Join us  

व्यायामाला वेळ नाही - तोंडाचाही ताबा सुटतो? ४ स्मार्ट गोष्टी करा; दिसाल सुडौल - राहाल कायम फिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2024 12:06 AM

No Time for Exercise? Here Are 4 Easy and smart Ways to lose Weight : ४ स्मार्ट गोष्टी करून वजन कसं घटवायचं? पाहा सोप्या ट्रिक्स..

आजकाल बरेच फिटनेस ट्रेण्ड येतात आणि जातात (Weight Loss). पण काही उपायामुळे वजन कमी होते किंवा होत नाही. वजन कमी करण्यासाठी डाएट आणि व्यायाम करणं गरजेचं आहे (Fitness). पण व्यग्र जीवनशैलीमुळे व्यायाम आणि काटेकोरपणी डाएट फॉलो करायला जमत नाही. ज्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढत जातं.

सध्या अनेकांची बैठी जीवनशैली आहे. एकाच जागी बसल्यामुळे लठ्ठपणा वाढतो. ज्यामुळे गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. त्यामुळे वेळीच वजन कमी करणं गरजेचं आहे. जर डाएट आणि व्यायाम करायला वेळ मिळत नसेल तर, ४ गोष्टी करा. वजन वाढणारच नाही(No Time for Exercise? Here Are 4 Easy and smart Ways to lose Weight).

वॉकिंग

द हेल्थ साईट. कॉम या वेबसाईटनुसार, शक्य तितकं चालण्याचा प्रयत्न करा. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी चालण्याचा प्रयत्न करा. दररोज ३० मिनिटे चालल्याने आपल्याला फिट आणि निरोगी राहण्यास मदत होईल. शिवाय पचनक्रियाही सुधारेल.

कोण कुठली 'मारिया' तिला माया फुटली; ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले मेडल विकून परक्या बाळाला केली आर्थिक मदत..

पुरेसं पाणी प्या

पाण्याच्या कमतरतेमुळेही शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नियमित पाणी पीत राहा. शरीरात जमा झालेले विषारी घटक काढण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवा. लठ्ठपणावर नियंत्रण मिळवण्यासाठी दिवसातून ८ - १० ग्लास पाणी प्या. यामुळे भूकही जास्त लागणार नाही.

श्रावण स्पेशल : भोपळ्याची पुरणपोळी खाऊन तर पाहा, नेहमीच्या पुरणपोळीपेक्षा वेगळी -फक्त २० मिनिटांत ताटात

डिनर लवकर करा

सूर्यास्तापूर्वी रात्रीचे जेवण खाण्याचा नियम पाळा. यामुळे वजन वाढण्यावर नियंत्रण राहील. कारण रात्रीचे जेवण लवकर केल्याने सहज पचते. त्याचबरोबर ॲसिडिटी आणि अपचन यांसारख्या समस्या टाळण्यासही मदत होते.

घरी शिजवलेलं अन्न खा

व्यस्त जीवनशैलीमुळे लोक फास्ट फूड आणि जंक फूड खाण्यास प्राधान्य देतात. पण, अशा पदार्थांमध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण कमी असते. त्याच वेळी, त्यात कार्बोहायड्रेट, साखर आणि चरबी जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो. त्यामुळे नेहमी घरी शिजवलेले अन्न खावे. ते पौष्टिक आणि आरोग्यदायी असते. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स