा ४ गोष्टी, झटपट कमी होतील नकोसे फॅट्स

वजन कमी करायचं तर आधी पचन सुधारा! करा ४ गोष्टी, झटपट कमी होतील नकोसे फॅट्स

महिलांचं शरीर हे वयानुसार बदलत राहते. व्यस्त जीवनशैलीमुळे महिलांना स्वतःकडे लक्ष द्यायला जमत नाही. ज्यामुळे लठ्ठपणा ही समस्या निर्माण होते. त्यांना एक्सरसाइज करायला देखील वेळ मिळत नाही. अशा स्थितीत लठ्ठपणासह शरीरात इतरही आजार उद्भवतात. लठ्ठपणा फक्त सौंदर्य नाही तर हेल्थसाठी देखील घातक आहे. वजन कमी करण्यासाठी महिला व्यायाम, योग्य आहाराचे सेवन यासह इतर उपाय करून पाहतात. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर आयुर्वेदिक उपाय करून पाहा.

यासंदर्भात, आयुर्वेद एक्स्पर्ट डॉक्टर चेताली सांगतात, ''पचनाशी संबंधित समस्यांनी त्रस्त लोकांसाठी वजन कमी करणे कठीण जाते. परंतु, पचनाच्या संबंधित समस्या कमी झाल्यानंतर फ्रेश व ताजेतवाने वाटते. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर, या आयुर्वेदिक उपाय करून पाहा. फरक नक्की दिसेल''(Natural Home Remedies for Indigestion and Fat loss).

सकाळी कोमट पाणी प्या

सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यायल्याने पोट साफ होते. बद्धकोष्ठता दूर होते, पचनशक्ती वाढते. ज्यामुळे आपल्याला हलके वाटते. पचनक्रिया नीट चालल्यास आपले वजन देखील कमी होण्यास मदत होते.

जेवताना तोंडी लावण्यासाठी करा कांद्याच्या ४ प्रकारच्या चटपटीत चटण्या, ५ मिनिटांत चविष्ट चटणी

डायजेस्टिव सीड मिक्स

या ३ प्रकारच्या बिया आपल्याला अन्न पचवण्यास मदत करतील. जेवल्यानंतर या ३ बियांची पावडर खाल्ल्याने अन्न नीट पचते. यासह पित्त आणि वात दोष संतुलित करते.

कृती

बडीशेप, ओवा, आणि तीळ समप्रमाणात भाजून त्याची पावडर तयार करा. व ही पावडर जेवणानंतर कोमट पाण्यात मिसळून किवा असेच खा.

मुग डाळ

मुग डाळ ही पौष्टीक डाळींपैकी एक आहे. ही डाळ लवकर पचते ज्यामुळे चयापचय क्रिया योग्य काम करते. या डाळीत फायबर भरपूर असल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. जर आपण आपल्या आहारात मूग डाळीचा समावेश केला तर, आपले आरोग्य चांगले राहेल.

सिमला मिरचीची चविष्ट चटणी खाऊन तर पाहा, रेसिपी सोपी - तोंडाला येईल चव

हर्बल चहा

किचनमध्ये असलेल्या मसाल्यांपासून तयार हर्बल चहा, पचनक्रिया व्यवस्थित राखण्यास मदत करतो. तसेच लठ्ठपणा, PCOD, मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, बद्धकोष्ठता इत्यादी समस्या दूर होतात.

साहित्य

पाणी - 1 कप

धणे - 1 टीस्पून

बडीशेप - 1 टीस्पून

वेलची - १

कढीपत्ता - मूठभर

पद्धत

सर्व गोष्टी पाण्यात घालून ५ मिनिटे उकळवत ठेवा. हे पाणी गाळून प्या.

Web Title: Natural Home Remedies for Indigestion and Fat loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.