अनेकांचं वजन झपाट्याने वाढते. तर काहींच वजन काही केल्या लवकर कमी होत नाही. व्यायाम, डाएट याकडे विशेष लक्ष देऊनही वजनावर काही फारसा फरक पडलेला दिसून येत नाही. प्रत्येकाचे शरीर वेगळे आहे. काही लोकं डाएटमध्ये बदल करून वेट लॉस करतात. तर काही जण हेवी वर्कआउट करून शरीरातील चरबी कमी करतात. या उपायांनी देखील वजन कमी होत नसेल तर, किचनमधील मसाल्यांचा वापर करून पाहा.
मसाल्यांच्या वापराने फक्त पदार्थाची चव वाढत नाही तर, फॅट बर्न देखील होते. यासह शरीराला डिटॉक्सिफाय आणि पचनसंस्था सुधारण्यास मदत करते. लखनौच्या सेंट्रल कमांड हॉस्पिटलचे डायटीशियन रोहित यादव यांनी लठ्ठपणा कमी करण्यासाठी कोणते मसाले कशापद्धतीने खावे? याबद्दलची माहिती दिली आहे(This ONE Indian spice can help you lose that belly fat in 15 days).
जिरं
फोडणीमध्ये जिऱ्याचा वापर होतोच. जिरे खाल्ल्याने पोटाची चरबी जलद कमी होते. जिऱ्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स आणि फायबर असतात जे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. उकळत्या पाण्यात जिरे घालून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. जर आपल्याला फक्त जिरे पाणी प्यायचं नसेल तर त्यात गुळ, मेथीचे दाणे किंवा गुळ पिळून पाणी प्या.
कोण म्हणतं फक्त डाएट- वर्कआउट केल्यानेच वजन घटतं? ५ सोपे बदल, सहज घटेल वजन
लवंग
पदार्थात लवंग घालताच चव दुपट्टीने वाढते. लवंगाच्या सेवनामुळे चयापचयाला चालना मिळते. यासह यात फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फोलेटसारखे गुणधर्म असतात. ज्यामुळे पोट आणि कंबरेचा घेर कमी होतो. यासाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात जिरे, दालचिनी आणि लवंग घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर पाणी गाळून उपाशी पोटी प्या.
मेथी दाणे
मेथीची भाजी असो किंवा मेथी दाणे, आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. त्यात बीटा-ग्लुकोसिन असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. तर फायबरमुळे पचन सुधारते, व वेट लॉसही होते. यासाठी चमचाभर मेथी दाणे ग्लासभर पाण्यात भिजत ठेवा. हे पाणी व भिजवलेले मेथी दाणे सकाळी उपाशी पोटी प्या. यामुळे वजन नक्कीच घटेल.
वजन कमी करताना चहा पिणं किती योग्य? चहा पिऊनही वजन कमी होऊ शकते? तज्ज्ञ सांगतात
बडीशेप
जेवल्यानंतर चमचाभर बडीशेप प्रत्येक जण खातो. पण याने वजन देखील कमी होते, हे आपल्याला ठाऊक आहे का? इवल्याश्या बडीशेपमध्ये अँटी-ऑक्सिडेंट असतात. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते व पोटाचे विकार दूर राहतात. वजन कमी करण्यासाठी आपण बडीशेपचा वापर करून चहा तयार करू शकता. यासाठी गरम पाण्यात गुळाचा खडा आणि चमचाभर बडीशेप घालून उकळवण्यासाठी ठेवा. चहाच्या गाळणीने गाळून पाणी उपाशी पोटी प्या.