Lokmat Sakhi >Fitness > नवरात्री स्पेशल व्यायाम: करा फक्त हे ‘एक’ आसन, पोटावरची चरबी होईल कमी-दिसाल एकदम फिट

नवरात्री स्पेशल व्यायाम: करा फक्त हे ‘एक’ आसन, पोटावरची चरबी होईल कमी-दिसाल एकदम फिट

How To Reduce Belly Fat: पोटावरची चरबी कशी कमी करायची, कंबरेचा घेर कसा आवरायचा? हा अनेकींपुढचा प्रश्न. त्यासाठीच करून बघा हे एक खास आसन.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2022 06:37 PM2022-09-28T18:37:16+5:302022-09-28T18:46:46+5:30

How To Reduce Belly Fat: पोटावरची चरबी कशी कमी करायची, कंबरेचा घेर कसा आवरायचा? हा अनेकींपुढचा प्रश्न. त्यासाठीच करून बघा हे एक खास आसन.

Navratri Special Exercise: How to do Makar adho Shwanasan? Exercise and yoga for reducing belly fat | नवरात्री स्पेशल व्यायाम: करा फक्त हे ‘एक’ आसन, पोटावरची चरबी होईल कमी-दिसाल एकदम फिट

नवरात्री स्पेशल व्यायाम: करा फक्त हे ‘एक’ आसन, पोटावरची चरबी होईल कमी-दिसाल एकदम फिट

Highlightsपोट कमी करण्यासाठी मकर अधो श्वानासन नियमितपणे करायला पाहिजे.हे आसन केल्याने केवळ वजनच कमी होत नाही, तर शरीराला इतर अनेक लाभही होतात.

अंबिका याडकीकर, फिजिओथेरपीस्ट
एक ठराविक वय झालं किंवा मग पहिलं बाळंतपण झालं की अनेक महिलांचं पोट (belly fat) सुटतं. इतर शरीर व्यवस्थित मेंटेन असलं तरी पोटाच्या खालचा भाग किंवा ओटीपोट मात्र सुटत चाललं आहे, असं जाणवतं. हळूहळू मग कंबरेचा आकारही वाढू लागतो. कंबर किंवा पोटाचा वाढता घेर वेळीच आवरला नाही, तर मग मात्र तो आपल्या नियंत्रणाबाहेर चालला जातो आणि मग पुन्हा परफेक्ट शेपमध्ये येणं जरा अवघड होतं. त्यामुळे पोट कमी करण्यासाठी मकर अधो श्वानासन (Makar adho Shwanasan) नियमितपणे करायला पाहिजे. हे आसन केल्याने केवळ वजनच कमी होत नाही, तर शरीराला इतर अनेक लाभही होतात (How To Reduce Belly Fat).

 

कसे करायचे मकर अधो श्वानासन?
१. हे आसन करण्यासाठी सगळ्यात आधी जमिनीवर पोटावर झोपा.

२. त्यानंतर दोन्ही हाताच्या पंज्यावर जोर देऊन डोके, छाती, पोटाचा भाग वर उचला.

मुंबईच्या लोकलमध्ये रंगला गरबा, पाहा व्हायरल व्हिडिओ- जगण्याचा उत्साह असावा तर असा..

३. आता दोन्ही हाताचा पंजा ते कोपरा हा भाग जमिनीवर टेकवा.

४. तळपाय जमिनीवरून उचला आणि पायाची बोटेच फक्त जमिनीला टेकतील, अशी त्यांची स्थिती ठेव. 

 

५. हळूहळू पोटऱ्या, मांड्या उचला.

६. आता संपूर्ण शरीराचा भाग तुमच्या हातावर आणि पायाच्या बोटांवर पेललेला असेल.

नवरात्र स्पेशल फूड : लालचुटूक बीट खाण्याचे ५ फायदे, वजन आणि बीपीचं टेन्शन आहे तर..

७. डोके, मान आणि इतर शरीर एका समान रेषेत हवे. शिवाय चेहरा खाली करून जमिनीवर नजर स्थिर ठेवावी. 

८. ही आसनस्थिती काही सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा.

 

मकर अधो श्वानासन करण्याचे फायदे
१. खांद्याचे आणि हाताचे स्नायू मजबूत होण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे.

२. दंडावरची चरबी कमी करण्यासाठीही या आसनाचा उपायोग होतो.

गुलाबी रंगाचा ड्रॅगन फ्रुट चहा? हिंमत असेल तर हा चहा पिऊन दाखवाच.. व्हिडिओ व्हायरल

३. पायांची लवचिकता आणि ताकद वाढविण्यासाठी उपयुक्त आसन

४. पोटावरची आणि कंबरेवरची चरबी कमी हाेण्यास मदत होते.

५. शरीराचा बांधा सुधारण्यास मदत होते.

६. पचनशक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त .

 

Web Title: Navratri Special Exercise: How to do Makar adho Shwanasan? Exercise and yoga for reducing belly fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.