Lokmat Sakhi >Fitness > वाढलेलं युरीक ॲसिड कमी करणारे ५ पदार्थ; रोज खा, युरिक ॲसिडमुळे होणारी हाडांची दुखणी, शरीरावरची सूज टाळा

वाढलेलं युरीक ॲसिड कमी करणारे ५ पदार्थ; रोज खा, युरिक ॲसिडमुळे होणारी हाडांची दुखणी, शरीरावरची सूज टाळा

Natural Ways to Reduce Uric Acid in the Body : रक्तात जमा झालेले अतिरिक्त युरीक ॲसिड काढून टाकण्यासाठी दिवसातून किमान दोनदा लिंबू पाणी प्यावे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 12:37 PM2023-04-24T12:37:56+5:302023-04-24T14:22:59+5:30

Natural Ways to Reduce Uric Acid in the Body : रक्तात जमा झालेले अतिरिक्त युरीक ॲसिड काढून टाकण्यासाठी दिवसातून किमान दोनदा लिंबू पाणी प्यावे.

Natural Ways to Reduce Uric Acid in the Body : 5 Remedies will remove uric acid accumulated in bones | वाढलेलं युरीक ॲसिड कमी करणारे ५ पदार्थ; रोज खा, युरिक ॲसिडमुळे होणारी हाडांची दुखणी, शरीरावरची सूज टाळा

वाढलेलं युरीक ॲसिड कमी करणारे ५ पदार्थ; रोज खा, युरिक ॲसिडमुळे होणारी हाडांची दुखणी, शरीरावरची सूज टाळा

शरीरात तयार होणारं युरीक ॲसिड किडनीद्वारे बाहेर पडतं.  जर शरीर युरीक ॲसिड बाहेर निघत नसेल तर तुम्हाला हायपरयुरिसीमियाचा त्रास असू शकतो. रक्त तपासणीद्वारे  युरिक एसिडच्या पातळीबाबत शरीरात यूरिक ऍसिडचे उच्च प्रमाण शोधले जाऊ शकते. शरीरात युरीक ॲसिडची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. (5 remedies will remove uric acid accumulated in bones)

युरीक ॲसिडचे प्रमाण किती असावे?

पुरुषांमध्ये 3.4 ते 7 mg/dL आणि स्त्रियांमध्ये 2.4 ते 6 mg/dL असावी. असे मानले जाते की शरीरातून अतिरिक्त  युरीक ॲसिड बाहेर काढण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. तसेच, भरपूर ताजी फळे आणि भाज्या खा. 

- NCBI वर प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसारयुरीक ॲसिड कमी करण्यासाठी, आपण दररोज एक ग्लास पाण्यात एक चमचे सफरचंद सायडर व्हिनेगर मिसळून प्यावे. हे नैसर्गिक क्लीन्सर आणि डिटॉक्सिफायर म्हणून काम करते. यात मॅलिक ॲसिड असते जे शरीरातून युरीक ॲसिडचे तुकडे आणि काढून टाकण्यास मदत करते. तुम्ही दिवसातून किमान एक सफरचंद खावे.

- रक्तात जमा झालेले अतिरिक्त युरीक ॲसिड काढून टाकण्यासाठी दिवसातून किमान दोनदा लिंबू पाणी प्यावे. लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड असते जे युरीक ॲसिड विरघळण्यास मदत करते. आवळा, पेरू आणि संत्री यांसारखे व्हिटॅमिन सी असलेले पदार्थही खावेत. 

- चेरी, ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी यांसारख्या अँटिऑक्सिडंट समृद्ध बेरी खाव्यात. गडद रंगाच्या बेरीमध्ये अँथोसायनिन्स नावाचे फ्लेव्होनॉइड्स असतात जे सूज आणि कडकपणा कमी करण्यास मदत करतात. 

सकाळी की रात्री, कोणत्यावेळी चपाती खाल्ल्यानं लवकर वजन कमी होतं? फिट राहायचं तर...

- ओव्याच्या बिया ओमेगा -6 फॅटी ऍसिडयुक्त असतात आणि त्यात लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ देखील असतो. यामुळे युरीक ॲसिड बाहेर टाकण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य सुधारून शरीरातील अतिरिक्त द्रव काढून टाकण्यास मदत होते.

- एनसीबीआयवर प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार रक्तामध्ये जमा होणारे उच्च यूरिक ऍसिड कमी करण्यासाठी, आपण आपल्या आहारात उच्च फायबरयुक्त पदार्थांचा समावेश केला पाहिजे.

ना डाएट- ना जीम; फक्त 5 रिफ्रेशिंग पदार्थ रोज घ्या; झरझर घटेल पोट, कंबरेची वाढलेली चरबी

- ओट्स, केळी आणि ज्वारी आणि बाजरी यांसारखी तृणधान्ये विद्राव्य फायबरचे चांगले स्रोत आहेत. फायबर तुमच्या रक्तातील अतिरिक्त यूरिक ऍसिड शोषून घेते आणि ते तुमच्या शरीरातून बाहेर काढण्यास मदत करते.

Web Title: Natural Ways to Reduce Uric Acid in the Body : 5 Remedies will remove uric acid accumulated in bones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.