Lokmat Sakhi >Fitness > व्यायामासाठी वेळच नाही? मग करा हलकं- फुलकं वार्मअप, बघा ३ सोपे व्यायाम

व्यायामासाठी वेळच नाही? मग करा हलकं- फुलकं वार्मअप, बघा ३ सोपे व्यायाम

Fitness Tips: व्यायाम करायला वेळ मिळत नसेल तर फिट किंवा एनर्जेटिक राहण्यासाठी किमान एवढे तरी वार्मअप व्यायाम (warm up exercise) केलेच पाहिजेत. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2022 08:19 AM2022-11-04T08:19:49+5:302022-11-04T08:20:01+5:30

Fitness Tips: व्यायाम करायला वेळ मिळत नसेल तर फिट किंवा एनर्जेटिक राहण्यासाठी किमान एवढे तरी वार्मअप व्यायाम (warm up exercise) केलेच पाहिजेत. 

No time for exercise? 3 warm up exercise to keep you fit and also helps for inches loss | व्यायामासाठी वेळच नाही? मग करा हलकं- फुलकं वार्मअप, बघा ३ सोपे व्यायाम

व्यायामासाठी वेळच नाही? मग करा हलकं- फुलकं वार्मअप, बघा ३ सोपे व्यायाम

Highlights फिटनेसच्या दृष्टीने योग्य शारिरीक हालचाल होण्यासाठी कमी वेळात होणारे काही वार्मअप व्यायाम करणं गरजेचंच असतं.

फिट राहण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत. त्यांना दुसरा पर्याय नाहीच. आपल्या रोजच्या रुटीनमध्ये आपण आपलं डाएट सांभाळतो. पण कधी कधी रोजच्या धावपळीमुळे, गडबडीमुळे व्यायामासाठी वेळ काढणं खरोखरच खूप अवघड होतं. किंवा मग काही जणांना वेळ असतो, पण व्यायामाचा खूप कंटाळा येतो. मग अशावेळी फिटनेसच्या दृष्टीने योग्य शारिरीक हालचाल (exercise for inches loss) होण्यासाठी कमी वेळात होणारे काही वार्मअप व्यायाम (3 warmup exercise to keep you fit) करणं गरजेचंच असतं. असेच काहीसे व्यायाम इन्स्टाग्रामच्या fitjam.in या पेजवर शेअर करण्यात आले आहेत.

 

झटपट होणाऱ्या वार्मअप एक्सरसाईज
१. फ्रंट जॅक (Front jack)

या प्रकारच्या व्यायामात तुमच्या हाताची आणि पायांचीही हालचाल होते. हा व्यायाम करण्यासाठी सगळ्यात आधी ताठ उभे रहा. त्यानंतर उडी मारून दोन्ही पायांत अंतर घ्या. त्याचवेळी दोन्ही हात डोक्यावर घ्या. पुन्हा उडी मारून पाय जोडून घ्या, असे करताना हात खाली घ्या. एका नंतर एक २० वेळा ही क्रिया करा.

 

२. बट किक्स (butt kicks)
हा व्यायाम करण्यासाठी ताठ उभे रहा. दोन्ही हात शरीराच्या मागच्या बाजूला घ्या. आता उडी मारून एका नंतर एक या पद्धतीने पाय गुडघ्यात वाकवून तळपाय मागच्या बाजूने वर उचला आणि उजवा तळपाय उजव्या तळहाताला तर डावा तळपाय डाव्या हाताला लावण्याचा प्रयत्न करा. हा व्यायाम देखील दोन्ही पायांनी प्रत्येकी २०- २० वेळा करावा.

 

३. साईड विंग्स (side wings)
हा व्यायाम करण्यासाठी सुरुवातीला ताठ उभे रहा. यानंतर दोन्ही हात कंबरेवर ठेवा. यानंतर उडी मारून एका नंतर एक या पद्धतीने उजवा पाय उजव्या बाजूला तर डावा पाय डाव्या बाजूला करा. मध्यम लयीमध्ये जवळपास २० वेळा हा व्यायाम करावा.  


 

Web Title: No time for exercise? 3 warm up exercise to keep you fit and also helps for inches loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.