Lokmat Sakhi >Fitness > वय आणि कोण काय म्हणेल याची पर्वा न करता जगणाऱ्या नीना गुप्ता, म्हणाल्या अखेर केलीच हिंमत..

वय आणि कोण काय म्हणेल याची पर्वा न करता जगणाऱ्या नीना गुप्ता, म्हणाल्या अखेर केलीच हिंमत..

Neena Gupta Wears Mini Black Dress At The Age Of 63 : वयाची साठी ओलांडलेल्या नीना गुप्ता अनेकांसाठी फॅशन आयकॉन आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2023 01:50 PM2023-01-06T13:50:32+5:302023-01-06T13:54:35+5:30

Neena Gupta Wears Mini Black Dress At The Age Of 63 : वयाची साठी ओलांडलेल्या नीना गुप्ता अनेकांसाठी फॅशन आयकॉन आहेत.

Neena Gupta Wears Mini Black Dress At The Age Of 63 | वय आणि कोण काय म्हणेल याची पर्वा न करता जगणाऱ्या नीना गुप्ता, म्हणाल्या अखेर केलीच हिंमत..

वय आणि कोण काय म्हणेल याची पर्वा न करता जगणाऱ्या नीना गुप्ता, म्हणाल्या अखेर केलीच हिंमत..

'आपलं वय हे केवळ एक आकडे आहेत' असं आपल्याकडे म्हटलं जात. वयाने आणि दिसण्याने तरुण राहण्यापेक्षा मनाने तरुण राहणे केव्हाही उत्तम असते. आपल्याला कोणत्या प्रकारचे कपडे सूट होतात, आपण कशात छान दिसतो, ज्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो, ज्या कपड्यात आपल्याला सगळे स्वीकारतात असेच कपडे आपण घालतो. परंतु या सर्व गोष्टींना छेद देत बॉलिवूड मधील ६३ वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी आपल्या चाहत्यांना एक सरप्राइज दिले आहे. आपलं जीवन आपल्या अटी-शर्तींवर जगा, लोक काय म्हणतात याची पर्वा करू नका, असं म्हणणाऱ्या नीना गुप्ता यांनी चित्रपटांमध्ये सशक्त महिलांच्या भूमिका निभावल्या आहेत.नीना गुप्ता जितक्या त्यांच्या प्रोफेशनल लाईफबद्दल चर्चेत असतात त्यापेक्षा जास्त त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असतात. मध्यंतरी नीना गुप्ता यांनी मॉर्निंग वर्कआऊट दरम्यान पुशअप्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले होते. सध्या नीना गुप्ता यांनी असाच एक व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम पेजवरून शेअर केला आहे(Neena Gupta Wears Mini Black Dress At The Age Of 63).

नक्की काय आहे या व्हिडीओमध्ये ? 

नीना गुप्ता यांनी आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम पेजवरून काही सेकंदांचा एक छोटासा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, नीना गुप्ता यांनी काळ्या रंगांचा एकदम बारीक स्ट्रिप्स वाला शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. हा सुंदर ड्रेस परिधान करून त्या आपल्या घराच्या गार्डनमध्ये ठूमकत नखरेल अदाकारी करत चालताना दिसत आहेत. एलिगंट स्टाइलमध्ये वॉक करणाऱ्या नीना गुप्ता अतिशय सुंदर दिसत आहेत.    

 


 कॅप्शनमध्ये काय म्हणत आहेत... 

"असा ड्रेस घालणं हे मोठ्या हिमतीचे काम आहे...अखेर केली हिंमत... !!!" अशा कॅप्शनसह नीना गुप्ता यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी देखील शॉर्ट ड्रेस घालून मिरवण्याचे धाडस केले आहे. 

चाहते काय म्हणत आहेत... 

नीनाच्या एका चाहतीने तीच कौतुक करत म्हटले आहे की, " या वयाची झाल्यावर मला पण नीनासारखं कुल आणि ग्रेसफुल दिसायचं आहे". "नीनाजी तुम्ही या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहात, आणि तुम्हांला कुणीही कोणत्याही प्रकारचे कपडे घालण्यापासून रोखू शकता नाही". अशी कमेंट एका युजरने केली आहे. तिचे कॅप्शन वाचून एका युजरने म्हटले आहे की, "हिम्मत तर लागतेच आणि तुमच्यात तर भरपूर हिम्मत आहे". अशाप्रकारे वयाच्या ६३ व्या वर्षीसुद्धा कुणाचीतही तमा न बाळगता या अभिनेत्रीने जे धाडस केले आहे त्याबद्दल चाहते आणि नेटकरी तिचे कौतुक करत आहेत.

Web Title: Neena Gupta Wears Mini Black Dress At The Age Of 63

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.