Lokmat Sakhi >Fitness > नवरात्रीच्या उपवासादरम्यान असे करा डाएट, नऊ दिवसात कणभरही वजन वाढणार नाही...

नवरात्रीच्या उपवासादरम्यान असे करा डाएट, नऊ दिवसात कणभरही वजन वाढणार नाही...

What should we eat in Navratri fast for 9 days ? : जर तुम्ही नवरात्रीच्या काळात उपवास करणार असाल तर जास्त कॅलरीयुक्त पदार्थ खाणे टाळा, यामुळे आपले वजन एक इंचही वाढणार नाही....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2023 12:11 PM2023-10-16T12:11:59+5:302023-10-16T13:03:51+5:30

What should we eat in Navratri fast for 9 days ? : जर तुम्ही नवरात्रीच्या काळात उपवास करणार असाल तर जास्त कॅलरीयुक्त पदार्थ खाणे टाळा, यामुळे आपले वजन एक इंचही वाढणार नाही....

Navratri Diet Plan: Follow This 9-Day Diet Chart For Healthier Fasting, 9- Day Navratri Diet Plan for Weight Loss For Healthy Fasting | नवरात्रीच्या उपवासादरम्यान असे करा डाएट, नऊ दिवसात कणभरही वजन वाढणार नाही...

नवरात्रीच्या उपवासादरम्यान असे करा डाएट, नऊ दिवसात कणभरही वजन वाढणार नाही...

सध्या सगळीकडेच नवरात्र सणाला अतिशय उत्साहात आणि जल्लोषात सुरुवात झाली आहे. आपण सगळेच देवीची आरती, गरबा, उपवास, या सगळ्याचा आनंद लुटत आहोत. नवरात्र म्हटली की अनेकजण उपवास करतात. नवरात्रीत येणाऱ्या उपवासाचे प्रकार हे वेगळे असतात. कुणी पहिले किंवा शेवटचे दोन दिवस उपवास करतात. याउलट कुणी संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात, तर कुणी निर्जळी तर कुणी खाऊन - पिऊन उपवास करतात. उपवास करणं हे एका अर्थी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर असते(9- Day Navratri Diet Plan for Weight Loss For Healthy Fasting).

उपवास करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. उपवासा दरम्यान आपण काय खातो - पितो त्याचा आपल्या आरोग्यावर चांगला वाईट परिणाम होत असतो. या नऊ दिवसांचा उपवास (Diet plan for fasting days) केल्याने या दरम्यानच्या काळात काहींचे वजन कमी होते तर काहींचे वाढते. उपवास करताना काय खावे काय नाही याची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे. काहीवेळा आपण उपवासा दिवशी दुप्पट खाशी ही म्हण सार्थ करुन खरंच खूप काही खातो. उपवासा दरम्यान (The complete 9-day Navratri diet planner) शक्यतो आपण साबुदाणा खिचडी, वडे, थालीपीठ, खीर, फराळी पॅटिस, बटाटयाची भाजी, वेफर्स असे तेलकट पदार्थ भरपूर खातो. अर्थातच असे तेलकट अनहेल्दी पदार्थ जर आपण खाल्ले तर सहजपणे आपले (Navratri Diet Plan: Follow This 9-Day Diet Chart For Healthier Fasting,) वजन वाढू शकते. अशावेळी नेमके काय खावे हा प्रश्न बरेचजणांना पडतो. त्यामुळे उपवासा दरम्यान आपले दिवसभराचे डाएट नेमके कसे असावे हे पाहूयात(9-Day Navratri Diet Plan for Weight Loss: Know What to Eat!) 

१. साबुदाणा खाणे शक्यतो टाळावे ? 

उपवास म्हटला की आपल्याला सगळ्यात पहिला आठवतो तो साबुदाणा. उपवासाला आपल्याकडे बरेचसे साबुदाण्याचे पदार्थच खाल्ले जातात.पोषणतज्ज्ञ  आणि लाईफस्टाईल स्पेशालिस्ट करिष्मा चावला यांच्या मते, साबुदाणा हा पचनाला खूपच जड असतो. शक्यतो उपवासा दरम्यान साबुदाणे खाणे टाळावे. साबुदाण्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते. यासोबतच आपण यात उकडलेले बटाटे, शेंगदाणे असे इतर पदार्थ घालतो त्यामुळे हे साबुदाणे अधिक कॅलरीयुक्त जड आहार बनतो. जर आपल्याला साबुदाणा खायचाच असेल तर तो दिवसाच्या पहिल्या प्रहरी म्हणजेच सकाळी उठल्या उठल्या खावा, असा सल्ला पोषणतज्ज्ञ देतात. 

