Join us  

घातक युरिक ॲसिड बाहेर काढतील ६ पदार्थ; रोज खा-म्हातारपणीही हाडं राहतील चांगली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2023 3:28 PM

Natural Ways to Reduce Uric Acid in the Body : उन्हाळ्याच्या दिवसात युरिक ॲसिड वाढण्याची समस्या सर्वाधिक उद्भवते कारण गरमीच्या दिवसात भरपूर घाम येतो.

शरीरातील  युरिक ॲसिड वाढणं धोक्याची घंटा असू शकते. रक्तात प्युरिनचं प्रमाण वाढल्यास  हे पदार्थ मुत्राद्वारे बाहेर पडतात. (How to lower uric acid levels naturally) अनेकदा हे पदार्थ बाहेर न पडता क्रिस्टल्सच्या स्वरूपात शरीरात जमा होतात. यामुळे गाऊट किंवा किडनी स्टोनचा धोका वाढतो. उन्हाळ्याच्या दिवसात युरिक ॲसिड वाढण्याची समस्या सर्वाधिक उद्भवते कारण गरमीच्या दिवसात भरपूर घाम येतो. (Natural Ways to Reduce Uric Acid in the Body)

या दिवसात योग्य प्रमाणात पाणी न प्यायल्यास रक्तावर याचा परीणाम होते आणि युरिक ॲसिडची पातळी वाढते. कमीत कमी पाणी प्यायल्यानं मुत्राचे प्रमाणही कमी होते आणि गाऊट होऊ शकतो. युरिक ॲसिडचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी काही भाज्यांचे सेवन करणं फायदेशीर ठरू शकतं. यात पाणी आणि फायबर्सचे प्रमाण अधिक असते. गाऊटच्या रुग्णांसाठीही हा उत्तम पर्याय आहे. (Best Home Remedies For Uric Acid)

भोपळा

भोपळा व्हिटामीन सी, बीटा-कॅरोटीन आणि ल्युटिन यांसारख्या एंटी ऑक्सिडंट्सनी परीपूर्ण असतो. यामुळे शरीरातली सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. यामुळे युरिक ॲसिड लेव्हल कमी होते. याव्यतिरिक्त भोपळ्यातील फायबर्स मेटाबॉलिझ्म रेट वाढवतात आणि प्युरिन पचवण्यास मदत करतात. (Reduce Uric Acid Naturally with These Tips and Food Items)

टोमॅटो

टोमॅटोमुळे फक्त जेवणाची चव वाढत नाही तर शरीराच्या चांगल्या कार्यासाठीसुद्धा फायदेशीर ठरतो. यात मोठ्या प्रमाणात व्हिटामीन सी असते. यामुळे टोमॅटोचे नियमित सेवन केल्यानं युरिक ॲसिड लेव्हल कमी होण्यास मदत होते. 

लिंबू

युरिक ॲसिड कमी करण्यासाठी आणि गाऊटच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लिंबू इफेक्टिव्ह उपाय आहे.  सायंस डायरेक्टवर छापण्यात आलेल्या माहितीनुसार लिंबू शरीरातील युरिक एसिडची पातळी नियंत्रणात ठेवण्यास फायदेशीर ठरतो. एक ग्लास पाण्यात एक लिंबू पिळून घ्या आणि अर्धा चमचा बेकींग सोडा यात घालून प्या. दिवसभरातून कमीत कमी तीन ग्लास पाण्याचे सेवन करू शकता. यामुळे रक्तातील युरिक ॲसिडची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

काकडी

उन्हाळ्याच्या दिवसात काकडीचे सेवन केले जाते. काकडीत फायबर्सचे प्रमाण अधिक असते. यामुळेच काकडीच्या सेवनानं युरिक ॲसिड बाहेर पडण्यास मदत होते. याव्यतिरिक्त काकडीत पाण्याचे प्रमाणही अधिक असते ज्यामुळे गाऊटच्य रुग्णांसाठी काकडी फायदेशीर ठरते. 

रोज चालूनही पोट कमी होत नाही? 'ही' आहे चालण्याची योग्य वेळ; स्लिम-मेंटेन राहण्याचं सिक्रेट

परवल

परवलमध्ये भरपूर पाणी असते. याच्या सेवननं शरीरातील प्युरिन मेटाबॉलिझ्म वेगानं घडवतो आणि युरिक ॲसिडची समस्या टळण्यास मदत होते. संधीवात आणि गाऊटच्या रुग्णांनी याचे सेवन करायला हवे. 

मशरूम

बीटा-ग्लुकन्स हा मशरूममध्ये आढळणारा एक प्रकारचा कार्बोहायड्रेट आहे. शरीराला जळजळ होण्यापासून वाचवण्यासाठी हे उपयुक्त आहे. जळजळ झाल्यामुळे युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते. गाउट रुग्णांनी त्याचा आहारात समावेश करावा.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स