Lokmat Sakhi >Fitness > केस फार गळतात, चिडचिड, हार्मोनल प्रॉब्लेम? रोज फक्त १० मिनिटांत करा स्मार्ट व्यायाम- बघा स्वत:त बदल

केस फार गळतात, चिडचिड, हार्मोनल प्रॉब्लेम? रोज फक्त १० मिनिटांत करा स्मार्ट व्यायाम- बघा स्वत:त बदल

नवरात्र स्पेशल योगा : केस गळण्यापासून ते मासिक पाळीच्या आजारांपर्यत सतत अंगावर आजारपणं तरी किती काढायची आणि का? भाग -५ - yoga.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2022 03:16 PM2022-09-30T15:16:14+5:302022-09-30T15:25:48+5:30

नवरात्र स्पेशल योगा : केस गळण्यापासून ते मासिक पाळीच्या आजारांपर्यत सतत अंगावर आजारपणं तरी किती काढायची आणि का? भाग -५ - yoga.

Navratri special Yoga : hair loss? hormonal problems? Do smart exercise in just 10 minutes every day - see the change in yourself | केस फार गळतात, चिडचिड, हार्मोनल प्रॉब्लेम? रोज फक्त १० मिनिटांत करा स्मार्ट व्यायाम- बघा स्वत:त बदल

केस फार गळतात, चिडचिड, हार्मोनल प्रॉब्लेम? रोज फक्त १० मिनिटांत करा स्मार्ट व्यायाम- बघा स्वत:त बदल

Highlightsतर आपण फिट राहण्याकडे निदान वाटचाल होऊ शकते.

वृषाली जोशी-ढोके

वयात आलेल्या मुली आणि स्त्रिया यांना आजकाल रोजच भेडसावणाऱ्या समस्या म्हणजे लठ्ठपणा, केस गळती, हार्मोनल असंतुलन, अनावश्यक जागी केस वाढणे, अनियमित पाळी, पाळीत वेदना होणे, चिडचिड. या सगळ्याचा परिणाम म्हणजे आत्मविश्वास कमी होणे, उगीच रडू येणे, सहनशक्ती कमी होणे असा होतो. बदलती जीवनशैली तसेच सतत बैठे काम यामुळे शारीरिक हालचाल कमी झालेली दिसून येते. अभ्यास असो की ऑफिसचे काम यासाठी रात्रभर जागरण वेळी चहा- कॉफी सेवन, अवेळी आणि अनहेल्दी खाणे या सगळ्यामुळे लठ्ठपणा वाढतो. वाढत्या वजनामुळे पाळी अनियमित होते आणि पुढे त्याचा परिणाम वंध्यत्व येण्यापर्यंत होतो. हे सारे टाळायचे तर नियमित योगाभ्यास अतिशय उपयुक्त ठरतो. रोज नियमित १२ सूर्यनमस्कार, किमान १० मिनिट ओंकार साधना, प्राणायाम, योगनिद्रा आणि काही ठराविक आसनं केली तर आपण फिट राहण्याकडे निदान वाटचाल होऊ शकते. सोबतच सात्विक अन्न , भरपूर भाज्या, कोशिंबिरी, उष्णता कमी करण्यासाठी लिंबू सरबत, कोकम सरबत घेतले तर वजनही कमी होईल आणि रंगरुपासह तब्येतही ठणठणीत राहील.

(Image : google)

कोणती आसनं महत्त्वाची?

(Image : google)

१. भद्रासन - दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून पायांचे तळवे एकमेकांजवळ आणावे. दोन्ही हातांनी आपल्या पायाचे तळवे पकडा. आपली पाठ ताठ राहील याची काळजी घ्या आणि दोन्ही गुडघे जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. यानंतर आपले दोन्ही गुडघे वर आणि खाली करा. ही सर्व प्रक्रिया अतिशय संथ आणि सावकाश करायची आहे. गुडघ्याचे त्रास असणाऱ्यांनी काळजीपूर्वक आसान करावे.

(Image : google)

2. पवनमुक्तासन - पाठीवर झोपून दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून पोटावर दाबून घ्यावे. पायांवर दोन्ही हातांनी घट्ट मिठी मारावी आणि कपाळ गुडघ्यात टेकवणे. ज्यांच्या पोटाच्या शस्त्रक्रिया झाल्या असतील त्यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार हे आसन करावे.

(Image : google)

3. मार्जारासन - दोन्ही पायांच्या गुडघ्यावर उभे राहून पायात थोडे अन्तर घ्यावे दोन्ही हात दोन्ही पायांच्या समोर टेकवावे. मान मागे टाकून पाठ आतल्या दिशेने दाबून घ्यावी. तसेच मान आतल्या दिशेने वळवून पाठ जास्तीत वर उचलून घ्यावी असे दोन्ही प्रकारे करावे.
४. यासोबत कपालभातीचे एक एक मिनिटांची ३ आवर्तने केल्यास अधिक फायदा निश्चितच मिळेल.

(लेखिका आयुषमान्य योग आणि वेलनेस ट्रेनर आहेत.)
 

Web Title: Navratri special Yoga : hair loss? hormonal problems? Do smart exercise in just 10 minutes every day - see the change in yourself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.