Join us  

२ बाळंतपणात वाढललेलं २३ किलो वजन कसं कमी केलं, नेहा धुपिया सांगते, आई झाल्यावर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2024 8:18 PM

Neha Dhupia lost 23kgs: This is what she did differently : नेहा धुपिया सांगते २३ किलो वजन कमी करण्याचं सिक्रेट

जन्म बाईचा बाईचा खुप घाईचा. कोणतीही महिला असो, तिला चूल आणि मुल चुकलेलं नाही (Neha Dhupia). मुल झाल्यानंतर महिला पूर्णपणे बदलते. काहींचं वजन वाढतं, पोट सुटतं, तर काहींच्या चेहऱ्यात बदल दिसून येतो (Weight loss journey). अभिनय विश्वात काम करणाऱ्या महिलांना स्वतःच्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. आई झाल्यानंतर वजन वाढलं की पुन्हा फिटनेसकडे लक्ष द्यावं लागतं.

आलिया भटनंतर अभिनेत्री नेहा धुपिया हिने देखील फिटनेसकडे लक्ष देत वजन कमी केलं. नेहाने गेल्या वर्षभरात २३ ते २५ किलो वजन घटवलं. यावर नेहा म्हणते, 'मुलगी मेहरच्या जन्मानंतर घरात राहून कॅलरीज बर्न केल्या. त्यानंतर पुन्हा आई झाली, पण योग्य आहारा आणि व्यायामामुळे वजन कमी करणं शक्य झालं'(Neha Dhupia lost 23kgs: This is what she did differently).

वजन कमी करण्यासाठी नेहाने संतुलित आहार, जीवनशैलीमध्ये बदल आणि नियमित व्यायाम केला. तिने आहारावर जास्त भर दिला, कारण ती २ मुलांची आई आहे. एनर्जेटिक राहणं अत्यंत गरजेचं आहे. वजन कमी करण्यासाठी नेहाने आहारातून साखर वगळली. तळलेले पदार्थ खाणे बंद केले आणि ग्लूटेन फ्री पदार्थ खाण्यास सुरुवात केली.

केस गळती थांबतच नाही? मग ५ पैकी १ पदार्थ रोज खाऊन पाहा; पातळ केस होतील दाट - टक्कलही गायब

नेहाने केले २३ किलो वजन कमी

अलीकडेच ‘द हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत नेहाने वेट लॉस जर्नीबद्दल शेअर केलं. ती म्हणाली, 'प्रेग्नन्सीनंतर वजन वाढले. पण वेट लॉसचा निर्णय मी त्वरित घेतला नाही.  माझ्या दोन्ही मुलांना वर्षभर स्तनपान केले. त्यामुळे माझी भूक वाढली होती, आणि शरीराला एनर्जीची गरज होती. पण काही काळानंतर व्यायाम आणि डाएटिंग करून माझे वजन २३ किलोने कमी केले.'

अभिनेत्री नेहाने २०१८ साली मेहरला जन्म देऊन मातृत्व स्वीकारले. यानंतर २०२१ साली तिला गुरिक सिंग मुलगा झाला. नेहा पुढे म्हणते, 'या चार वर्षात वजन कमी जास्त होत होतं. जेव्हा मी गरोदर होती, तेव्हा मला प्रसूतीनंतर मी कशी दिसेल याची काळजी नव्हती.' असे ती म्हणाली.

अस्सल पारंपरिक चव - खा झणझणीत भडंग; १० मिनिटात कुरकुरीत भडंग करण्याची रेसिपी

वजन कमी केल्यानंतर जास्त काम मिळू लागले

चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी फिट राहणं अत्यंत गरजेचं आहे. याबद्दल ती म्हणते, 'मी कोण आहे हे मी नेहमीच स्वीकारले आहे. वेट लॉसनंतर मला बऱ्याच प्रोजेक्ट्सचे ऑफर्स मिळाले. शिवाय आता विविध कपड्यांमध्ये चांगली दिसते आणि बरी वाटते.'

टॅग्स :नेहा धुपियाफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सप्रेग्नंसी