ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांची लेक तसेच सेलिब्रिटी डिझायनर मसाबा गुप्ता ( Masaba Gupta:) तिच्या डाएटबाबत आणि एकंदरीतच हेल्थबाबत अतिशय जागरुक आहे. तिचे फिटनेसचे व्हिडिओ, डाएट प्लॅन याची माहिती ती नेहमीच सोशल मिडियावर शेअर करत असते. पण एवढं सगळं असूनही तिचं वर्कआऊट अतिशय रेग्युलर असूनही तिला एका विशिष्ट पद्धतीचं योगासन करायला चक्क २ वर्षे प्रॅक्टीस करावी लागली. अखेर आंतरराष्ट्रीय योगादिनी तिने हे साध्य केलं आणि या अवघड आसनाचा फोटो इन्स्टाग्रामला शेअर करून तिच्या चाहत्यांना योगा करण्यासाठी मोटीव्हेट केलं.
पोस्ट शेअर करताना मसाबा म्हणते आहे, की मी हे आसन जमवलं आहे, पण तरीही म्हणावी तशी परफेक्ट पोझ मला जमलेली नाही. मसाबा असं जरी म्हणत असली तरी तिने जो काही आसन प्रकार केला आहे, तो पाहून तर तिच्या चाहत्यांनी तिचं भरभरून कौतूक केलं आहे. या अतिशय अवघड आसनाचं नाव आहे बकासन. Crow Pose or Crane Pose या नावानेही हे आसन ओळखलं जातं. खरोखरंच या आसनाचा प्रकार अतिशय अवघड असून या आसन प्रकारात दोन्ही तळहातांवर संपूर्ण शरीराचा बॅलेन्स सांभाळायचा आहे. या आसनाला काकसन किंवा कावळा पोझ असंही म्हणतात.
कसं करायचं बकासन?- बकासन करण्यासाठी दोन्ही तळपाय जमिनीवर टेकवून उकड बसा.- यानंतर दोन्ही तळहात समोर जमिनीवर टेकवा.- दोन्ही पायांचे गुडघे हातांच्या काखेजवळ येतील अशा पद्धतीने ठेवा.- आता हातावर हळूहळू जोर द्या आणि तळपाय जमिनीवर उचलण्याचा प्रयत्न करा.- हात किंचित कोपऱ्यात वाकवून गुडघे हाताच्या कोपऱ्याजवळ आणण्याचा प्रयत्न करा.- पाय जमिनीवरून उचलले गेले की काही सेकंद या आसनात राहण्याचा प्रयत्न करा.
बकासन करण्याचे फायदेBenefits of Bakasana- हे आसन हाताची मजबुती वाढविण्यासाठी उपयुक्त आहे.- पाठीचा कणा मजबूत होण्यासाठी फायदेशीर आसन- हात आणि पाठ टोन्ड राहण्यासाठी आणि त्यांची मजबुती वाढविण्यासाठी हे आसन परफेक्ट मानलं जातं.- मन एकाग्र होण्यासाठी उपयुक्त.- ओटीपोटाचे स्नायू मजबूत होतात. त्यामुळे महिलांसाठी विशेष फायदेशीर- पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त ठरणारे आसन.