नवरात्रीच्या उपवासापूर्वी करा ५ गोष्टी, उपवास करूनही नऊ दिवसात व्हाल फिट अँड फाईन...

फ्रेंच फ्राईज परफेक्ट होण्यासाठी शेफ पंकज भदोरिया सांगतात ५ स्टेप्स, उपवासाला खा रेस्टाॅरण्टसारखे कुरकुरीत फ्रेंच फ्राईज...

२. नवरात्री दरम्यान आपले डाएट नेमके कसे असावे ? 

१. नाश्ता :- कट्टूच्या पिठाचा उपमा किंवा राजगीराच्या पिठाची पोळी किंवा पराठा एक वाटी दह्यासोबत खावा. 

२. मिड ब्रेकफास्ट :- एक ग्लास दुधासोबत फायबरचे प्रमाण जास्त असलेली फळे जसे की, सफरचंद, पेर, पपई. 

उपवास करताना तब्येत बिघडू नये म्हणून कोणते मीठ खावे ? तज्ज्ञ सांगतात, मीठ खाणार असाल तर...

३. दुपारचे जेवण :- कट्टूची खिचडी, वरीचा भात, उपवासाची शेंगदाणा उसळ, दही. 

४. संध्याकाळचे स्नॅकिंग :- शेंगदाणे, बदाम, अक्रोड, काजू किंवा आपल्या आवडीचे ड्रायफ्रुटस यासोबत एक गल्स दूध किंवा एक वाटी दही.  

५. रात्रीचे जेवण :- राजगीराच्या पिठाची पोळी किंवा पराठा, दही, वरीचा भात, एखादा उपवासाचा गोड पदार्थ (गोड पदार्थ खाताना प्रमाणात खावा, त्यासोबतच साखरेऐवजी गुळाचा वापर करावा).  

नवरात्रात उपवास करताना थकवा आला, गळाल्यासारखं झालं तर खा ५ पदार्थ, मिळेल इन्स्टंट एनर्जी...

नवरात्र स्पेशल : साबुदाणा व भगर वापरून चटकन बनवा उपवासाचा डोसा, खायला कुरकुरीत, बनवायला सोपा...

३. उपवास करताना इतर काही महत्वाच्या टिप्स :- 

१. उपवासा दरम्यान तळलेले पदार्थ खाणे शक्यतो टाळावेत. तळलेल्या पदार्थांऐवजी वाफवलेले पदार्थ खाण्यावर जास्त भर द्यावा. 

२. गोड पदार्थ बनवताना साखरे ऐवजी गुळाचा किंवा इतर पदार्थांचा वापर करावा. 

३. साबुदाणा, बटाटे हे उच्च उष्मांक असलेले पदार्थ आहेत, जे अधिक प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढते. त्यामुळे असे पदार्थ शक्य तितक्या कमी प्रमाणात खावेत. 

४. ड्रायफ्रुटससोबत फायबरचे प्रमाण अधिक असलेली फळे खावीत. 

५. उपवासा दरम्यान, दिवसभर शक्य तितके पाणी प्या. 

६. उपवास हे तपश्चर्या, इच्छाशक्ती वाढवण्यासाठी आणि त्यागासाठी केले जाते. त्यामुळे मनातील अध्यात्माची भावना वाढते. जास्त उष्मांक असलेले अन्नपदार्थ घेणे वेळीच टाळा. सर्वप्रथम, तेच खा जे तुमच्या पोटासाठी चांगले आहे आणि ज्यात कमीत कमी कॅलरीज आहेत.

Web Title: Navratri Diet Plan: Follow This 9-Day Diet Chart For Healthier Fasting, 9- Day Navratri Diet Plan for Weight Loss For Healthy Fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.