Lokmat Sakhi >Fitness > व्यायामाला वेळच नाही? फक्त ५ मिनिटांत करा ३ आसनं, तब्येत सुधारुन आत्मविश्वास वाढेल..

व्यायामाला वेळच नाही? फक्त ५ मिनिटांत करा ३ आसनं, तब्येत सुधारुन आत्मविश्वास वाढेल..

नवरात्र स्पेशल योगा : केस गळण्यापासून ते मासिक पाळीच्या आजारांपर्यत सतत अंगावर आजारपणं तरी किती काढायची आणि का? भाग -६ - yoga.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2022 03:58 PM2022-10-01T15:58:57+5:302022-10-01T16:04:19+5:30

नवरात्र स्पेशल योगा : केस गळण्यापासून ते मासिक पाळीच्या आजारांपर्यत सतत अंगावर आजारपणं तरी किती काढायची आणि का? भाग -६ - yoga.

Navratri special Yoga : No time for exercise? Do 3 yoga asanas in just 5 minutes, health and confidence will increase.. | व्यायामाला वेळच नाही? फक्त ५ मिनिटांत करा ३ आसनं, तब्येत सुधारुन आत्मविश्वास वाढेल..

व्यायामाला वेळच नाही? फक्त ५ मिनिटांत करा ३ आसनं, तब्येत सुधारुन आत्मविश्वास वाढेल..

Highlightsरोज नियमित या ३ आसनांचा सराव केला तर शरीराची लवचिकता तर वाढेलच सोबत..

वृषाली जोशी-ढोके

आपल्या मनात बरंच असतं पण व्यायाम करणं जमत नाही. विशेषत: महिला. सकाळी ऑफिस, मुलांच्या शाळा, डबे. घरात शेकडो कामं. त्यात व्यायाम काय कपभर शांतपणे चहा प्यायला फुरसत नसते. त्यात कळत नाही नेमका आपण कोणता व्यायाम करायचा? बरेचदा दुसऱ्याचे पाहून आपण नक्की काय करावे हे समजत नाही. सगळे व्यायाम प्रकार काहीच दिवस थोडे थोडे करून सोडून दिले जातात आणि अपेक्षित फायदे आपल्याला मिळत नाहीत म्हणून नैराश्य येते. योगाभ्यास सुरू करावा म्हंटले तर खाली डोके वर पाय आणि श्वासावर नियंत्रण मला जमेल का असा प्रश्न पडतो. योगाभ्यास म्हणजे अवघड आसनांची साखळी किंवा काहीतरी भयंकर प्रकार म्हणुन त्याकडे न बघता सहज सोपी आसनं ज्याने शरीराबरोबरच मनाचा पण विकास होणारे तंत्र म्हणून बघितले आणि अभ्यासले गेले पाहिजे. व्यायामाला वेळच मिळत नसला तरी किमान सुरुवात करा. रोज नियमित या ३ आसनांचा सराव केला तर शरीराची लवचिकता तर वाढेलच सोबत आरोग्य सुधारून आत्मविश्वासही नक्की वाढेल. 

३ आसने ५ मिनिटं

(Image : google)

१. ताडासन

दोन्ही हात एकमेकात गुंफून डोक्यावर घेऊन जाणे त्याच वेळी दोन्ही पायाच्या टाचा वर उचलून चवडयावर येऊन उभे राहणे. संपूर्ण शरीर वरच्या
दिशेने ताणून घेऊन पोट आत मध्ये खेचून घ्यावे. संथ श्वसन चालू ठेवावे. या आसना मुळे लहान मुलांची उंची वाढण्यास मदत होते त्याचप्रमाणे संपूर्ण शरीर एकाच दिशेने खेचले गेल्याने स्नायूंवर आलेला ताण कमी होतो.

 


(Image : google)

२. वृक्षासन

डावा पाय उजव्या मांडी जवळ आतल्या बाजूने लावून घेणे नंतर दोन्ही हात बाजूने डोक्यावर नमस्कार स्थिती मध्ये ठेवावे दोन्ही हाताचे दंड कानाला चिकटलेले ठेवावे. आसन स्थिती सोडताना उलट क्रमाने सोडावी. या मुळे शरीराची लवचीकता वाढण्यास मदत होते. हे तोलात्मक आसन आहे.

(Image : google)

३. वज्रासन

दोन्ही पायांच्या गुडघ्यावर बसून बैठक मागे पायांच्या खोबणी (व्ही शेप) मध्ये टाकावावी. दोन्ही हातांचे तळवे द्रोण मुद्रेमध्ये गुडघ्यांवर ठेवावे. जेवणानंतर किमान दोन मिनिट या आसानामध्ये बसल्यास पचनाच्या तक्रारी दूर होऊन गॅसेस आणि अपचनाचा त्रास कमी होतो.

(लेखिका आयुषमान्य योग आणि वेलनेस ट्रेनर आहेत.)

Web Title: Navratri special Yoga : No time for exercise? Do 3 yoga asanas in just 5 minutes, health and confidence will increase..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.